Homeकोंकण - ठाणेप्रसिद्ध जेष्ठ संगीतकार ‘राम लक्ष्मण’मधील लक्ष्मण विजय पाटील यांचं आज निधन.

प्रसिद्ध जेष्ठ संगीतकार ‘राम लक्ष्मण’मधील लक्ष्मण विजय पाटील यांचं आज निधन.

प्रसिद्ध जेष्ठ संगीतकार ‘राम लक्ष्मण’मधील लक्ष्मण विजय पाटील यांचं आज निधन ….
विजय पाटील यांचा अल्पपरिचय.


जन्म. १६ सप्टेंबर १९४२ रोजी नागपूर येथे.
विजय पाटील यांना बालपणापासूनच संगीताची आवड होती. त्याचे वडील आणि काका देखील शास्त्रीय संगीतात प्रवीण होते. त्यांच्याकडून हा वारसा विजय पाटील यांच्य्कडे आला होता. त्यांनी प्राथमिक संगीताच्या शिक्षणाचे धडे लहानपणी त्यांचे वडील काशीनाथ आणि त्यांचे काका प्रल्हाद यांच्याकडून गिरवले आणि उर्वरित शास्त्रीय संगीताचे शिक्षण भातखंडे शिक्षण संस्था, नागपूर येथून पूर्ण केले. आपल्या करियरचे केंद्रबिंदू मुंबई रहावे यासाठी त्यांनी मुंबई मध्ये ऑर्केस्ट्राची सुरुवात केली अशा एका ऑर्केस्ट्राच्या वेळी दादा कोंडके यांची नजर राम लक्ष्मण यांच्या कार्यक्रमावर पडली. विजय पाटील त्यांचे मोठे बंधू सुरेंद्र यांच्यासह गाण्याचा कार्यक्रम करीत होते. समोर बसलेल्या दादा कोंडकेंना त्यांची गाणी आवडली आणि त्यांनी त्यांना ‘पांडू हवालदार’ या मराठी चित्रपटासाठी गाणी संगीतबद्ध करण्याची ऑफर दिली. त्यावेळी संगीतकारांच्या जोड्या काम करीत असत. त्यामुळे मग दादा कोंडके यांनी सुरेंद्र यांचे ‘राम’ आणि विजय पाटील यांचे ‘लक्ष्मण’ असे नामकरण केले आणि ‘राम-लक्ष्मण’ या संगीतकार जोडीचा जन्म झाला. आणि दादांनी १९७४ साली “पांडू हवालदार” या मराठी चित्रपटासाठी संगीत दिग्दर्शक म्हणून त्यांची निवड केली येथूनच त्यांच्या पुढील प्रवासास सुरुवात झाली. दादांचं पान राम लक्ष्मण यांच्या शिवाय हलत नसे .लोकांना आवडणारे संगीत कस द्यायचं याचे धडे राम लक्ष्मण यांनी दादांकडूनच घेतले . राम कदम यांचं निधन झाल्यावर पण आपल्या जोडीदाराला आदरांजली म्हणून विजय पाटील यांनी राम लक्ष्मण या नावानेच काम चालू ठेवले.

‘पांडू हवालदार’च्या यशानंतर ‘तुमचं आमचं जमलं’,’राम राम गंगाराम’,’बोट लाविल तेथे गुदगुदल्या’,’आली अंगावर’, ‘आपली माणसं’, ‘हिच खरी दौलत’, ‘दीड शहाणे’, ‘लेक चालली सासरला’, ‘देवता’ या सर्व दादा कोंडके यांच्या मराठी चित्रपटांसाठी राम लक्ष्मण यांनी संगीत दिले.

हिंदीमधली त्यांची कारकीर्द राजश्री प्रॉडक्शनच्या ‘एजंट विनोदने ‘ झाली . नंतर पण हिंदीमध्ये त्यांनी अनेक काम केली . ‘हम से बढकर कौन ‘ सिनेमातलं त्यांचं ‘देवा हो देवा गणपती देवा ‘ गाणं तुफान गाजलं . पण राम लक्ष्मण यांचं नशीब पालटलं ते १९८९ साली आलेल्या ‘मैने प्यार किया’ ने. ‘मैने प्यार किया ‘ ने बॉलिवूडमध्ये पुन्हा प्रेमकथांचं युग सुरु झालं. ‘मैने प्यार किया ‘ म्हणटलं की तीन गोष्टी आठवतात. प्रेम आणि सुमनचा पोस्टमन कबुतर , ‘एक लडका और एक लडकी कभी दोस्त नही हो सकते ‘ हा संवाद आणि राम लक्ष्मण यांचं सुपरहिट संगीत . राजश्री प्रोडक्शन्स आणि पर्यायाने सलमानच्या कारकिर्दीत राम लक्ष्मण यांचा मोठा वाटा आहे .

‘हम आपके है कौन ‘ सिनेमा हा भारतीय चित्रपटांच्या इतिहासातला सगळ्यात मोठ्या हिट्स पैकी एक मानला जातो. तो सिनेमा सुपरहिट होण्यात त्याच्या सुपरहिट संगीताचा पण मोठा वाटा होता. हम आपके है कौन च्या यशामुळे राम लक्ष्मण यांचं नाव इतिहासात कायमच नोंदलं गेलं आहे. राम लक्ष्मण यांनी देव आनंद , मनमोहन देसाई , महेश भट्ट यांच्यासारख्या दिग्गजांसोबत काम केलं आहे. मेलोडियस संगीत ही राम लक्ष्मण यांची खासियत. लोकांच्या तोंडी सहज रुळतील अशी गाणी देण्यात त्यांचा हातखंडा होता. राम लक्ष्मण यांची कारकीर्द घडण्यात लता मंगेशकर यांचा मोठा वाटा आहे .

कदाचित बॉलिवूडमधला मराठी माणूस म्हणून लता मंगेशकरांना त्यांच्याबद्दल आपुलकी वाटत असावी. लता मंगेशकर यांनी चित्रपटांसाठी गाणी गाणं कमी केल्यावर पण त्यांनी राम लक्ष्मण यांच्यासाठी गाण्यास कधीही नकार दिला नाही. ‘सातवा आसमान ‘ , ‘हंड्रेड डेज ‘ , ‘अनमोल ‘ ही या सांगीतिक भागीदारीची चांगली उदाहरण. हिंदीमध्ये एस पी बालसुब्रमण्यम यांचा आवाजाचा वापर राम लक्ष्मण यांनी जितक्या उत्तम प्रकारे केला, तितका फार कमी लोकांनी केला आहे. त्या काळी असं म्हटलं जायचं की जर तुम्हाला तुमच्या सिनेमात लताने गाणं गाव असं वाटत असेल तर राम लक्ष्मण यांना साईन करा. पण ‘हम साथ साथ है ‘ मध्ये राम लक्ष्मण यांनी लता मंगेशकरांचा आवाज न वापरता कविता कृष्णमूर्ती, अलका याज्ञीक यांचा आवाज वापरला. पण या सिनेमाची गाणी फारशी चालली नाहीत. सिनेमाला पण अतिशय मर्यादित यश मिळालं. इथूनच राम लक्ष्मण यांच्या कारकिर्दीला उतरत वळण लागलं.

राम लक्ष्मण यांना १९८९ मधील मैने प्यार कियाच्या संगीतासाठी त्याला फिल्मफेअरचा सर्वोत्तम संगीत दिग्दर्शक पुरस्कार मिळाला होता. पत्थर के फूल, हम आपके हैं कौन..!, हम साथ साथ हैं इत्यादी काही त्याचे लोकप्रिय चित्रपट आहेत. त्यांनी हिंदी, मराठी, भोजपुरी मिळून १५० हून अधिक चित्रपटांना संगीत देऊन आपले बहुमूल्य योगदान दिले. २०१८ मध्ये विजय पाटील यांना राज्य शासनाच्या ‘लता मंगेशकर’ या पुरस्काराने गौरवण्यात आले. त्यांचे चिरंजीव अमर पाटील म्युझिक अरेंजर आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.