अनुतरा २०२३ अंतर्गत प्रश्नमंजुषा स्पर्धेत आजरा हायस्कूलचे यश..
आजरा.- प्रतिनिधी.

आजरा हायस्कूल येथे दि. १६ आजरा,रोजी ‘अनुतरा २०१३’ या स्पर्धेन आजरा हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी द्वितीय क्रमांक प्राप्त केला. त्याबद्दल त्या विद्यार्थ्यांचे कौतुक करण्यात आले. संत गजानन महाराज पॉलिटेक्निकल कॉलेज, महागाव येथे आयोजित राज्यस्तरीय अनुतरा २०२३ या स्पर्धेअंतर्गत एस. जी. एम. जीनिअस २०२३ या स्पर्धेत जाजरा हायस्कूल मधील विद्यार्थी कुमारी, अंजली केसरकर, प्रेरणा लवटे, सोहम इंजल, आर्यन कामत यांनी द्वितीय क्रमांक प्राप्त केला. बक्षिसपाल विद्यार्थ्याना रोख बक्षीस, प्रशस्तीफाक वे चषक देवून सन्मानित केले गेले. आजरा, गडहिंग्लज व चंदगड या तीन तालुक्या-तील जवळपास २०० शाळांचा समावेश होता. या यशामध्ये श्री. कुंडलिक नावलेकर सरांचे मार्गदर्शन लाभले. व साकेचे मुख्याध्यापक थी. एस. आर. कुलकर्णी सर, उपमुख्याध्यापक भी. बी. एम. दरी सरांचे प्रोत्साहन लाभले.
भारत राष्ट्र समिती तसेच शेतकरी संघटना एकत्रित काम करणार कोल्हापूर जिल्हा बैठकीत निर्णय !
कोल्हापूर.- प्रतिनिधी .

भारत राष्ट्र समिती तसेच शेतकरी संघटना संयुक्त बैठक कोल्हापूर शासकीय विश्रामगृह येथे पार पडली.
दिनांक १६/१०/२०२३ रोजी आयोजित बैठकीत कोल्हापूर जिल्ह्यात बी.आर.एस पक्ष तसेच शेतकरी संघटना एकतरी काम करणार असल्याचे निर्धार कोल्हापूर जिल्हा बैठकीत आज सयूंक्तपणे घेण्यात आला. आब की बार किसान सरकार चा नारा देत तेलंगणा मुख्यमंत्री तसेच भारत राष्ट्र समिती चे अध्यक्ष के.चंद्रशेखर राव यांच्या नाऱ्याला कोल्हापूर जिल्ह्यातून मोठा प्रतिसाद मिळत असल्याचे देखील ह्या बैठकीत सांगण्यात आले. कोल्हापूर जिल्ह्यातील समन्वयक यांची सभासद नोंदणी अंतिम टप्यात आहे तशेच लाखो च्या संख्येने सभासद नोंदणी झाली असून येणाऱ्या लोकसभेत आम्ही आम्हीच ताकत प्रस्थापितांना कोल्हापूर मध्ये नक्की दाखवू असे मा.सौ.श्रद्धा महागावकर यांनी सांगितले तसेच येणाऱ्या २१ दिवसात कोल्हापूर जिल्हायची कार्यकारणी लोकसभा निवडणुकीच्या पर्शवभूमी लक्षात घेता वरिष्ठांच्या आदेश घेऊन जाहीर करुत असेही त्यांनी सांगितले. शेतकरी संघटनेचे राजेश उर्फ बाळ नाईक यांनी बैठकीत शेतकरी यांचे प्रश्न समोर ठेवताना तेलंगणा राज्याचे शेतकऱ्यांसाठी असणे मॉडेल जर महाराष्ट्रात राबविले तर महाराष्ट्रातला शेतकरी सुखावेल तसेच महाराष्ट्रात कधीच कोणता शेतकरी आत्महत्या करणार नाही तसेच इथून पुढच्या काळात कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते तसेच अनेक पद्धधिकारी बी.आर.एस पक्षा सोबत खांद्याला खांदा लावून काम करेल हे देखील त्यांनी सांगितले.बेरोजगरीवर वर बोलताना हातकणंगले चे सतीश मोटे यांनी राज्यात बेरोजगारी हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे आणि ह्या वर लवकरच पक्षाच्या वतीने आंदोलन करुत असे मत व्यक्त केले. मनिशसिंह महागावकर यांनी आभार मानले तसेच येणाऱ्या काळात कोल्हापूर जिल्ह्यात भारत राष्ट्र समिती हा एकमेव चांगला पर्याय जनते समोर असेल हे सांगितले. सदर बैठकीत कोल्हापूर जिल्ह्यातील विविध संघटनेच्या प्रमुखांचा प्रवेश घेण्यात आला तसेच त्यांना पुढील कामासाठी शुभेच्छा देण्यात आल्या ह्या वेळी संग्राम गायकवाड सरकार, सौ.श्रद्धा महागावकर , राजेश (बाळ)नाईक ,बाबुराव पाटील ,सतीश मोटे ,मयूर मोहिते,कावडे , गणेश तडाखे , शाहिद शेख, सुहास हुपरिकर, सुभाष पाटील , बी.जी.मांगले , मनीष महागावकर, निशा कांबळे , शाहीन बरगिर , सुमाय पटेडही , प्रसाद सुतार , अय्यज मुजावर आदी कार्यकर्ते उपस्तीत होते.
