गर्भाशयाच्या कॅन्सर पासून मुक्त करण्याचा गर्जना प्रतिष्ठानचा प्रयत्न.- आजऱ्यात मोफत एचपीव्ही लसिकरण कॅम्पचे आयोजन.🛑
कारखान्याच्या निवडणुकीच्या तोंडावर – ४०० रु मिळाल्याशिवाय थांबायचे नाही.
आजरा.- प्रतिनिधी.
कॅन्सर पेशंट्स एड असोशिएशन च्या सहकार्यातून गर्जना प्रतिष्ठानने मंगळवार दि १७ ऑक्टोबर रोजी उत्तूर विद्यालय, उत्तूर येथे व बुधवारी 18 ऑक्टोबर रोजी आजरा हायस्कुल, आजरा येथे मोफत एचपीव्ही लसीचा कॅम्प आयोजित करण्यात आला होता ज्यामध्ये एकूण 1000 मुलींना मोफत लस देण्यात आली. यामध्ये आजरा हायस्कुल, आजरा महाविद्यालय, रोझरी हायस्कुल, पंडित दीनदयाळ हायस्कुल, हत्तीवडे हायस्कुल, आप्पासाहेब गायकवाड हायस्कुल महागोंड च्या मुलींनी लसीकरणाचा लाभ घेतला. आजरा येथील कार्यक्रमात सुरुवातीला मुलींना लसीसंदर्भात मार्गदर्शन करण्यात आले. कॅन्सर आणि कॅन्सर विरोधी लढ्यात लसीचे फायदे याविषयी माहिती देण्यात आली. यावेळी चंदगड -आजरा विधानसभेचे भाजप चे नेते संग्राम कुपेकर, गर्जना प्रतिष्ठान चे प्रमुख प्रकाश बेलवाडे, अध्यक्ष दिगंबर मिसाळ, सचिव संतोष बेलवाडे, आजरा पोलीस निरीक्षक सुनील हारूगडे, आजरा महाविद्यालयाचे व्यवस्थापक योगेश पाटील, कॅन्सर पेशंट्स एड च्या डायरेक्टर डॉ नुपूर खरे, यांनी मार्गदर्शन केले. यावेळी आजरा महाविद्यालयचे प्रचार्य सादळे सर, आजरा हायस्कुल चे उपमुख्याध्यापक दरी सर, उमेश पारपोलकर, विराज बिल्ले, अभिषेक रोडगी, सुहास जोंधळे, राहुल कांबळे, बाजीराव लोखंडे इ मान्यवर उपस्थित होते. विनायक चिटणीस यांनी आभार मानले.
🛑कारखान्याच्या निवडणुकीच्या तोंडावर – ४०० रु मिळाल्याशिवाय थांबायचे नाही.
आजरा.- प्रतिनिधी.

आजरा साखर कारखान्याची निवडणूक तोंडावर आहे.. मागील वर्षी घातलेल्या उसाला ४०० रुपये मिळवून देण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना पदयात्रा काढून जणजागृती करत आहे. त्याला साथ द्यावी असे आवाहन करण्यात आले आहे. आता ४०० रुपये घेण्याची चांगली संधी शेतकऱ्यांना आली आहे. हक्काने मागा, संघटनेला साथ द्या. दिले नाही. तर हिसकावून घेवू. गडगंज झालेल्या संचालकांनी कधीच शेतकऱ्यांच्या जगण्याचा हिशेब मांडला नाही केवळ कारखान्यावरील कर्जाचा बोजा दाखवून भावनिक खेळ करत आहेत. कारखाना अडचणीच्या वेळी शेतकऱ्यांनी व्यवस्थापन व संचालकांना साथ दिली आहे.आता साखरे सह उपपदार्थांना चांगला दर मिळाला आहे. त्यामुळे संचालकांनी शेतकऱ्यांना ४०० रुपये द्यावेच लागतील. न दिल्यास त्यांना जाब विचारावा लागेल. कारखान्याची निवडणूक लागली आहे. मतदान मागण्यासाठी येतील त्यानां गावाच्या वेशीवरच आडवावे लागेल. घात आले शेतकऱ्यांनो संधी सोडू नका. असे आवाहन स्वाभिमानी संघटनेचे राजेंद्र गड्याण्णावर, प्रदेशाध्यक्ष प्रा.जालंदर पाटील, ता. अध्यक्ष तानाजी देसाई यांनी केले. संभाजी महाराज चौकात कॉर्नर सभा झाली. यावेळी कृष्णा पाटील, सखाराम केसरकर, सुरेश पाटील, निवृत्ती कांबळे यांच्यासह संघटनेचे कार्यकर्ते व शेतकरी उपस्थित होते.
