🛑कुणबी मराठा समाजाला तात्काळ आरक्षण द्या.- अन्यथा यापेक्षाही मोठे आंदोलन उभे राहिले – आजऱ्यात मराठा समाजाचा रास्ता रोको.
🛑ग्रामदैवत रवळनाथ व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पाच धरणातील पाण्याचा जलाभिषेक करणार.- आजरा सकल मराठा समाज.
🛑मराठा-कुणबी आरक्षणासाठी सुरू असलेल्या आंदोलनामुळे बिगरशेतीचे – मुक्ती संघर्ष मोर्चा व बेमुदत ठिय्या आंदोलन तात्पुरते स्थगित – संग्राम सावंत.
आजरा.- प्रतिनिधी.
मराठा आरक्षणासाठी आंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे पाटील याचे दि. २५/१०/२०२३ पासून आमरण उपोषण चालू आहे. जरागे पाटलांच्या आमरण उपोषणाल आजरा तालुका सकल मराठा समाजवासीयांकडून पाठिंबा देण्यासाठी दि.३०/१०/२०२३ पासून साखळी उपोषणाला सुरुवात झाली आहे..सोबत दि.१ रोजी आजरा येथील संभाजी महाराज चौकात रास्ता रोखो करुन शासनाचा निषेध व जंगारे पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा म्हणून सर्व समाजाच्या वतीने रास्ता रोखो करण्यात आला दोन तास हा रास्ता रोखो करण्यात आला.
यावेळी सकल मराठा समाज्याच्या वतीने मारुती मोरे यांनी उपस्थित मराठा बांधवाचे स्वागत केले या रास्ता रोखो दरम्यान मराठा व अन्य समाजाच्या वतीने मराठा समाजाला आरक्षण मिळाळेच पाहिजे यासाठी मनोगत व्यक्त केले यामुळे मसणु सुतार, प्रभाकर कोरवी, युवराज पोवार, सुधीर कुंभार, बंडोपंत सावंत, राजु होलम, राजु पोतणीस, सौ. रचना होलम, राजश्री देसाई, समीर खेडेकर सह मराठा बांधवाना सरसकट मराठा आरक्षण मिळाले पाहिजे शिक्षण व नोकरीमध्ये आरक्षण नसल्याने मराठा तरुणांना सुशिक्षित बेकार व बेरोजगार होत आहेत. शिक्षणात गुणवत्ता असूनही आरक्षणामुळे वंचित घटाकापासून समाज मागे आहे.अशी मनोगते व्यक्त केली.
सदरच्या रास्ता रोखो आंदोलनात तालुक्यातील प्रत्येक गावातील सर्व धर्मिय बांधव. सकल मराठा समाजाचे नागरिक शांतपणे येऊन पाठिंबा दिला. आपला सहभाग मोठ्या संख्येने दाखविला या आंदोलनाबाबत मराठ्यांना सरसकट कुणबी दाखले देऊन ५० १% चे आत्तील आरक्षण देणेसाठी मागणी केली साखळी उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी येणाऱ्या सकल मराठा समाजाच्या नागरिकांनी शांततेत येऊन उपोषणाला पाठिंबा द्यावा असे आवाहन सकल मराठा समाजाच्या वतीने मारुती मोरे यांनी केले आहे. आंदोलना स्थळी मारुती मोरे जिल्हा समन्वयक, संभाजीराव इंजल कार्याध्यक्ष चंद्रकांत देसाई उपसमन्वयक, बडोपंत चव्हाण तालूका समन्वयक, चंद्रकांत सरदेसाई कार्यकारणी सदस्य सुर्यकांत आजगेकर, अमर पाटील, कार्यकारणी सदस्य सह सकल मराठा समाज बांधव सहभागी होते.
ग्रामदैवत रवळनाथ व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पाच धरणातील पाण्याचा जलाभिषेक करणार.
आजरा.- प्रतिनिधी.
ग्रामदैवत रवळनाथ व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पाच धरणातील पाण्याचा गुरुवारी जलाभिषेक करण्याचा सकल मराठा समाजाचा निर्णय घेतला आहे.
मराठा समाजाला तातडीने आरक्षण व मनोज जरांगे यांच्या आमरण उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी आजऱ्याचे ग्रामदैवत रवळनाथ व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला तालुक्यातील पाच धरणांच्या पाण्याचा जलाभिषेक घातला जाणार आहे. सकल मराठा समाजाच्या वतीने गुरुवार दिनांक 2 नोव्हेंबर रोजी सकाळी १० वाजता हा जलाभिषेक केला जाणार आहे. चित्री, आंबेओहोळ, एरंडोळ, उचंगी, खानापूर या धरणातील पाणी त्या गावचे सरपंच आजऱ्यात घेऊन येणार आहेत. आजरा तालुक्यातील सर्व सकल मराठा बांधवांनी सकाळी १० वाजता छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यासमोर उपस्थित रहावे असे आवाहन सकल मराठा समाजाच्यावतीने करण्यात आले आहे.
मराठा-कुणबी आरक्षणासाठी सुरू असलेल्या आंदोलनामुळे बिगरशेतीचे – मुक्ती संघर्ष मोर्चा व बेमुदत ठिय्या आंदोलन तात्पुरते स्थगित – संग्राम सावंत.
आजरा.- प्रतिनिधी.
मराठा-कुणबी आरक्षणासाठी सुरू असलेल्या आंदोलन व तहसीलदार समीर माने यांनी चौकशी सुरू असलेबाबाबची माहितीच्या अधारावर बिगरशेतीचे मुक्ती संघर्ष मोर्चा व बेमुदत ठिय्या आंदोलन तात्पुरते स्थगित केले असल्यानेचे राज्याध्यक्ष मुक्ती संघर्ष समितीचे संग्राम सावंत यांनी प्रसिद्धीपत्रक दिले आहे. दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे. बुरुडे (ता. आजरा) येथील नविन वसलेल्या भावेश्वरी कॉलनीमधील सर्व बिगरशेती एन ऐ गट क्रमांक यामध्ये तेथे गटर्स, रस्ते, वीज पुरवठा या पायाभूत सुविधा दिलेल्या नाहीत. संबंधीत जागामालकांनी अशा कोणत्याही सेवासुविधा न देता या प्लॉटमधील रहिवाशांची फसवणूक केली आहे.याबाबतीत ताबडतोब कार्यवाही करण्यासाठी पाठपुरावा करावा.
आजरा तालुक्यातील सर्व बिगरशेती NA आदेशानुसार सर्व गट नंबर मधील फेरफार कसे घातले आहेत. याबाबतीत संबंधित तलाठी व मंडळ अधिकारी आणि NA संदर्भातील आदेश (ऑर्डर) कशा झालेल्या आहेत. याबाबतीत तत्कालीन सर्व तहसिलदार या सर्वांची सखोल चौकशी झाली पाहिजे. याबाबत कार्यवाही व्हावी. उपविभागीय अधिकारीसो, गारगोटी जि.कोल्हापूर यांच्याकडे मा.तहसिलदारसो, आजरा यांनी केलेल्या कार्यवाहीचा स्वयंस्पष्ट पुराव्यानिशी अहवाल सादर केला आहे की नाही. याबाबतीत खुलासा मिळावा.तसेच त्या अहवालाची प्रत मुक्ती संघर्ष समिती या संघटनेला छायांकित प्रत मिळावी. देवर्डे ता.आजरा जि.कोल्हापूर येथील गायरान गावठाणवाढ गट नं. ३४० मागण्यांसदर्भात आजपर्यंत झालेली दप्तर दिरंगाई पूर्ण करुन लोकांना न्यायीक बाजूने न्याय देण्यासाठी, या संदर्भात तत्कालीन डॉ.संपत खिलारी, उपविभागीय अधिकारी, आजरा- भुदरगड उपविभाग, गारगोटी जि. कोल्हापूर यांच्या बरोबर गुरुवार दिनांक २४ जानेवारी २०१९ रोजी तहसिल कार्यालय आजरा येथे मुक्ती संघर्ष समिती या संघटनेबरोबर बैठकीदरम्यान चर्चा झालेल्या मुद्दांची अंमलबजावणी होण्यासाठी व परिपूर्ण अहवाल मा. जिल्हाधिकारी, कार्यालय कोल्हापूर यांना पाठविण्याची कार्यवाही ताबडतोब झाली पाहिजे. वरील वरील मुद्द्यांच्या संदर्भात तहसीलदार कार्यालयामध्ये मा.उपविभागीय अधिकारीसो, गारगोटी जि.कोल्हापूर यांच्याबरोबर मा.तहसिलदारसो, आजरा यांनी संघटनेबरोबर बैठक लावून याबाबतीत सविस्तर चर्चा करून त्याचे इतिवृत्त (प्रोसेडिंग) तयार करावे.या बैठकीची तारीख, वेळ संघटनेला कळविण्यात यावी. यासंदर्भात तहसिलदार आजरा यांना निवेदन देण्यात आले आहे.
मागण्यांबाबत दि.१ नोव्हेंबर २०२३ रोजी छ.शिवाजी महाराज पुतळा ते तहसिलदार कार्यालय आजरा जि.कोल्हापूर येथे “संघर्ष मोर्चा” काढून तहसिलदार कार्यालय आजरा यांच्या आवारात “बेमुदत ठिय्या आंदोलन” मुक्ती संघर्ष समितीच्या वतीने करणार होतो.आज ते स्थगित करीत आहोत. संबंधित जागा मालकांनी प्लाट अकृषक(बिगरशेती-NA) करून राहण्यासाठी विकले. पण तेथे गटर्स, रस्ते, वीज पुरवठा या पायाभूत सुविधा दिलेल्या नाहीत. संबंधीत जागामालकांनी अशा कोणत्याही सेवासुविधा न देता या प्लॉटमधील रहिवाशांची फसवणूक केली आहे. सध्या आपआपल्या खरेदी प्लॉटमध्ये नागरिकांनी गरजेपोटी घरे बांधली आहेत. परंतु घरांचे सांडपाणी किंवा ये जा करण्यासाठी रस्ते किंवा लाईट्स याची कोणत्याही प्रकारच्या सोयी सुविधा दिलेल्या नाहीत. जागेची प्रत्यक्ष पाहणी करुन आम्हा रहिवाश्यांना मंडळ अधिकारी गेले आहेत.पण न्याय मिळाला नाही. बुरुडे (ता. आजरा) येथील नविन वसलेल्या भावेश्वरी कॉलनीमधील सर्व बिगरशेती NA गट क्रमांक यामध्ये निवासी रहिवासाकरीता अकृषक (NA) प्लॉट तयार करून जागा मालकांनी विक्री केली. पण येथे पायाभुत सुविधा दिलेल्या नाहीत. त्या सुविधा द्याव्यात अशी मागणी येथील रहिवाशांनी या केलेली आहे व होती. याबाबतचे याअगोदर भावेश्वरी कॉलनी, बुरूडे आजरा जि.कोल्हापूर येथील रहिवाशांनी निवेदन आजरा तहसीलदार, आजरा यांना दिलेले आहे. आमच्या आंदोलनाची दखल घेऊन तहसीलदार यांनी आमच्याशी पत्रव्यवहार केला आहे. मात्र हा नुसता पत्रव्यवहार नकोय. याबाबत ठोस कारवाई करण्यासाठी कार्यवाहीची अंमलबजावणी झाली पाहिजे असा आग्रह राहणार आहे. मात्र यावर ठोस कार्यवाही केली नाही तर पुन्हा संघर्ष मोर्चा काढून बेमुदत ठिय्या आंदोलन तहसिलदार कार्यालय आजरा यांच्या आवारात करणार आहोत. असे दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे. या प्रसिद्धिपत्रकावर संग्राम सावंत राज्याध्यक्ष मुक्ती संघर्ष समिती
सुनिल हरेर, संजय कुंभार, अनिल चौगले, विनोद ओतारी, लखन पाटील, संगीता जादूनवर ,मंगल घोरपडे ,मोहन गावडा
भावेश्वरी कॉलनी,बुरूडे आजरा रहिवासी प्लॉटधार आणि प्रमोद पाटील, दिंगबर विटेकरी, संघर्ष प्रज्ञावंत, संजय कांबळे, मजीद मुल्ला, समीर खेडेकर,राहुल दास, पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या सह्या आहेत
