Homeकोंकण - ठाणेमराठा ही जात नाही. तर ती एक व्यापक ओळख आहे.- कुणबी म्हणजेच...

मराठा ही जात नाही. तर ती एक व्यापक ओळख आहे.- कुणबी म्हणजेच मराठा.- सरसकट कुणबी नोंद घालण्यास काही हरकत नाही.- डॉ. भारत पाटणकर.( आजरा येथील पत्रकार परिषदेत दिली माहिती. )

मराठा ही जात नाही. तर ती एक व्यापक ओळख आहे.- कुणबी म्हणजेच मराठा.- सरसकट कुणबी नोंद घालण्यास काही हरकत नाही.- डॉ. भारत पाटणकर.
( आजरा येथील पत्रकार परिषदेत दिली माहिती. )

आजरा.- प्रतिनिधी.

कुणबी म्हणजेच मराठा व मराठा म्हणजेच कुणबी आहे. यामध्ये आरक्षण देण्याचा प्रश्न उद्भवत नसल्याचे आजरा येथील पत्रकार परिषदेत श्रमिक मुक्ती दलाचे अध्यक्ष डॉ.भारत पाटणकर यांनी माहिती दिली ते बोलताना म्हणाले
कुणबी मराठा समाजाची फसवणूक करून आंदोलन चिघळण्याचे प्रयत्न महाराष्ट्रातील सत्ताधारी आणि विरोधी पक्षाने एकजुटीने चालवलेले आहे. पण याला कुणबी मराठा समाजाचे आंदोलन भीक घालणार नाही ब्रिटिश काळामध्ये १८७२ ते १८८१ या काळात झालेल्या जनगणना आणि गॅजेट सर्वेच्या माध्यमातून सविस्तरपणे दिलेली माहिती वस्तुस्थिती हे स्पष्ट करते की काही ठिकाणी आजही कुणबी म्हणून ओळखली जाणारी जात आणि त्याकाळी कुणबी म्हणून ओळखली जाणारी पण आज मराठा म्हणून ओळखला जाणारा जात विभाग हे सर्व एकच कुणबी जातीचे आहेत. १९३०/३१ पर्यंत झालेल्या जनगणनानुसार सुद्धा हे चित्र स्पष्ट होते मराठा ही जात नाही. तर ती एक व्यापक ओळख आहे. आज ही पश्चिम महाराष्ट्रात सह महाराष्ट्राच्या सर्व जिल्ह्यांमध्ये हजारो कुटुंबाकडे कुणबी दाखले आहेत. त्याची ओळख मराठा आहे. मराठ्यांचे असेच पुरावे हैदराबाद मध्ये उपलब्ध आहेत. त्यामुळे मराठा कुणबी ओळखल्या जाणाऱ्या समाजाला सरसकट कुणबी दाखले देण्यातला कोणताही कायदेशीर अडचण नाही. आणि त्याचबरोबर आधीपासूनच कुणबी ही जात आरक्षण मिळाल्यास पात्र आहे. त्यामुळे त्यासाठी केंद्र सरकारकडून काही होण्याची गरज नाही सुप्रीम कोर्टात जाण्याची गरज नाही. सर सगळं कुणबी प्रमाणपत्र सरकारने शासन निर्णय काढून तातडीने देण्याचा कालबद्ध कार्यक्रम अति ताकदीने करावा चर्चेचे राजकारण बंद करावे जरांगे पाटील यांचा जीव वाचवावा मराठा आंदोलकांची यशस्वी सांगता होण्यासाठी उद्याच्या उद्या निर्णय घ्यावा. याबाबतची भूमिका आजरा येथे श्रमिक मुक्ती दलाचे अध्यक्ष डॉक्टर भारत पाटणकर यांनी पत्रकार परिषदेत भूमिका मांडली व मराठा समाजाला पाठिंबा देण्यात आला. यावेळी कॉम्रेड संपत देसाई, संजय घाटगे काशिनाथ मोरे सह श्रमिक मुक्ती दलाचे पदाधिकारी उपस्थित होते.

चौकट.

यावेळी डॉ. श्री पाटणकर यांनी मांडलेले प्रमुख मुद्दे
१) कुणबी मराठा समाजाला सरसकट महाराष्ट्रभर कुणबी प्रमाणपत्र देण्याचा पूर्ण सबल आधार
२) कुणबी प्रमाणपत्रे दिल्यावर आरक्षण देण्यात कोणताही अडथळा नाही कारण कुणबी आरक्षणाला पात्र आहेतच ओबीसी मध्ये समावेश करण्यासाठी वेगळे काही करण्याची गरज नाही.
३) सर्वोच्च न्यायालयाच्या मान्यतेचा प्रश्नच नाही.
४) कुणबी प्रमाणपत्र देण्याचा शासन निर्णय काढला म्हणजे आंदोलनाचा प्रश्न संपतो.
५) सरकार आणि सर्व पक्ष हे अभ्यास नसल्यामुळे हे मान्य करत नाहीत किंवा ते झोपेचे सोंग घेत आहेत
.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.