शिवसेना कुणाची? 🛑👉ठाकरे गटाच्या याचिकेवर उद्या होणार सर्वोच्च न्यायालयात सुनावणी.
🛑”आजरा तालुका युवासेनेच्या वतीने शालेय विद्यार्थ्यांना पोषणयुक्त खाऊचे वाटप”.
🛑संकेश्वर – बांदा महामार्ग बाधित शेतकरी संघटना आजरा- गडहिंग्लज विभाग – बेमुदत धरणे आंदोलनाचा पहिला दिवस.
नवी दिल्ली :- वृत्तसंस्था.

केंद्रीय निवडणूक आयोगाने एकनाथ शिंदे गटाला शिवसेना नाव आणि पक्षचिन्ह दिले आहे. या निर्णयाविरोधात ठाकरे गटाच्या वतीने दाखल याचिका दाखल केली आहे. यावर आता उद्या सात सदस्य घटनापीठासमोर सुनावणी होणार आहे. नबाम राबिया प्रकरणाचा पुनर्विचार करण्याचे संकेतही न्यायालयाने दिले आहेत.
याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने ठाकरे गटाच्या याचिकेवर १८ सप्टेंबरला सुनावणी घेतली होती. त्यावेळी न्यायालयाने पुढील सुनावणी तीन आठवड्यांनी घेतली जाईल, असं स्पष्ट केले होते. विधीमंडळातील आमदारांची संख्या आणि २०१९ मध्ये झालेल्या निवडणुकीतील विजयी झालेल्या शिवसेना उमेदवारांच्या मतांची आकडेवारी ग्राह्य धरत केंद्रीय निवडणूक आयोगाने शिंदे गटाला पक्षचिन्ह आणि नाव दिलं होतं.
🔴एकनाथ शिंदे यांना समर्थन असणार्या आमदारांना ७६ टक्के मते मिळाली होती. तर उद्धव ठाकरे यांच्या गटातील आमदारांना २३.५ टक्के मिळाली आहेत. या मतांची तसेच विधीमंडळातील आकडेवारी पाहता, शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्हावर शिंदे गटाचाच अधिकार आहे, असं निवडणूक आयोगाने स्पष्ट केलं होतं. शिंदे गटातील आमदारांच्या अपात्रतेचा निकाल लागेपर्यंत निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्णयाला स्थगिती देण्यात यावी, अशी मागणी ठाकरे गटाने याचिकेतून केली होती.
“आजरा तालुका युवासेनेच्या वतीने शालेय विद्यार्थ्यांना पोषणयुक्त खाऊचे वाटप”.
आजरा.- प्रतिनिधी.

युवासेनेचे सचिव वरूणजी सरदेसाई यांच्या वाढदिवसानिमित्त आजरा तालुका युवासेनेच्या वतीने तालुकाप्रमुख राजकुमार भोगण यांच्या अध्यक्षतेखाली विद्या मंदिर सरंबळवाडी,होनेवाडी, हत्तीवडे,बोलकेवाडी,मेंढोली या गावातील अंगणवाडी ते इयत्ता ७ वी पर्यंतच्या जवळजवळ ३५० शालेय विद्यार्थ्यांना पोषणयुक्त खाऊ चे(चोकोज)वाटप करण्यात आले.
या प्रसंगी युवासेना जिल्हा चिटणीस कृष्णा पाटील युवासैनिक सुयश पाटील,अजित कांबळे, युवराज कांबळे,तुषार कुंभार,विघ्नेश शेंडे यांचेसह शाळांचे मुख्याध्यापक,शिक्षक वृंद,अंगणवाडी सेविका व मदतनीस उपस्थित होत्या.
संकेश्वर – बांदा महामार्ग बाधित शेतकरी संघटना आजरा- गडहिंग्लज विभाग – बेमुदत धरणे आंदोलनाचा पहिला दिवस.
आजरा. – प्रतिनिधी.

संकेश्वर – बांदा महामार्ग बाधित शेतकरी संघटना आजरा- गडहिंग्लज विभाग – बेमुदत धरणे आंदोलन दि.१२ पासून आंदोलन सुरु झाले आहे. या आंदोलनाचे नेतृत्व क्राँ. शिवाजी गुरव करत आहेत आंदोलनात स्थळी बोलताना श्री. गुरव म्हणाले मागील अनेक महिने संघटनेच्या माध्यमातून संकेश्वर – बांदा महामार्ग बाधित शेतकऱ्यांच्या पुनर्वसनासंदर्भात अनेक वेळा बैठका, आंदोलने शांततेच्या मार्गाने करत आहोत. मात्र महामार्ग बाधित शेतकऱ्यांची फसवणूक करून महामार्गाचे काम सरकारी यंत्रणा व कंपनी पुढे रेटण्याचे काम करत आहे. रस्ता रुंदीकरण करताना साडेपाच मीटरवर वहिवाट होती अठरा वर्षांपूर्वी माहितीच्या अधिकारात घेतलेल्या माहितीमध्ये आहे. सरकारी यंत्रणा ज्या जी. आर चा आधार घेऊन शेतकऱ्यांची फसवणूक करत आहे त्याला पुरावा म्हणून अनेक वेळा माहिती अधिकारातील मिळालेली माहिती सादर केली आहे. असे असताना महामार्ग बनवला जात आहे. सध्या वळण काढून महामार्ग सरळ केला जाणार आहे यासाठी शेतकऱ्यांच्या मालकीच्या शेतातून जाण्यासाठी जाहीर नोटीस स्थानिक दैनिकांना न देता काही दैनिकांना दिली. वास्तविक प्रत्येक खातेदाराला स्वतंत्र नोटीस दिली पाहिजे दिलेल्या जाहीर नोटिशीला आमचे संघटनेमार्फत म्हणणे देत आहोत. सदर जाहीर म्हणणे असे की सर्व शेतकऱ्यांना चालू बाजारभावाप्रमाणे किंवा रेडीरेकरच्या पाच पट दराने जी जास्त रक्कम होईल ती मिळाल्याशिवाय कोणत्याही शेतात कोणतेही महामार्गाचे काम करू नये तसेच स्वतंत्र खातेदारांचे स्वतंत्र म्हणणे देण्यासाठी व सर्व शेतकऱ्यांचे पुनर्वसन व्हावे यासाठी दि.१२ रोजी गुरुवारी तहसील कार्यालय आजरा यांचे कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलनाला सुरुवात झाली आहे. जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत आंदोलन सुरू राहणार असल्याचे आंदोलकांनी बोलताना सांगितले या आंदोलनात शिवाजी इंगळे, गणपती येसने, दशरथ खोराटे, शिवाजी पाटील, शिवाजी डोंगरे, सुरेखा पालकर, मंगल खोराटे, नामदेव तावडे, चंद्रकांत तेजम शिवाजी कदम, शिवाजी देसाई, धोंडिबा खोराटे, संदिप कोंडुसकर, सह रस्ते बाधित ७१ शेतकरी सहभागी झाले होते.
