🛑प्रा.आरोग्य केंद्र=वांटगी सर्व गटप्रवर्तक व आशाताई विविध मागणीसाठी बेमुदत संपावर.
🛑विद्यार्थी विकास परिषदेची शिष्यवृत्तीधारकांच्या मानधन वाढीची मागणी. पालकमंत्र्यांकडे निवेदनाने मागणी.
🔴 पुण्यातील ड्रग्ज तस्कर ललित पाटील याला अखेर चेन्नईमधून अटक.
आजरा.- प्रतिनिधी.

आजरा तालुक्यातील प्रा.आरोग्य केंद्र=वांटगी येथील सर्व गटप्रवर्तक व आशाताई विविध मागणीसाठी बेमुदत संपावर गेल्या आहेत.
आशा व गटप्रवर्तक यांना ऑनलाईन होणाऱ्या कामाच्या सक्ती बाबत १८ ऑक्टोबर पासून बेमुदत काम बंद आंदोलन करण्यात आले आहे. याबाबतचे निवेदन कोल्हापूर जिल्हा अशा वर्कर्स व गटप्रवर्तक युनियन ( सिटू संलग्न ) यांच्या वतीने आजरा तालुका अध्यक्ष दीपा बुरुड यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा आरोग्य अधिकारी यांना देण्यात आले आहे. दिलेल्या निवेदनात म्हटले आहे कोल्हापूर जिल्ह्यातील आरोग्य विभागाअंतर्गत कार्यरत असणाऱ्या अशा व गटप्रवर्तक यांना ऑनलाईन कामावर होणाऱ्या सक्ती बाबत येत्या १८ ऑक्टोबर २०२३ पासून कृती समितीच्या वतीने पूर्ण महाराष्ट्रावर अशा व गटप्रवर्तक बेमुदत काम बंद आंदोलन करणार आहोत. काही मागण्या केल्या आहेत
१) गटप्रवर्तकांचे समायोजन करा २) अशा व गटप्रवर्तक यांच्यावरील ऑनलाईन कामाची सक्ती पूर्णपणे बंद करा. ३) अशा व गटप्रवर्तक यांना दिवाळी बोनस द्या. ४) अशा व गटप्रवर्तक यांच्या मानधनात केंद्रा सरकारने वाढ करावी. ५) केंद्र शासनाचे व राज्य शासनाकडून मंजूर मानधन एकत्रित तसेच वेळेवर मिळावे. ७) आरोग्यवर्धिनी मध्ये गटप्रवर्तकांचाह समावेश करण्यात यावा. वरील मागणीचे निवेदन तालुका वैद्यकीय अधिकारी आजरा यांना देण्यात आले आहे. यावेळी
दिपा ढोकरे, नदिणी भादवणकर, निवेदता पाटील, भारती माळी, संगिता कुंभार, शामल पाटील सह कोल्हापूर जिल्हा आशा वर्कर्स व गटप्रवर्तक युनियन संघटनेच्या प्रा.आरोग्य केंद्र=वांटगी मधील सर्व गटप्रवर्तक व आशाताई यांनी बेमुदत संपाबद्दल तालुका कार्यालयात निवेदन देताना उपस्थित होत्या.
🛑विद्यार्थी विकास परिषदेची शिष्यवृत्तीधारकांच्या मानधन वाढीची मागणी. पालकमंत्र्यांकडे निवेदनाने मागणी.
आजरा.- प्रतिनिधी.

उत्तूर (ता. आजरा ) येथील विद्यार्थी विकास परिषद, कोल्हापूर महाराष्ट्र राज्य विभागीय कार्यालय, उतूर व डॉ पोवार चॅरीटेबल ट्रस्ट अँड फौंडेशन यांच्यावतीने महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने घेण्यात येणाऱ्या इ. पाचवी व आठवी शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांच्या मानधनात वाढ होण्यासाठी कोल्हापूरचे पालकमंत्री हसन मुश्रीफ, यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली. सध्या शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांना ५००० इतकी शिष्यवृत्ती मिळते ही नाममात्र शिष्यवृत्ती रक्कम विद्यार्थी त्यांच्या कोणत्याही कामी येत नाही, भविष्यातील स्पर्धा परीक्षा वाढीला चालना मिळण्यासाठी प्रोत्साहनपर मानधन रकमेत वाढ होऊन ती १२००० इतकी व्हावी तसेच ती इयत्ता बारावी पर्यंत सलग मिळावी अशी मागणी केली आहे. निवेदनावर अध्यक्ष सचिन पोवार, उपाध्यक्ष शितल कुदळे, सचिव विजय पाटील, गणपती नागरपोळे, विठ्ठल कदम,प्रीती कांबळे, नितीन पाटील उत्तम तोरगले यांच्या सह विध्यार्थी व पालकांच्या सह्या आहेत.
🔴ड्रग्ज तस्कर ललित पाटील याला अखेर चेन्नईमधून अटक.
पुणे:- प्रतिनिधी.

पुण्यातील बहुचर्चित ड्रग्ज प्रकरणी मुंबई पोलीसांकडून तस्कर ललित पाटील याला अखेर अटक करण्यात आली आहे. पुण्यातील ससून रुग्णालयातून फाररा झालेला ड्रग्ज माफीया ललित पाटील याचा शोध पोलीस घेत होते. त्यासाठी पोलीसांची दहा पथके देखील तयार करण्यात आली होती. अखेर रात्री चेन्नई येथे लपून बसलेल्या पाटील याला अटक करण्यात आलं आहे. यानंतर ललित पाटील याला पुण्यात आणलं जाणार असून त्यानंतर कोर्टात सादर केलं जाईल.
प्रकरण काय आहे?
पुण्यातील ससून रुग्णालय परिसरात २ कोटी रुपयांचे ड्र्ग्ज सापडले होते. याप्रकरणी पुण्याच्या बंडगार्डन पोलीस ठाण्यात एनडीपीस कायद्यांतर्गत गुन्हा दाखल झाला आहे. या गुन्ह्यामध्ये आत्तापर्यंत चार आरोपींना अटक करण्यात आली असून यातील दोघांना उत्तर प्रदेशातील गोरखपूर जिल्ह्यातील बारंबाकी इथून दोघांना ताब्यात घेण्यात आलं आहे.या प्रकरणातील मुख्य आरोपी ललित पाटील हा फरार झासा होता. पोलिसांच्या नाकावर टिच्चून ललित पाटील फरार झाल्याने पोलिस यंत्रणेवर ताशेरे ओढले जात होते. ललित पाटील याला ड्रग्ज प्रकरणात पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर ससून रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आलं होतं. येथे ९ महिने उपचार घेतल्यानंतर तो पोलिसांच्या हातावर तुरी देऊन फरार झाला. पोलिसांनी चौकशीदरम्यान ललितसह त्याचा भाऊ भूषण हे दोघे मिळून नाशिक इथं ड्रग्ज बनवण्याचा कारखाना चालवत असल्याचं समोर आलं आहे.
