वाढदिवस साजरा न करता. – प्राथमिक शाळेला केली अर्थिक मदत
पेरणोलीतील देसाई कुटुंबाचा उपक्रम
आजरा : प्रतिनिधी.२४.
पेरणोली ता आजरा येथे मुलगीचा वाढदिवस साजरा न करता वाढदिवसाला येणार खर्च प्राथमिक शाळेला अर्थिक मदत दिली.
येथील प्रकाश पांडुरंग देसाई यांनी मुलगीचा वाढदिवस रद्द करून येथील प्राथमिक शाळेला अर्थिक मदत करून नवा पायंडा घालून दिला.
देसाई हे पेरणोली शाळेचे माजी विद्यार्थी आहेत. त्यांची मुलगी कु. प्राजक्ता ईयत्ता सातवीमध्ये शिकत आहे.गावातील शैक्षणिक विकासाला महत्त्वाचा समजून
त्यांनी वाढदिवस रद्द करत शाळेला आर्थिक मदत करण्याचा निर्णय घेतला.शाळेच्या विकासासाठी त्यांनी पाच हजाराची मदत करत यापूढेही शाळेच्या विकासासाठी प्रयत्नशील असल्याचे सांगितले.
गावच्या विकासात शाळा महत्त्वाची आहे.त्यामुळे देसाई यांच्यासारख्या अनेकांनी केलेली मदत महत्त्वाची मानली जाते.यावेळी जयश्री देसाई यांच्या हस्ते धनादेश प्रदान करण्यात आला. याप्रसंगी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष कृष्णा सावंत, मुख्याध्यापिका स्नेहा क्षीरसागर, वरिष्ठ शिक्षिका जयश्री वरेकर, प्रकाश देसाई, सुहास देसाई आदी उपस्थित होते.
【 पेरणोली ता आजरा येथे वाढदिवस रद्द करून शाळेला धनादेश देताना जयश्री देसाई व प्रकाश देसाई,सोबत कृष्णा सावंत, स्नेहा क्षीरसागर, जयश्री वरेकर】
