HomeUncategorizedसंकेश्वर बांधा महामार्ग शेतकरी संघटनेचा दि. ८ रोजी जाहीर मेळावा. 🛑गवसे हायस्कूल...

संकेश्वर बांधा महामार्ग शेतकरी संघटनेचा दि. ८ रोजी जाहीर मेळावा. 🛑गवसे हायस्कूल मध्ये आण्णाभाऊ स्मृती पंधरवडा विविध उपक्रमानी संपन्न. / चंद्रशेखर बावनकुळे यांच्या वक्तव्याचा युट्युब, पोर्टल, लाईव्ह चैनल संघटनेकडून जाहीर निषेध. व कार्यक्रमावर बहिष्कार टाकण्याचा बैठकीत निर्णय.( गडहिंग्लज – चंदगड – आजरा पत्रकार संघटना.)

🛑संकेश्वर बांधा महामार्ग शेतकरी संघटनेचा दि. ८ रोजी जाहीर मेळावा.
🛑गवसे हायस्कूल मध्ये आण्णाभाऊ स्मृती पंधरवडा विविध उपक्रमानी संपन्न. / चंद्रशेखर बावनकुळे यांचा युट्युब, पोर्टल, लाईव्ह चैनल संघटने कडून जाहीर निषेध. व कार्यक्रमावर बहिष्कार टाकण्याचा बैठकीत निर्णय.( गडहिंग्लज – चंदगड – आजरा पत्रकार संघटना.)

आजरा.- प्रतिनिधी.

संकेश्वर बांधा महामार्ग शेतकरी संघटनेचा दि ०८ रोजी जाहीर मेळावा खेडे येथील हनुमान मंदिरात होणार आहे. मेळाव्यामध्ये आंदोलनाची दिशा ठरवणार असून हा मेळावा निर्णायक होणार आहे. सरकारच्या वतीने जाहीर नोटीस वेगवेगळ्या दैनिकांमधून दिल्या आहेत. परंतु स्थानिक दैनिकांना दिल्या नाहीत .त्यामुळे प्रत्यक्ष शेतकऱ्यांना नोटीस दिली जाण्याची शक्यता कमी आहे. सदर जाहीर नोटीशीला उत्तर देण्याची मुदत दि.१२/१०/२०२३ पर्यंत दिली आहे. परंतु अशा डावपेच करणाऱ्या यंत्रणेचा निषेध नुकत्याच झालेल्या मडिलगे येथील बैठकीत करण्यात आला. प्रत्येक शेतकऱ्याला स्वतंत्र वेळेत आपले म्हणणे देणे शक्य नाही; कागदोपत्री रेकॉर्ड करून कागदी घोडे नाचवण्याचे काम यंत्रणा करत आहे. सर्वांनी संघटनेमार्फत एकच कॉमन म्हणणे देण्याचा विचार करण्यासाठी व आंदोलनाची दिशा ठरवण्यासाठी मेळाव्यामध्ये सामील होणे गरजेचे आहे. प्रत्येक गावच्या वळण रस्ता काढून स्वमालकीच्या शेतकऱ्यांच्या शेतात त्यांना आता काम करण्याचे आहे. परंतु आपल्याला बाजारभावाने जमिनीची किंमत मिळाल्याशिवाय कोणीही संमती देऊ नये असे बैठकीत ठरले आहे. या मुद्द्यावर व्यापक चर्चा करण्यासाठी दि.८ रोजी खेडे, तालुका-आजरा येथे हनुमान मंदिर येथे होणार आहे. प्रत्येक गावच्या खातेदारांच्या याद्या उपलब्ध करून घेतल्या आहेत त्यामध्ये वळण रस्त्याला जाणाऱ्या जमीन मालकांची यादी पहायला मिळणार आहे. तरी सर्व बांधित शेतकऱ्यांनी वेळेवर उपस्थित रहावे असे आवाहन संघटनेने केले आहे.

गवसे हायस्कूल मध्ये आण्णाभाऊ स्मृती पंधरवडा विविध उपक्रमानी संपन्न.

येथील जनता एज्युकेशन सोसायटी आजरा संचालित बापूसाहेब सरदेसाई आर्दश हायस्कूल गवसे मध्ये संस्थेचे संस्थापक अध्यक्ष कै काशिनाथ आणा चरटी व मुख्यकार्यकारी अधिकारी कै माधवराव ( भाऊ) देशपांडे यांना अभिवादन करण्यात आले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक चंद्रकांत घुणे होते तर प्रमुख पाहुणे नुतन सरपंच सौ रेखा रणजित पाटील उपस्थित होत्या मान्यवरांच्या हस्ते कै आण्णा व भाऊच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले स्मृती पंधरवड्या निमित्त आयोजित रांगोळी व चित्रकला स्पर्धेचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले त्याचबरोबर आण्णा भाऊच्या आठवणीना उजाळा मुख्याध्यापक घुणे सर व प्रगतशील शेतकरी रणजित पाटील यांनी आपल्या मनोगतातून व्यक्त केला यावेळी गवसेच्या संरपंच पदी निवड झालेबद्दल शाळेच्या वतीने सौ रेखा रणजित पाटील यांचा सत्कार करण्यात आला यावेळी त्यांनी शाळेसाठी लागेल ती मदत करण्याचे आश्वासन दिले विविध स्पर्धेत बक्षिस पात्र विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिके देण्यात आली यावेळी माझी क्लार्क नामदेव पाटील कार्यालयन प्रमुख संदीप वाटवे शिक्षक रणजित सावंत सचिन देशमुख विवियन मस्कारनेस विद्यार्थी विद्यार्थिनी शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनिल कांबळे यांनी केले तर आभार संतोष कालेकर यांनी मानले.

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या वक्तव्याचा युट्युब, पोर्टल, लाईव्ह चैनल संघटने कडून जाहीर निषेध. व कार्यक्रमावर बहिष्कार टाकण्याचा बैठकीत निर्णय.( गडहिंग्लज – चंदगड – आजरा पत्रकार संघटना.)

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे कोल्हापूर जिल्हा दौऱ्यावर आहेत. या दौऱ्याचा व चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलेले पत्रकारांचा बाबतच्या वक्तव्याचा पत्रकार संघटने कडून प्रथम जाहीर निषेध. व कार्यक्रमावर बहिष्कार करण्याबाबतचा निर्णय संघटनेच्या झालेल्या बैठकीत घेण्यात आलेला आहे.
या कार्यक्रमावर बहिष्कार टाकून कोणीही कार्यक्रमाला जायचं नाही सदर कार्यक्रमाच्या बातम्या करायचा नाही याबाबत असा तिन्ही तालुक्यातील पत्रकारांनी एकमताने निर्णय घेतला यावेळी संघटनेच्या वतीने निषेध करण्यात आला. व कार्यक्रमादरम्यान श्री बावनकुळे यांनी आपल्या पदाधिकारी यांच्याकडून यापूर्वी कधी पत्रकारांना हक्काची वर्धापन दिनाची तरी जाहिरात दिलात का ? याची चौकशी करून जावे व आपल्या पदाधिकारी यांना पत्रकारांची कसे वागावे निवडणूक येईपर्यंत कसे संबंध ठेवावे याची शिकवण देत अहात. त्याची चौकशी करावी व पुन्हा बोलताना शब्द जपून वापरावे असा उपरात्मक सल्ला पत्रकारांच्या वतीने यावेळी देण्यात आला. या बैठकीला गडहिंग्लज चंदगड आजरा तीनही तालुक्यातील युट्युब पोर्टल लाईव्ह चॅनल सर्व पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.