HomeUncategorizedआजरा अर्बन बँकेला “बँको ब्लू रिबन २०२३” पुरस्कार.ऑनलाईन 'गणेश, उस्तव व 'गौराई...

आजरा अर्बन बँकेला “बँको ब्लू रिबन २०२३” पुरस्कार.ऑनलाईन ‘गणेश, उस्तव व ‘गौराई स्पर्धा.- / महाराष्ट्र बुरूड समाज – प्रथम क्रमांक सुभाष बुरुड, आजरा स्पर्धेत ‘ प्रथम’ क्रमांकाने निवड

आजरा अर्बन बँकेला “बँको ब्लू रिबन २०२३” पुरस्कार.

आजरा.- प्रतिनिधी.

अविस पब्लिकेशन यांचेमार्फत दमण येथे घेणेत आलेल्या पुरस्कार सोहळ्यामध्ये भारतातील अग्रगण्य को- ऑपरेटीव्ह बँकांचा सहभाग होता. गेली ६३ वर्षे अत्यंत उत्कृष्ठ बँकिंग सेवा देणाऱ्या मार्च २०२३ अखेरच्या संपलेल्या आर्थिक वर्षामध्ये अर्बन बँकामधून सर्व निकषामध्ये सर्वोत्कृष्ट कामगिरी केले बद्दल (ठेवी रु.८०० कोटी च्या वरील बँक) अविस पब्लिकेशन यांचे मार्फत दिला जाणारा “बँको ब्लू रिबन २०२३” चा पुरस्कार रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे माजी चिफ जनरल मॅनेजर पी. के. आरोरा यांचे हस्ते देणेत आला. सदर पुरस्कार बँकेच्या वतीने अण्णा भाऊ संस्था समूह प्रमुख व बँकेचे संचालक अशोकअण्णा चराटीसो, बँकेचे चेअरमन डॉ. अनिल देशपांडे, व्हा. चेअरमन रमेश कुरणकर, संचालक सुरेश डांग, विलास नाईक, डॉ. दीपक सातोसकर, सुनील मगदुम, किशोर भुसारी, संजय चव्हाण, जयवंत खराडे यांनी स्वीकारला. या बद्दल अविस पब्लिकेशन यांनी बँकेचे अभिनंदन केले. नुकताच बँकेला जिल्हा नागरी बँक असोसिएशनच्या वतीने दिला जाणारा सर्वोत्कृष्ठ बँक म्हणून सलग दुसऱ्या वर्षी मिळाला आहे. यामुळे बँकिंग हा केवळ व्यवसाय म्हणून न मानता समाजपयोगी आणि आणि सर्वसामान्य नागरिकांचे जीवनमान उंचविण्यासाठी बँकेचे सर्व व्यवस्थापन आणि कर्मचारी कार्यरत आहेत यासाठी या बँकेचे कौतुक होत आहे. ग्रामीण भागातील कारागिरांसाठी विनातारण प्रधानमंत्री विश्वकर्मा कर्ज योजना, जेष्ठ नागरिकांसाठी घरपोच सेवा देण्यासाठी Helpline, WhatsApp द्वारे बँकिंग या सारख्या सुविधा बँक लवकरच सुरू करीत आहे. भविष्यामध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञानाने गरजू व्यावसायिक व उद्योजकांना व त्यांच्या गरजाना अर्थ पुरवठा करून देशाच्या प्रगतिमध्ये योगदान देण्याचा मानस बँकेचा आहे.
सदर यशामध्ये बँकेचे सहकारी संचालक, ग्राहक व कर्मचारी यांचे योगदान असलेचे चेअरमन डॉ. देशपांडे यांनी संगितले.

ऑनलाईन ‘गणेश, उस्तव व ‘गौराई स्पर्धा.- महाराष्ट्र बुरूड समाज – प्रथम क्रमांक सुभाष बुरुड, आजरा स्पर्धेत ‘ प्रथम’ क्रमांकाने निवड

पुणे .प्रतिनिधी.

अखिल बुरुड समाज संघटना महाराष्ट्र राज्यचे सन्माननीय
अध्यक्ष विकासशेठ नागे,पुणे
कार्यध्यक्ष सोमनाथ शेठ जगताप,शिरूर पुणे, यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली ज्या काही ऑनलाईन ‘गणेश, उस्तव व ‘गौराई’ च्या स्पर्धा घेण्यात आल्या त्याला संपूर्ण महाराष्ट्रातील समाजाच्या वतीने चांगला प्रतिसाद मिळाला त्यात आपण गणेशोत्सव डेकोरेशन प्रथम क्रमांक घेऊन विजेते ठरलेले आहेत. सुभाष बुरुड, लक्ष्मी बुरूड आजरा स्पर्धेत ‘ प्रथम’ क्रमांकाने निवड करण्यात आली आहे याबद्दल आपले मनःपूर्वक अभिनंदन..यानिमित्ताने आपला व आपला परिवाराचा संघटनेच्या वतीने सन्मान व सत्कार करण्यात येणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली आहे.

Previous article
Next article
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.