HomeUncategorizedदिवसभराच्या घडामोडी.- चुलीत गेले नेते,- चुलीत गेले पक्ष💥👉मराठा आरक्षण एकच लक्ष. 👇...

दिवसभराच्या घडामोडी.- चुलीत गेले नेते,- चुलीत गेले पक्ष💥👉मराठा आरक्षण एकच लक्ष. 👇 🛑जालन्यातल्या चंदनझिऱ्यात राजकीय पुढाऱ्यांना गावबंदी. गावाच्या मुख्य प्रवेशद्वारावर मराठा तरुणांनी लावले गावबंदीचे बॅनर ⚫👉

दिवसभराच्या घडामोडी..

🛑चुलीत गेले नेते,- चुलीत गेले पक्ष,💥💥👉मराठा आरक्षण एकच लक्ष. 👇
🛑जालन्यातल्या चंदनझिऱ्यात राजकीय पुढाऱ्यांना गावबंदी.।
गावाच्या मुख्य प्रवेशद्वारावर मराठा तरुणांनी लावले गावबंदीचे बॅनर

जालना :- प्रतिनिधी.

सध्या राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा तापला असून आरक्षणाच्या मागणीसाठी आता मराठा समाज बांधव आक्रमक होत आहेत. मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांच्या सभांना मोठा प्रतिसाद मिळताना दिसतोय. मराठा बांधव आरक्षणाच्या मागणीवर ठाम आहेत.मराठा समाजाला आरक्षण मिळावे अशी राज्यातील मराठा बांधवांकडून मागणी केली जात आहे. राजकीय पुढाऱ्यांना गावात प्रवेशबंदी करत सरकार विरोधात मराठा बांधव आपला रोष व्यक्त करत आहेत. 🛑गावागावात राजकीय पुढार्‍यांना प्रवेश बंदी करत मतदानावर बहिष्कार टाकून सरकार विरोधात मराठा बांधव आपला रोष व्यक्त करताय. त्याच पार्श्वभूमीवर आज जालना शहरातील चंदनझिरा गावात मराठा बांधवांनी सर्वानुमते निर्णय घेत राजकीय पुढार्‍यांना प्रवेश नाकारलाय. गावाच्या प्रवेशद्वारावर मराठा बांधवांनी चुलीत गेले नेते चुलीत गेले पक्ष, मराठा आरक्षण एकच लक्ष असा उल्लेख असलेले बॅनर लावले आहेत. मराठा आरक्षण मिळेपर्यंत सर्व आजी-माजी आमदार खासदार, मंत्री सर्व राजकीय पुढार्‍यांना चंदनझिरा गावात प्रवेश बंदी करण्यात आलीय. मराठा आरक्षणाचा मुद्दा आता चांगलाच तापला असून मराठा बांधव आता आरक्षणाच्या मागणीसाठी आता आक्रमक होत आहेत.
⚫⚫

.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.