आजरा तालुक्यातील बिगरशेती NA केलेल्या सर्व गट नंबर प्रकरणांची परिपूर्ण चौकशी समिती नेमून चौकशी झाली पाहिजे. – संग्राम सावंत. ( बेमुदत ठिय्या आदोलन” मुक्ती संघर्ष समितीच्या वतीने करणार असल्याचा प्रसिद्धी पत्रकाद्वारे इशारा.)
【 डी. डी. कोळी तत्कालीन नायब तहसिलदार यांच्याकडे तहसिलदार, आजरा म्हणून कार्यभाग असताना विगरशेती प्रकरणांचे आदेश मंजूरी व त्यासंदर्भात झालेला पत्रव्यवहार आणि कागदपत्रांची सखोल तपासणी करावी. 】
आजरा.- प्रतिनिधी.

भावेश्वरी कॉलनीमधील रस्ता, गटर्स व इतर पायाभुत सुविधा मिळाल्या पाहिजेत तसेच आजरा तालुक्यातील बिगरशेती NA केलेल्या सर्व गट नंबर प्रकरणांची परिपूर्ण चौकसी समिती नेमून चौकशी झाली पाहिजे. याबाबत मुक्ती संघर्ष समितीच्या वतीने संग्राम सावंत यांनी प्रसिद्धी पत्रक काढले आहे दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे. मुरुडे (वा आजरा) येथील नविन वसलेल्या भावेसूरी कॉलनीमधील येथील रहिवाशी लोकाना पायाभूत सुविधा मिळाल्या पाहिजेत. भावेसूरी कॉलनीमधील संबंधित जागा मालकानी रहिवाशी प्लॉटधारकांना अकृषक (बिगरशेती) NA करून राहण्यासाठी विकले. पण तेथे गटर्स, रस्ते, वीज पुरवठा पा पायाभूत सुविधा दिलेल्या नाहीत. NA प्लॉटधारकांना रस्ता व गटर्स पाच्या सोपी उप पावसाळ्यात व इतर ऋतूमध्ये नाहक त्रास होत आहे. यासाठी त्या कॉलनीमध्ये ताबडतोब रस्ता व गटर्स व इतर पायाभूत सुविधा मिळाल्या पाहिजेत. आजरा तालुक्यातील जि. कोल्हापूर येथील सन-२०१० ते रान -२०२३ आजपर्यंत बिगरशेती NA केलेल्या सासूक्यातील सर्व गट नंबर प्रकरणांची परिपूर्ण चौकशी झाली पाहिजे तसेच बिगरशेती NA सर्व गट नंबर मधील फेरफार कसे घातले आहेत. पावावतीत संबंधित तलाठी व मंडळ अधिकारी आणि NA संदर्भातील आदेश (ऑर्डर) कशा झालेल्या आहेत. याबाबतीत तत्कालीन सर्व तहसिलदार यांची सखोल चौकशी झाली पाहिजे तसेच तत्कालीन नायब तहसिलदार डी. डी. कोळी यांच्या सह्याच्या आधारे त्यांच्या काळातील सर्व बिगरशेती (N.A.) प्रकरणांची कायदेशीररित्या चौकशी करून त्यांच्यासह सर्व संबंधितांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात आली पाहिजे.
ही चौकशी मा. उपविभागीय अधिकारीसो, आजरा भुदरगड उपविभाग, गारगोटी जि. कोल्हापूर यांनी “चौकशी समिती नेमून याबाबतीत कार्यवाही व कारवाई करण्यात आली पाहिजे अन्यथा तर दि. १७ ऑक्टोबर २०२३ पासून तहसिलदार कार्यालय आजरा जि. कोल्हापूर यांच्या कार्यालयासमोर बेमुदत ठिय्या आदोलन” मुक्ती संघर्ष समितीच्या वतीने करणार आहोत. यासाठीचे निवेदन मुख्यमंत्री महसूल मंत्री विभागीय आयुक्त जिल्हाधिकारी तसेच प्रत्यक्ष भेटून उपविभागीय अधिकारी गारगोटी आणि तहसीलदार आजरा यांना मुक्ती संघर्ष समितीच्या वतीने देण्यात आलेली आहेत. या अगोदरही दि३ व ४ ऑक्टोबर, २०२३ आणि दि. २२ सप्टेंबर २०२३ ईमेल द्वारे तहसीलदार आजरा व उपविभागीय अधिकारी गारगोटी आणि जिल्हाधिकारी कोल्हापूर यांना निवेदन देण्यात आलेले आहेत मात्र याची कोणती दखल प्रशासन व शासनाने दखल घेतलेली नाही. तसेच दि. १२/४ /२०२३ रोजी मा. तहसिलदारसो, तहसिलदार कार्यालय आजरा यांना निवेदन भावेश्वरी कॉलनी बुरुडे आजरा येथील रहिवाशांनी दिलेले आहे.
बुरुडे (ता. आजरा) येथील नविन वसलेल्या भावेश्वरी कॉलनीमधील गट क्रमांक अनुक्रमे ३ व १३४. १३९. १३६ असे आहेत. यामध्ये निवासी रहिवासाकरीता अकृषक (एनए) प्लॉट तयार करून जागा मालकांनी विक्री केली पण येथे पायाभुत सुविधा दिलेल्या नाहीत.
त्या सुविधा द्याव्यात अशी मागणी येथील रहिवाशानी केली आहे. याबाबतचे या अगोदर भावेश्वरी रहिवाशांनी निवेदन आजरा तहसीलदार पाना दिलेले आहे.
संबंधित जागा मालकानी प्लाँट अकृषक करून राहण्यासाठी विकले पण तेथे गटर्स, रस्ते, वीज पुरवठा पा पायाभूत सुविधा दिलेल्या नाहीत संबंधीत जागामालकानी अशा कोणत्याही सेवासुविधा न देता या प्लॉटमधील रहिवाशांची फसवणूक केली आहे. सध्या आपआपल्या खरेदी प्लॉटमध्ये नागरिकांनी गरजेपोटी घरे बांधली आहेत परंतु घरांचे सांडपाणी किंवा ये जा करण्यासाठी रस्ते किंवा लाईट्स याची कोणत्याही प्रकारच्या सोयी सुविधा दिलेल्या नाहीत. जागेची प्रत्यक्ष पाहणी करुन आम्हा रहिवाश्यांना मंडळ- अधिकारी गेले आहेत पण न्याय मिळाला नाही.
आजरा तालुक्यातील सर्व बिगरशेती (N.A.) प्रकरणाची सखोल चौकशी झाली पाहिजे सर्व संबंधित – दोषींवर कारवाई केली पाहिजे.
(१) बिगरशेती करण्यासाठी आलेले गट नं. अर्ज व त्यासोबत जोडलेल्या कागदपत्राची चौकशी व्हावी
(२) डी. डी. कोळी तत्कालीन नायब तहसिलदार यांच्याकडे तहसिलदार, आजरा म्हणून कार्यभाग असताना बिगरशेती प्रकरणांचे आदेश मंजूरी व त्यासंदर्भात झालेला पत्रव्यवहार आणि कागदपत्रांची सखोल तपासणी करावी.
(३) बिगरशेती (NA) करताना करावयची परिपूर्ण कार्यवाही झालेली आहे का? याची चौकशी व्हावी. अ) डाउन प्लॅनिंगची मंजूरी आहे का?
व) बिगरशेती करताना वरिष्ठांचे आदेश वेतले आहेत का?
क) ओपन स्पेस व इतर गोष्टी आणि रस्त्यासाठी जागा सोडल्या आहेत का?
(ड) बिगरशेतीसाठी नियमानुसार नकाशा तयार केला आहे का? तेआउट मंजूर आहे का?
(४) सरकारी जमिनीवर अतिक्रमण करून केलेल्या बिगरशेती (N.A.) प्रकरणाच्या आदेशाची. – चौकशी करा!
(५) ग्रीन झोनमध्ये झालेल्या बिगरशेती (N.A.) प्रकरणाच्या आदेशांची चौकशी करा! (६) बिगरशेती (N.A.) करताना कोणकोणाच्या NO. C. नाहरकत प्रमाणपत्र घेतलेली आहेत याची सखोल चौकशी झाली पाहिजे

(७) आजरा तालुक्यात वर्ग-२ च्या जमिनीचे बिगरशेती (N.A.) झाले आहे का? याची चौकशी व्हावी
(८) बिगरशेती झालेल्या पोटहिस्साचे फेरफार व त्यासंदर्भातील ७/१२ ची चौकशी झाली पाहिजे
(९) ओढा/नदी असताना १०० मीटरपर्यंत बिगरशेती झालेल्या प्रकरणाची चौकशी व्हावी (१०) विगरशेती (N.A.) प्रकरणांचे झालेले आदेश व त्यासंदर्भातील झालेला अंमल याची चौकशी व्हावी!
(११) कायदेशीर व बेकायदेशीररित्या झालेल्या बिगरशेती (NA.) प्रकरणातील सर्व आदेश व त्या अमलानुसार झालेल्या सर्व प्रक्रियांची सखोल चौकशी व्हावी.
१२) बिगरशेती NA सर्व गट नंबर मधील फेरफार कसे घातले आहेत. या NA संदर्भातील आदेश (ऑर्डर) कशा झालेल्या आहेत. याची सखोल चौकशी झाली पाहिजे.
आजरा तालुक्यातील सर्व बिगरशेती NA प्रकरणांची सविस्तर बनिचूक सखोल चौकशी करून सर्व
संबंधितीच्यावर कायदेशीर कारवाई झाली पाहिजे. यामध्ये दप्तर दिरंगाई व हलगर्जीपणा वेळकाढूपणा होऊ नये याची दक्षता आपण घ्यावी. तसेच ताबडतोब बुरुडे (ता आजरा) येथील नविन वसलेल्या भावेश्वरी कॉलनीमधील येथील रहिवाशी लोकांना पायाभूत सुविधा मिळाल्या पाहिजेत. यासंदर्भात उपविभागीय अधिकारी गारगोटी व तहसीलदार आजरा यांना आंदोलनाचे निवेदन देण्यात आले. तसेच पावावतीतील चर्चा तहसिलदार आजरा व उपविभागीय अधिकारी, गारगोटी यांच्याबरोबर झाली आहे. असे दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे या प्रसिद्धी पत्रकावर संग्राम सावंत, सुनिल हरेर, संजय कुंभार, अनिल चौगले, विनोद ओतारी, लखन पाटील, संगीता जानवर मंगल घोरप मोहन गावडा, भावेश्वरी कॉलनी, बुरूडे आजरा रहिवासी प्लॉटधार आणि प्रमोद पाटील, टिंगवर विटेकरी संघर्ष प्रज्ञावंत, संजय कांबळे, मजीद मुल्ता, राहुल दास, पदाधिकारी यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.
