HomeUncategorizedव्यवहार्य भूमिका घेवूनयच कारखाना कसा सुरू राहिल हेच संचालक मंडळाचे ध्येय.- आजरा...

व्यवहार्य भूमिका घेवूनयच कारखाना कसा सुरू राहिल हेच संचालक मंडळाचे ध्येय.- आजरा साखर – चेअरमन. सुनिल शिंत्रे..

आजरा.- प्रतिनिधी.

आजरा येथील आजरा शेतकरी सहकारी साखर कारखाना लिमिटेड गवसे यांच्या वतीने व्यवस्थापनाकडून प्रसिद्धी पत्रक देण्यात आले आहे. दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.
सन २०१९/२० आणि २०२०/२२ या कालावधीमध्ये आजरा शेतकरी सहकारी साखर कारखान्याची आर्थिक स्थिती बिकट झाल्याने बंद ठेवावा लागत होता. बंद कालावधी मध्ये पुर्वीची कर्जे व देणी आणि बंद कालावधीमध्ये नव्याने निर्माण झालेली देणी यामुळे कारखान्याची आर्थिक परिस्थिीती आणखीणच बिघडली सन २०१९/२० आणि २०२०/२१ या कालावधीमध्ये उत्पन्न शुन्य रूपये आणि कर्जावरील व्याज, कर्मचारी पगार भविष्य निर्वाह निधी, शासकीय देणी इत्यादीची देयता मात्र निर्माण झाली. तसेच २०१८/१९ मध्ये उत्पादित झालेली साखर देखील एम.एस.पी. पेक्षाही दर कमी आलेने साखरेची उशीरा विकी झालेने व्याजाचा बोजा वाढला. परिणामी कारखान्याची बँकेकडून कर्ज घेण्यासाठी पात्रता राहिली नाही. तथापी आजरा साखर कारखान्याचा सभासद शेतकरी व कर्मचा-यांच्या हिताकरीता कारखान्याच्या सर्व संचालक मंडळाने कारखाना सुरू करण्यासाठी शासकीय दरबारी अथक प्रयत्न केले त्याला यश येवून कारखाना सुरू करण्याचे ठरले. याकरीता कोल्हापूर जिल्हा मध्य सहकारी साखर कारखान्यास कर्जे देण्यास संम्मती दिली. यावेळी कारखान्याच्या सर्व संचालक मंडळाने सन २०२१/२२ मध्ये आर्थिक तज्ञांचा सल्ला घेवून कारखान्याची सर्व देणी कायम ठेवून अकोटींग स्टॅडर्ड प्रमाणे कारखान्याची सन २०२१/२२ ची ताळेबंद व नफा तोटा पत्रके व्यवहार्य पध्दतीने तयार केली. सदर पत्रके ही बँकेसही मान्य झाल्याने बँकेने कारखान्यास कर्ज पुरवठाही केला. सन २०२१/२२चा गळीत हंगाम घेणेपुर्वी कारखान्याने शेतक-यांची मागणी विचारात घेवून गळीत हंगाम २०१८/१९ मध्ये देय असलेली एफ.आर.पी. ची थकीत रक्कम गळीत हंगाम २०२१/२२ सुरू होणेपुर्वी देणे गरजेचे होते. थकीत रक्कम रू. १५ कोटी ४७ लाख तसेच तोडणी वाहतुकीची बिले कमिशनसह रू.५ कोटी ४१ लाख त्याचप्रमाणे २०१८/१९ नंतर २०२०/२१ आखेर बँकेचे कर्जावरील व्याज जवळपास ४९ कोटी तसेच कामगार थकीत पगारापैकी कारखाना सुरू झालेनंतर कामगारांच्या आर्थिक अडचण लक्षात घेवून थकीत पगारापैकी दोन पगार तसेच थकीत प्रा.फंडातील कांही रक्कम. ग्रॅच्युईटीचे हप्ते बैंक ऑफ इंडियाकडे थकीत कर्जाचे ओ.टी.एस. करणेकरीता उभी करावी लागलेली रक्कम इ रक्कमा कारखान्याने कर्ज स्वरूपात निधी उभाकरून दिला आहे.
त्यामुळे कारखान्याकडील कर्जामध्ये देखील वाढ झालेली आहे. त्यामुळे ताळेबंदामध्ये कर्जाच्या रक्कमा वाढलेने तसेच उत्पन्न कमी झालेने नेटवर्थवर परिणाम होवू नये याकरीता अकौंटींग स्टैंडर्ड प्रमाणे व्यवहार्य पध्दतीला घरून आर्थिक पत्रके तयार केलेली आहेत त्यास वैधानिक लेखापरीक्षकांनीही प्रमाणीत केले आहे. तसेच आजरा शेतकरी साखर कारखान्यास सध्या के डी.सी.सी. बँकेकडून कर्ज पुरवठा सुरू आहे, त्या बँकेस मान्य असेल अशा पध्दतीची बैंक अकौंटींग स्टॅन्डर्ड प्रमाणे ताळेबंद व नफातोटा पत्रके ही संचालक मंडळाने सर्वानुमते तयार केलेली आहेत. आजरा साखर कारखाना सभासद शेतकरी व कर्मचारी यांच्या हिताचाच विचार कारखान्याच्या सर्व सकंचालक मंडळाचा आहे. व्यवहार्य भूमिका घेवूनय कारखाना कसा सुरू राहिल हेच संचालक मंडळाचे ध्येय आहे. असे दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.