HomeUncategorizedरेशनच्या तांदळात प्लास्टिकचा तांदूळ ही अफवा.- भेसळ फोटिफाईड तांदुळ हा शरीरास उपयुक्त....

रेशनच्या तांदळात प्लास्टिकचा तांदूळ ही अफवा.- भेसळ फोटिफाईड तांदुळ हा शरीरास उपयुक्त. – दत्तात्रय कवितके ( जिल्हा पुरवठा अधिकारी कोल्हापूर.)🛑श्री नुतन नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित सुळेरान.- प॓च वार्षिक निवडणूक २०२३ ते२०२८ बिनविरोध.🛑व्यथा एका सभासदाची आजरा कथा.- आजरा कारखान्याची.- सभासद सुनिल शिंदे..🛑आजरा शहरातील ( बस स्थानक परिसर.- खोकेधारकांचे तहसीलदारांना निवेदन..( राष्ट्रीय महामार्ग ठेकेदार अन्यायकारक आहेत. न्याय मिळावा.)

🛑रेशनच्या तांदळात प्लास्टिकचा तांदूळ ही अफवा.- भेसळ फोटिफाईड तांदुळ हा शरीरास उपयुक्त. – दत्तात्रय कवितके ( जिल्हा पुरवठा अधिकारी कोल्हापूर.)
🛑श्री नुतन नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित सुळेरान.- प॓च वार्षिक निवडणूक २०२३ ते२०२८ बिनविरोध.
🛑व्यथा एका सभासदाची आजरा कथा.- आजरा कारखान्याची.- सभासद सुनिल शिंदे..
🛑आजरा शहरातील ( बस स्थानक परिसर.- खोकेधारकांचे तहसीलदारांना निवेदन..( राष्ट्रीय महामार्ग ठेकेदार अन्यायकारक आहेत. न्याय मिळावा.)

🛑रेशनच्या तांदळात प्लास्टिकचा तांदूळ ही अफवा.- भेसळ फोटिफाईड तांदुळ हा शरीरास उपयुक्त. – दत्तात्रय कवितके ( जिल्हा पुरवठा अधिकारी कोल्हापूर.)

कोल्हापूर.- प्रतिनिधी.

केंद्र शासनाच्या निर्देशानुसार राज्यात लक्ष्य निर्धारित सार्वजनिक वितरण व्यवस्थेमार्फत (TPDS) लाभाथ्यर्थ्यांना फोर्टिफाईड तांदूळ वितरीत करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे. राज्यात फोर्टिफाईड तांदूळ वितरण योजना ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची महत्वाकांक्षी योजना आहे. व त्यानुसार संपुर्ण राज्यात सदर फोर्टिफाईड तांदूळ वितरणाची सुरुवात झालेली आहे.
फोर्टिफाईड तांदुळ थैलेसिमिया व सिकल सेल, अॅनेमिया रोखणेसाठी उपयुक्त आहे. तसेच सदरचा फोटिफाईड तांदुळ पाहता सकृतदर्शनी तांदळात भेसळ असले सारखा वाटू शकतो, हा तांदुळ पाण्यावर तरंगु शकतो. पण तो सामान्य तांदळाप्रमाणे सेवनासाठी वापराला जातो. सदर फोटिफाईड तांदळात लोह, फॉलिक अॅसिड, विटॅमिन B 12 सुक्ष्म अन्नद्रव्ये असुन लाभार्थ्यांच्या आरोग्याचे दृष्टिने शासनाने जाणीवपूर्वक वितरण सुरू केले आहे. तसेच सदर फोटिफाईड तांदळाबाबत लाभार्थ्यांना काही शंका / अडचणीबाबत आपल्या तालुक्यातील तहसिल कार्यालयातील पुरवठा कार्यालयाशी संपर्क साधावा असे आवाहन करणेत येत आहे. दत्तात्रय कवितके जिल्हा पुरवठा अधिकारी कोल्हापूर यांनी याबाबतची माहिती दिली आहे

🛑व्यथा एका सभासदाची आजरा कथा.- आजरा कारखान्याची.- सभासद सुनिल शिंदे..

आजरा. – प्रतिनिधी.

आजरा साखर कारखान्याच्या होऊ घातलेल्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुनील शिंदे या सभासदाने आपली व्यथा व कारखान्याची कथा प्रसिद्धीपत्रका द्वारे प्रसिद्ध केली आहे. दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.
आजरा साखर कारखाना निवडणूक सभासदांच्यासाठी एक जुमला आजरा साखर कारखाना निवडणूक हो सभासद व कर्मचारी यांच्यासाठी एक जुमला पार्टी आहे. हे सर्व सभासदांनी ओळखले आहे. हे यांच्या लक्षात येत नसेल असे वाटत तुम्हाला? झोपेचे सोंग आहे. बारदान चोरी, बेरींग चोरी, साखर चोरी, आणखीन भरपुर काही चोऱ्या झाल्या असतील, बाहेर आल्या नाही पण ज्या बाहेर आल्या त्यांच्यासाठी कितीजण रस्त्यावर आले. कोणीही नाही. उलट पडदयाआड चोरांना वाचवण्यासाठी यांचे प्रयत्न हे आम्हा सभासदांना कळत नाही असा यांचा समज आहे. ज्यांनी २००८-२००९ साली कारखाना कर्जमुक्तीच्या उंबरठ्यावर उभा केला होता. त्यांच्या हातून कारखाना घेवून स्वतःच्या हिमतीवर चालवून दाखवतो म्हणून १९९ कोटीपर्यंत कर्जाच्या खाईत लोटला तेच म्हणतात कारखाना बिनविरोध व्हावा, कर्जमुक्त करता आला नाही आता तुमचे काय काम आहे तिथे तुम्हाला संधीचे सोने करता आले नाही. संस्था कर्जमुक्त करुन वाचविता आली नाही, स्वतःसाठी कर्जमुक्ती करुन घेवून संधीचे सोने केले. हे आम्हा सभासदांना कळते. कोण होतास तू काय झालास तू अशी अवस्था कर्मचाऱ्यांची तुम्हीच केली. स्वत:च्या चिमणी पाखरांना बाळगण्यासाठी कर्मचाऱ्यांनी रस्त्यावर केळी विकली काहींनी बेकरीत कामे केली. काहींनी चिकन विक्रीची दुकाने उघडली, काहींनी गुरं पाळली. काहींनी विम्याच्या पॉलीसी मोडून संसार चालविले. काहींनी बायकोच्या गळयातील रोज घालायचे मंगळसुत्र सोडून पोटाला चिमटा काढून केलेल २ चार तोळयाचे मंगळसुत्र बायकोकडे पाहत परिस्थितीमुळे डोळे ओले करत विकले. हे फक्त पोटाची खळगी भरण्यासाठी बाजारात जायला कामगारांना भिती वाटायची. माझा कामगार स्वाभिमानी उपाशी राहीला पण तुमच्या दारात आला नाही. आणि आता सुध्दा निम्या पगारावर पोटाला चिमटे काढत आपली चिमणी पाखरे बाळगतो. कोण होतास तू काय झालास तू हे कारभारांच्यासाठी बोलायचे झाले तर चारचाकी गाड्या शहरात फ्लॅट, शेती शेतीवर फार्म हाऊस सोन्या चांदीच्या दागिन्यांनी भरलेल घर शेतकरी व कामगारांची घरे कधी धान्यांनी सुध्दा भरलेली नाही आणि कारखाना बिनविरोध व्हावा त्यामध्ये माझ्या बगलबच्यांना संधी मिळावी साडेतीन कोटीसाठी कारखाना बंद करायला लावणारे हेच दोन वर्षे कारखाना बंद ठेवून १०० कोटीचे कर्ज कारखान्याच्या डोक्यावर चढवून कारखाना चालवणारे हेच सभासद म्हणून मा० नामदार हसन मुश्रीफ साहेबांना आम्ही काहीही दोष देणार नाही. साडेतीन कोटीची जबाबदारी घेवून कारखाना चालविणेस त्यांची तयारी होती. पण कारभाऱ्यांच्या अंतर्गत राजकारणामुळे त्यांना मदत करता आली नाही. तेव्हा त्यांना विनंती आहे कि आम्हा आजेकरांसाठी आजरा साखर कारखाना ही आमची आई आहे. तीच अस्तित्व संपले तर शेतकरी, कामगार व त्यांची चिमणी पाखर यांचेही अस्तित्व संपणार म्हणून आपण कारखान्याचे पालकत्व सांभाळून याकडे लक्ष दयावे हि कळकळीची विनंती एक सभासद
सुनिल शिंदे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली आहे.

🛑श्री नुतन नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित सुळेरान.- प॓च वार्षिक निवडणूक २०२३ ते२०२८ बिनविरोध.- ( चेअरमन सौ शेटगे
व्हा.चेअरमन श्री कांबळे यांची एकमताने निवड.)

आजरा.- प्रतिनिधी.

श्री नुतन नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित सुळेरान.- प॓च वार्षिक निवडणूक २०२३ ते२०२८ बिन विरोध करण्यात आली
चेअरमन सौ.सरस्वती ज्योतीबा शेटगे
व्हा.चेअरमन श्री रत्नाकर भैरू कांबळे हे दोन्ही बीन विरोध निवड करण्यात आली

यामधील सचालक मडळ

जयसिंग सतुराम नेवगे, विष्णू भाऊ पाटील, अशोक विष्णू शेटगे
आनंदा मारूती पाटील, दिपक तुकाराम पाटकर, बाबुराव तुकाराम बरेकर, उत्तम तुकाराम माडभगत,सौ.सरस्वती महादेव पवार
निवडणूक अधिकारी, प्रमोद फडणवीस (ए आर) यांनी काम पाहिले
गवसे पश्चिम भागातील सर्वसामान्य नागरिक सभासदांना अडचणीच्या वेळी मदत करणारी पतसंस्था म्हणून नावरुपाला आली असल्याचे सभासद वर्गातून बोलण्यात येते. संस्थेचे संस्थापक महादेव पवार यांचं काम संस्थेच्या माध्यमातून कौतुकास्पद

🛑आजरा शहरातील ( बस स्थानक परिसर.- खोकेधारकांचे तहसीलदारांना निवेदन..( राष्ट्रीय महामार्ग ठेकेदार अन्यायकारक आहेत. न्याय मिळावा.) [ पत्रकार परिषदेत दिली माहिती.]

आजरा.- प्रतिनिधी.

आजरा शहरातील (एस.टी. स्टैंड परिसर खोकेधारकांचे तहसीलदारांना निवेदन देऊन राष्ट्रीय महामार्ग ठेकेदार अन्याय करत आहेत. न्याय मिळावा. दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.
आजरा शहरातील बस स्थानक परिसरातील खोकेधारक. गेली अनेक वर्षे आमची या ठिकाणी मालकी य भाडेतत्वावर दुकाने आहेत. या दुकानांच्यावर अनेकांच्या कुटूंबाची उदरनिर्वाह चालत आहे. येथील दुकानदार सर्वसामान्य गटातील आहेत. येथील दुकानदार भाडेतत्वावर गेली अनेक वर्षे आहेत.
आजरा शहरातून राष्ट्रीय महामार्ग जात आहे. आपल्या पाठपुराव्यामुळे राष्ट्रीय मार्गाची दिशा काय राहणार आहे हे स्पष्ट झाले आहे. सर्वसामान्य घटकावर अन्याय होवू नये यासाठी आपण प्रयत्न केला आहात. अधिकारी, राष्ट्रीय महामार्ग अधिकारी यांची बैठका घेतल्या आहेत. आपल्या सूचनांवरुन राष्ट्रीय महामार्ग व्यवस्थापनाने रस्ता कसा होणार याचा नकाशा फलकावर लावला होता. एस.टी स्टैंड परिसरातील एका बाजूची गटरीचे काम सुरु आहे. काल (शनिवारी) राष्ट्रीय महामार्गाचा एक अभियंता येवून दुकानदारांना (दुस-या बाजूचे) आपली दुकाने काढू घ्या अशी सूचना केली. यावर दुकानदारांनी त्यांना वस्तूस्थिती विचारण्याचा प्रयत्न केला मात्र तुम्ही अतिक्रमण मध्ये आहात त्यामुळे दुकाने लवकरात लवकर काढून घ्या असे सांगितले आहे. त्यांनी प्रसिध्द केलेल्या नकाशाप्रमाणे गटारींचे काम करण्यास आमची कोणतीही हरकत नाही. मात्र सध्या ते नकाशाप्रमाणे न जाता मनमानी व दडपशाहीने काम करण्याचा प्रयत्न करत आहेत. गटार ते गटार काम करण्याचे यापूर्वीच्या बैठकांमधून राष्ट्रीय महामार्ग अधिका-यांनी मान्य केले असतांना ते येथील दुकानदारांना नाहक त्रास देण्याचा प्रयत्न करत आहेत.
रितसर ग्रामपंचायत/नगरपंचायतची परवानगीने हे दुकानगाळे उभे केले आहेत. मालक याचा दरवर्षी घरफाळा भरतात. कित्येक वर्षे ही दुकाने असतांना आताच ही अतिक्रमणे असल्याचे राष्ट्रीय महामार्गाला कसे कळाले? यापूर्वीही अनेकवेळा सार्वजनिक बांधकाम खात्याने अथवा
नगरपंचायतीने अतिक्रमणे काढली मात्र त्यांनी गटारींच्या वरती असणा-या दुकानदारांच्यावर कारवाई केली. त्यांनी कधीही आमची दुकाने अतिक्रमणांमध्ये असल्याचे सूचीत केलेले नाही.
तरी विनंती आहे, या प्रकाराची चौकशी करावी व संबंधीतांना सूचना कराव्यात. ठेकेदाराचे दडपशाही मार्गाने चालवलेले काम थांबवावे. पूर्वी ठरलेल्याप्रमाणेच काम करण्यास सांगाचे. शेकडो कुटूंब सदस्य आपल्या या न्यायाकडे अपेक्षेने पहात आहेत. आपण आम्हाला न्याय देवून सहकार्य करावे. असे दिलेल्या निवेदनात म्हटले आहे या निवेदनावर रवि भाटी (दुर्गा स्वीट होमोस, इस्माईत नसरदी (सेंद्रात मेडिक,अकील पुरखेड (घरात अंतु वंगारे), महालरकी कटार्स, महेश घोडीला कवदीकच्य, बाळ मिमन कृष्णा बोलके, समीर तकिलदार, सुभाष नेमरीकर, रामचंद गोपाल शिंदे, मुस्तका इमाम नाबबंद, भिकाजी गजल दिने, दत्त छन् केट गाता वाघुराने कोसले, राम दिपककर आदी व्यापाऱ्यांच्या सह्या आहेत.सदर निवेदनाच्या प्रति राष्ट्रीय महामार्ग अधिकारी जिल्हाधिकारी कोल्हापूर, व जनता अदालत जिल्हाधिकारी कार्यालय कोल्हापूर यांना देण्यात आल्या आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.