Homeकोंकण - ठाणेरेड झोन 😡 वगळता राज्यात १ जूननंतर लॉकडाऊन शिथिल होणार.

रेड झोन 😡 वगळता राज्यात १ जूननंतर लॉकडाऊन शिथिल होणार.

रेड झोन 😡 वगळता राज्यात १ जूननंतर लॉकडाऊन शिथिल होणार.

मुंबई. प्रतिनिधी.२३.

राज्यात कोरोनाची रुग्णसंख्येमध्ये घट होत असल्याने आता १ जूननंतर लॉकडाऊन शिथिल करणार असल्याची माहिती राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली आहे. इतकंच नाहीतर राज्यात रेड झोन असलेल्या १४ जिल्ह्यांना वगळता इतर ठिकाणी नियम शिथिल करण्यात येणार आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असल्याची माहिती समोर आल्यानंतर आता १ जूननंतर लॉकडाऊन हटवणार का ? असा प्रश्न वारंवार विचारला जात आहे. यावर विजय वडेट्टीवार यांनी महत्त्वाचे संकेत दिले आहे.
राज्यातील १४ जिल्ह्यांना रेड झोन म्हणू घोषित करण्यात आलं आहे. या जिल्ह्यांमध्ये कडकडीत लॉकडाऊन असलं तरी कोरोनाच्या रुग्णांध्ये घट होताना दिसत नाही. त्यामुळे हे १४ जिल्हे वगळता इतर जिल्ह्यांमध्ये १ जूननंतर लॉकडाऊन शिथिल करण्यात येतील. दरम्यान, यावेळी विजय वडेट्टीवार यांनी मुंबई लोकलसंबंधीही महत्त्वाची माहिती दिली आहे. अत्यावश्यक सेवा देणाऱ्यांसाठी सध्या लोकल सुरू असून अजून पुढचे १५ दिवस तरी नागरिकांना लोकलने प्रवास करता येणार नाही असं ते म्हणाले. कोरोनाचा धोका कमी होत असला तरी लोकल सुरू झाली तर मोठ्या प्रमाणात गर्दी वाढेल. त्यामुळे सध्या लोकल मर्यादित नागरिकांसाठीच असणार असल्याचं विजय वडेट्टीवार यांनी सांगितलं आहे.
राज्यातील 14 जिल्हे रेड झोनमध्ये अहमदनगर, उस्मानाबाद, बुलढाणा, कोल्हापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सांगली, सातारा, यवतमाळ, अमरावती, सोलापूर, अकोला, वाशीम, बीड, गडचिरोली रेड झोनमधील जिल्हे वगळता राज्यातील लॉकडाऊन 1 जूननंतर शिथिल होण्याची शक्यता आहे. राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी याबाबतचे संकेत दिले. तसंच मुंबईतील लोकल पुढील 15 दिवस तरी सर्व प्रवाशांसाठी खुली करता येणार नाही, असंही वडेट्टीवार यांनी सांगितलं.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.