HomeUncategorizedदसरा मेळावा! - 'आम्हाला उद्धव ठाकरे यांच्या सोबत भांडायचे नाही'.- शिंदे गटाची...

दसरा मेळावा! – ‘आम्हाला उद्धव ठाकरे यांच्या सोबत भांडायचे नाही’.- शिंदे गटाची शिवाजी पार्कच्या मैदानातून माघार.

🛑दसरा मेळावा! – ‘आम्हाला उद्धव ठाकरे यांच्या सोबत भांडायचे नाही’.- शिंदे गटाची शिवाजी पार्कच्या मैदानातून माघार.

मुंबई – प्रतिनिधी.

ऐतिहासिक दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्क शिवसेनेच्या कोणत्या गटाला मिळणार याचा निर्णय अखेर झाला आहे. या वादावर पडदा टाकत शिंदे सरकारचे मंत्री दीपक केसरकर यांची शिंदे गटाचा दसरा मेळावा हा दक्षिण मुंबईतील क्रॉस आणि ओव्हल मैदानावर होणार असल्याचे स्पष्ट केले आहे.
वास्तविक शिवाजी पार्कसाठी शिवसेना (शिंदे गट) आणि ठाकरे गट दोघेही आग्रही होते. मात्र, आता या वादावर आता पडदा पडला असल्याची चर्चा आहे. शिवाजी पार्क मैदानाच्या या लढाईतून शिंदे गटाने शिवाजी पार्कच्या मैदानातून माघार घेतली असल्याची चर्चा सध्या सुरू आहे. शिंदे गटाचा दसरा मेळावा दक्षिण मुंबईतील क्रॉस आणि ओव्हल मैदानावर होणार असल्याची माहिती शिंदे सरकारमधील मंत्री आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी दिली आहे.
दसरा मेळाव्यासाठी आपल्याला शिवाजी पार्क मैदान मिळावे म्हणून उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे गटाने मुंबई महानगरपालिकेकडे अर्ज दाखल केला होता. शिवाजी पार्क मैदान आपल्यालाच मिळणार, असा दावाही दोन्ही गटाच्या नेत्यांकडून केला जात होता. त्यामुळे गेल्या वर्षीप्रमाणे या वर्षी देखील हा वाद चांगलाच रंगणार असल्याची चर्चा होती.

आम्हाला ठाकरेंसोबत भांडायचे नाही –

आम्हाला उद्धव ठाकरे यांच्या सोबत भांडायचे नाही. त्यांना फक्त सहानुभूतीचे राजकारण करायचे आहे, दसरा मेळाव्यासाठी आम्ही महापालिकेकडे केलेला अर्ज मागे घेतला असल्याची माहिती मंत्री दीपक केसरकर यांनी दिली आहे. यंदा दसरा मेळाव्याला शिवाजी पार्कवर उद्धव ठाकरे यांचा आवाज घुमणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. उद्धव ठाकरे यांना आपण कधीच रोखलेले नाही. त्यामुळे आम्ही आमचा मेळावा अन्य मैदानावर घेणार आहोत, असेही केसरकर यांनी यावेळी स्पष्ट केले.

Previous article
Next article
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.