HomeUncategorizedमहाराष्ट्रातील मुलींसाठीची "ही' योजना आजपासून लागू.- 🔴18 वर्षांपर्यंत मिळणार आर्थिक मदत.🛑 धक्कादायक...

महाराष्ट्रातील मुलींसाठीची “ही’ योजना आजपासून लागू.- 🔴18 वर्षांपर्यंत मिळणार आर्थिक मदत.🛑 धक्कादायक 🛑पाचपैकी तीन राज्यात भाजपची गच्छंती निश्चित.- काँग्रेसला घवघवीत यश मिळणार!- सर्वेक्षणाने भाजपची झोप उडाली.🛑नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेला राज्य सरकारची मंजुरी.-२ हजाराचा पहिला हप्ता लवकरच जमा होणार.

महाराष्ट्रातील मुलींसाठीची “ही’ योजना आजपासून लागू.- 🔴18 वर्षांपर्यंत मिळणार आर्थिक मदत.
🛑 धक्कादायक 🛑पाचपैकी तीन राज्यात भाजपची गच्छंती निश्चित.- काँग्रेसला घवघवीत यश मिळणार!- सर्वेक्षणाने भाजपची झोप उडाली.
🛑नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेला राज्य सरकारची मंजुरी.-
२ हजाराचा पहिला हप्ता लवकरच जमा होणार.

मुंबई – प्रतिनिधी.

मार्च 2023 च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात लेक लाडकी योजनेची घोषणा करण्यात आली होती. त्याचा आज अंतिम प्रस्ताव मंत्रिमंडळ बैठकीत सादर करण्यात आला आहे, या प्रस्तावाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दोन्ही उपमुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे.आजपासून ही योजना राज्यात लागू होईल, अशी माहिती राज्य मंत्रिमंडळ बैठकीनंतर महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी दिली.

🟥मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. बैठकीनंतर प्रसार माध्यमांशी बोलताना अदिती तटकरे म्हणाल्या की, 1 लाख 1 हजार अशी रक्कम मुलींना दिली जाणार आहे. त्यामुळे आजपासून ही योजना राज्यात लागू होईल. मूळ संकल्पनेनुसार मुलीचा जन्म झाल्यानंतर ती 18 वर्षाची होईपर्यंत ही मदत टप्प्या टप्प्यात दिली जाईल.मुलींचा जन्मदर वाढविण्यासाठी त्यांना सक्षम करण्यासाठी ही योजना आहे. नवरात्रीच्या पार्श्वभूमीवर आम्ही या योजनेची सुरुवात करत आहोत. मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियानाला देखील मागच्या मंत्रिमंडळात मान्यता मिळाली असल्याचेही तटकरे यांनी सांगितले.

🛑लेक लाडकी योजना काय आहे?

♦️या योजनेतून महाराष्ट्रातील गरीब कुटुंबातील मुलींना आर्थिक मदत केली जाणार आहे.

♦️पिवळ्या आणि केशरी रेशनकार्डधारक कुटुंबातील मुलींना या योजनेचा लाभ मिळणार आहे.*

♦️या योजनेअंतर्गत मुलीला जन्मानंतर 5000 रुपये दिले जातील.

♦️त्यानंतर टप्प्याटप्प्यानुसार राज्य सरकारकडून मदत केली जाईल.

♦️मुलगी पहिली इयत्तेत गेल्यानंतर तिला 4000 रुपयांची मदत केली जाईल.

♦️मुलगी सहावीत गेल्यानंतर 6000 रुपयांची आर्थिक मदत केली जाईल.
♦️मुलगी अकरावीत गेल्यानंतर 8000 रुपयांची आर्थिक मदत केली जाईल.
♦️मुलगी 18 वर्षांची झाल्यानंतर तिला महाराष्ट्र सरकारकडून 75,000 रुपयांची आर्थिक मदत दिली जाईल.

🛑 धक्कादायक 🛑पाचपैकी तीन राज्यात भाजपची गच्छंती निश्चित.- काँग्रेसला घवघवीत यश मिळणार!- सर्वेक्षणाने भाजपची झोप उडाली.

नवी दिल्ली – वृत्तसंस्था

कर्नाटक विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने भाजपला चांगलीच धोबीपछाड दिली होती. तसेच जनता आता भाजपच्या जुमलेबाजीला कंटाळली आहे. तसेच वाढती महागाई, बेरोजगारी या समस्या वाढतच आहे. त्यामुळे इतर राज्याही काँग्रेसचा प्रभाव दिसण्याची शक्यता आहे.

नुकत्याच झालेल्या एका सर्वेनुसार पाच राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपची गच्छंती निश्चित मानली जात आहे. त्या राज्यात काँग्रेसला घवघवीत यश मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. देशातील पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे बिगुल वाजले आहे. या पार्श्वभूमीवर एबीपी न्युज आणि सी व्होटरने केलेला सर्व्हे समोर आला आहे.

मिझोराममध्ये कोणालाही बहुमत नाही?

मिझोराममध्ये कोणत्याही पक्षाला बहुमत मिळणार नसल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मिझोराममध्ये विधानसभेच्या 40 जागा असून सत्ताधारी मिझो नॅशनल फ्रंट सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयास येण्याची शक्यता आहे. तर, त्यापाठोपाठ काँग्रेस दुसऱ्या क्रमांकावर येऊ शकतो. मिझो नॅशनल फ्रंटला 13 ते 17 जागा, काँग्रेसला 10 ते14 ,झेडपीएमला 9 ते 13 जागा तर इतर पक्षांना 1 ते 3 जागा मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

तेलंगणात चंद्रशेखर राव हॅटट्रिक करणार?

तेलंगणात सध्या सत्ताधारी बीआरएस पक्ष आणि काँग्रेस यांच्यात चुरशीची स्पर्धा होणार आहे. येथे विधानसभेच्या 119 जागा असून बीआरएसला 43 ते 55 जागा मिळण्याचा अंदाज आहे. तर काँग्रेसला 48 ते 60 जागा मिळतील असा अंदाज आहे. भाजपला 5 ते 11 जागा मिळण्याची शक्यता आहे. काँग्रेसला अंदाजे 39 टक्के मते मिळतील. म्हणजेच, गेल्या वेळेपेक्षा 10.5 टक्के मते जास्त मिळणार आहेत. याउलट, सत्ताधारी बीआरएसला 9.4 टक्के मते कमी मिळण्याची शक्यता आहे. याव्यतिरिक्त, भाजपला 16टक्के मते मिळण्याचा अंदाज आहे. त्यामुळे काँग्रेसला येथे फायदा होणार आहे.

छत्तीसगडमध्ये भाजपा आणि काँग्रेसमध्ये लढत

छत्तीसगडमध्ये भाजप आणि काँग्रेस यांच्यात अटीतटीची लढत होणार आहे. अंदाजानुसार, काँग्रेसला येथे 45 टक्के मते मिळणार आहेत. तर, भाजपाला 44 टक्के मते मिळण्याचा अंदाज आहे. येथे विधानसभेच्या 90 जागा असून बहुमतासाठी काँग्रेस आणि भाजप यांच्यात कडवी झुंज होणार आहे, असे सर्वेक्षणात दिसत आहे.येथे काँग्रेसला 45 ते 51, भाजपला 39 ते 45 आणि इतरांना 2 जागा मिळण्याचा अंदाज आहे.

मध्य प्रदेशमध्ये काँग्रेसची सत्ता येणार

मध्य प्रदेशात सत्ताबदल होणार असल्याचे चित्र स्पष्ट दिसत आहे. काँग्रेस आणि भाजप या दोन्ही पक्षांना प्रत्येकी 45 टक्के मते मिळण्याचा अंदाज आहे. येथे 230 जागा असून काँग्रेसला 113ते 125 जागा मिळण्याची शक्यता आहे. तर, भाजपला 104 ते 116 जागा मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे बहुमतासाठी आवश्यक असलेला 116 चा आकडा काँग्रेस सहज पार करू शकेल, असे सर्वेक्षणातून उघड झाले आहे.

🟪राजस्थानमध्ये होणार कडवी झुंज

राजस्थानमध्ये काँग्रेसने गेहलोत आणि पायलट यांच्यातील वाद मिटवल्याने त्याचा काँग्रेसला फायदा होईल. तर वसुंधरा राजे यांचे राजकारण भाजपला भोवण्याची शक्यता आहे. 200 जागांपैकी 127 ते 137 जागा भाजपाला मिळण्याची शक्यता आहे. तर, काँग्रेसला 59 ते 69 जागा मिळण्याचा अंदाज आहे.

🛑नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेला राज्य सरकारची मंजुरी.-
२ हजाराचा पहिला हप्ता लवकरच जमा होणार.

मुंबई:- प्रतिनिधी.

राज्यातील शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी समोर आली आहे. नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या पहिल्या हप्त्याला राज्य सरकारकडून मंजुरी देण्यात आली असून दोन हजारांचा पहिला हप्ता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे. या योजनेसाठी १ हजार ७२० कोटी रुपयांच्या निधीस शासनाची मान्यता देण्यात आली आहे.
राज्य सरकारच्या या निर्णयामुळे प्रत्येक पात्र शेतकऱ्याला राज्य सरकारकडून मिळणार वर्षाकाठी ६ हजार रुपये मिळणार आहे. एप्रिल ते जुलै २०२३ कालावधीसाठी पहिला हफ्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे. केंद्र आणि राज्य सरकारचे मिळून वर्षाला एकूण १२ हजार रुपये मिळणार आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थ संकल्प मांडताना याची घोषणा केली होती.
आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. एप्रिल २०२३ ते जून २०२३ या कालावधीसाठीच्या पहिल्या हप्त्याला राज्य सरकारने मंजुरी दिली आहे. त्यामुळे आता शेतकऱ्यांच्या खात्यात लवकरच जमा होणार आहेत. यासाठी १,७२० कोटी रुपयांच्या निधीला शासनाने मान्यता दिली आहे. उपमुख्यमंत्री आणि राज्याचे अर्थमंत्री देवेंद्र फडणवीसांनी यंदाच्या बजेटमध्ये ही योजना जाहीर केली होती. या योजनेचा फायदा राज्यातील शेतकऱ्यांना होणार आहे. केंद्र सरकारच्या पंतप्रधान शेतकरी सन्मान योजना या धर्तीवर ही योजना लागू करण्यात आली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.