Homeकोंकण - ठाणेदीडशे कोटी आणावे कारखाना बिनविरोध ताब्यात देऊ.- आजरा साखर विरोधी आघाडी मेळाव्यात...

दीडशे कोटी आणावे कारखाना बिनविरोध ताब्यात देऊ.- आजरा साखर विरोधी आघाडी मेळाव्यात अशोक चराटी यांना आवाहन. ( कै.. वसंतराव देसाई यांच्या नावाच्या पॅनलची केली घोषणा.)

दीडशे कोटी आणावे कारखाना बिनविरोध ताब्यात देऊ.- आजरा साखर विरोधी आघाडी मेळाव्यात अशोक चराटी यांना आवाहन. ( कै.. वसंतराव देसाई यांच्या नावाच्या पॅनलची केली घोषणा.)

आजरा.- प्रतिनिधी.

आजरा साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चरटी व शिंपी गटाचा मेळावा मंगळवार दि.१ रोजी झाला होता. यामध्ये अशोक चराटी यांनी केंद्रातून नेते अमित शहा व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून दीडशे कोटी आणून कारखाना कर्जमुक्त करतो अशी घोषणा केली होती. या घोषणेला प्रत्युत्तर व कारखाना निवडणूक बिनविरोध व्हावी. याबाबत कामगार व काही संचालकांचा मेळावा बुधवार दि. २ रोजी आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी संचालक मंडळाने आपली भूमिका मांडली यामध्ये संचालक मुकुंदराव देसाई स्वागत करताना म्हणाले दरम्यानच्या काळात कारखाना बंद पडल्यानंतर केडीसी बँकेमुळे कारखाना चालू झाला पण “हमारे पास बहुत पैसा है” असे म्हणणारे कारखान्याची अवस्था बंद पडण्यापर्यंत चालू ठेवली व आज कारखान्याच्या निवडणुकीच्या तोंडावर पुन्हा दीडशे कोटी आणण्याची भाषा करतात त्यांनी दीडशे कोटी आणावे आम्ही कारखाना बिनविरोध करून ताब्यात देऊ परंतु सभासद व कामगारांना भुलतापा देऊ नये व या भूलथापांना कामगार व सभासदांनी बळी पडू नये असे श्री देसाई बोलताना म्हणाले.
संचालक विष्णुपंत केसरकर यांनी कारखान्याचा मागील इतिहास मांडला ५० हजार टन ऊस गाळप करत आज उसाचं क्षेत्र सभासदांच्या सहकार्याने वाढत गेले परंतु सद्यस्थितीला प्राप्त परिस्थितीचा विचार केला पाहिजेत व एक पाय मागे पाहिलं पाहिजेत नकळत झालेल्या चुका जाऊ द्या परंतु मागील सात वर्षाच्या काळात निवडणुका कोरोनामुळे झाल्या नाहीत तीन ३/१३ करून गेले व कारखाना बंद पडला यापुढे अशी भूमिका घेतली तर कारखान्याची धुराडे बंद पडून मशनरी गंजून जाते हा विचार करून हसन मुश्रीफ यांच्या माध्यमातून ७० कोटीची तरतूद केली व नैतिक जबाबदारी पार पाडली तीन लाख क्रशिंग करून भागणार नाही यापेक्षाही अधिक क्रशिंग झाले पाहिजेत कारखान्याचे भवितव्य सभासद व ऊस उत्पादक कामगार यांच्या हातात आहे पोकळ घोषणा व भूलथापांना बळी पडू नये कोणी जर दीडशे कोटी आणत असेल त्याला आम्ही कारखाना ताब्यात देऊ असे श्री केसरकर बोलताना म्हणाले
संचालक सुधीर देसाई म्हणाले कारखाना आर्थिक अडचणीत आहे यामुळे बैठकीचे नियोजन नव्हते पण विरोधकांचे पुढचे पाऊल पाहून बैठक घेण्याचे आयोजन केले. आज ही आमची भूमिका बिनविरोधीची आहे परंतु चराटी यांनी केलेल्या वक्तव्याशी ठाम राहून दीडशे कोटी आणावे आम्ही बिनविरोध साठी पाठिंबा देऊ मुश्रीफ साहेब यांनी 70 कोटी दिले म्हणून कारखाना चालू झाला हे विसरू नये असे श्री देसाई म्हणाले
यावेळी वसंतराव धुरे म्हणाले अशोक चराटी यांच्या काळात मागील कारखान्याचा कारभार व ताळेबंद तीस कोटीच्या तोटा चा ताळेबंद होता. व खापर दुसऱ्यावर फोडले व मेळावा घेऊन आज दीडशे कोटी देण्याची भाषा करतात तुम्ही जर माघारी दीडशे कोटी आणला तर आम्ही आपल्या ताब्यात कारखाना देऊ परंतु आमच्या पॅनल ची भूमिका ना.हसन मुश्रीफ आम. सतेज पाटील जो निर्णय देतील त्या पद्धतीने पॅनल ची रचना करून निवडणुकीला सामोरे जाऊ असे श्री. धुरे म्हणाले
संचालिका अंजनाताई रेडेकर यांनी आपली भूमिका मांडताना म्हणाल्या आज ही माझे मत कारखाना बिन विरोध व्हावा अशीच आहे .पण ज्यावेळी निवडणूक लागेल त्यावेळी जे बोलायचं ते सर्वप्रथम बोलेल परंतु कारखाना आर्थिक अडचण असताना निवडणुकीला सामोरे जाणे चुकीचे आहे व ते सभासदांच्या हिताचे नाही निवडणूक लागल्यास सभासद कामगार यांनी कोणत्याही एका पॅनलला विजयी करावे परंतु भुल थापांना बळी पडू नये असे श्रीमंती रेडेकर म्हणाल्या.
अनिल फडके यांनी आभार मानले.
यावेळी एम के देसाई, विठ्ठलराव देसाई सह कामगार संजय उत्तुरकर बाळासाहेब देसाई, रमेश देसाई प्रभाकर कुंभार, बाळू देसाई सुहास बुगडे चंद्रकांत सांबरेकर सह कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

चौकट.

कामगार संघटनेचे अध्यक्ष प्रकाश देसाई.

कारखाना बंद काळात कारखाना चालू झाला ते हसन मुश्रीफ व विविध संस्थेच्या माध्यमातून यावेळी कामगार यांनीही आपला अर्धा पगार कपात केला कारखाना अडचणीत असताना दोन्ही पॅनलची रचना होत आहे परंतु कामगारांच्या बाबत एक वर्ष पगार कपात करायचा होता आता तरी पगार वाढीव द्यावा. याबाबत विचार करावा परंतु आम्ही आपल्याला पाठिंबा देतो अशोक चराटी यांनी दीडशे कोटी आणण्याची घोषणा करत कारखाना कर्जमुक्त करतो असे सांगितले आपणही कारखाना कर्जमुक्ती बाबत व कामगारांच्या व सभासदांच्या कारखान्याच्या हिताबाबत घोषणा करावी आम्ही आपल्या सोबत राहू असे कामगार संघटनेच्या अध्यक्ष व कामगारांच्या वतीने श्री देसाई यांनी आपले मत व्यक्त केले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.