Homeकोंकण - ठाणेआजरा तालुक्यातील नागरिकांनी स्वतःची व स्वतःच्या कुटुंबाची काळजी घ्यावी.- लॉकडाऊन शिथिल होणार.-...

आजरा तालुक्यातील नागरिकांनी स्वतःची व स्वतःच्या कुटुंबाची काळजी घ्यावी.- लॉकडाऊन शिथिल होणार.- विनाकारण गर्दी करू नये. बालाजी भांगे. स.पो. निरिक्षक

आजरा तालुक्यातील नागरिकांनी स्वतःची व स्वतःच्या कुटुंबाची काळजी घ्यावी.- लॉकडाऊन शिथिल होणार.- विनाकारण गर्दी करू नये. बालाजी भांगे. स.पो. निरिक्षक
आजरा. प्रतिनिधी. २३

आजरा शहर व तालुक्यातील सर्व जनतेला पोलीस विभागाचे वतीने नम्र आवाहन करण्यात येते आहे की आपण मागील आठ दिवस सलग अतिशय कडक असा लॉकडाऊन पाळलेला आहे. त्याबद्दल आपण सर्व अभिनंदनास पात्र आहात परंतु
उद्यापासून लॉकडाऊन थोडासा शिथिल होणार आहे .सकाळी सात वाजल्यापासून अकरा वाजेपर्यंत अत्यावश्यक व जीवनावश्यक सेवा सुरू राहणार आहे.

उद्या बाजारपेठ किराणा दुकाने, भाजीपाला ,बेकरी ,बँका, पतसंस्था सुरू होणार आहेत त्यामुळे पुन्हा गर्दी होण्याची शक्यता आहे.

तरी ज्या ठिकाणी आपण येणार आहात तेथे मास्क घालून तसेच सोशल डिस्टन्स पाळून स्वतःच्या सुरक्षेची काळजी घ्यावी.

कोणीही मार्केटमध्ये विनाकारण फिरणार नाही.

जी वस्तू स्वतःचे घराचे जवळ मिळते ती घेण्यासाठी कोणीही मार्केटमध्ये विनाकारण येणार नाही.

कारण नसताना बाहेर फिरणारे

मास्क न घालता बाहेर फिरणारे

विनाकारण गाडी घेऊन फिरणारे

नियमांचे उल्लंघन करणारे दुकानदार

तसेच शासनाने घालून दिलेल्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर पोलिस विभागातर्फे आत्तापर्यंत आजरा शहर व ग्रामीण भागात पुढील प्रमाणे कारवाई करण्यात आलेली आहे.

1) मास्क न वापरल्यामुळे केलेली कारवाई –

आज अखेर एकुण केसेस -1591
आज अखेर एकुण दंड -3,47,500/-

2) *188 प्रमाणे दाखल गुन्हे –
एकुण दाखल -12

3) आस्थापना कारवाई – दुकानदारांनी नियमांचे केलेले उल्लंघन.

कारवाई -11 दुकाने
दंड -11000/-

4)वाहन जप्त कारवाई
एकूण – 81 वाहने.

5)वाहन कारवाई ( MV act)
एकुण केसेस -928 एकुण दंड -197500 /-

यापुढे देखील अशीच कारवाई पोलीस विभागाचे वतीने सुरू राहणार आहे तरी माझी आजरा तालुक्यातील जनतेला पुन्हा विनंती आहे कि कोणीही कोरोणाचे अनुषंगाने शासनाने घालून दिलेल्या नियमांचे उल्लंघन करू नये अन्यथा त्याच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. याबाबत बालाजी भांगे सहाय्यक पोलीस निरीक्षक आजरा पोलीस ठाणे. यांनी नागरिकांना नम्र आवाहन केले आहे.
“घरी राहा सुरक्षित”

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.