HomeUncategorizedश्री रवळनाथ विकास सेवा संस्था मर्या, चितळे संस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा वादळी.(...

श्री रवळनाथ विकास सेवा संस्था मर्या, चितळे संस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा वादळी.( संस्थेकडून वार्षिक कर्ज वाटप ८० लाख तरीही संस्था तोट्यात कशी – हा संशोधनाचा भाग सभासदांच्या मध्ये चर्चेचा विषय. )

श्री रवळनाथ विकास सेवा संस्था मर्या, चितळे संस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा वादळी.( संस्थेकडून वार्षिक कर्ज वाटप ८० लाख तरीही संस्था तोट्यात कशी – हा संशोधनाचा भाग सभासदांच्या मध्ये चर्चेचा विषय. )

आजरा.- प्रतिनिधी.

श्री. रवळनाथ विकास सेवा संस्था मर्या, चितळे. ता आजरा या संस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा शनिवार दि ३०/०९/२०२३ रोजी विद्यामंदिर चितळे येथे पार पाडली या सभेस चेअरमन, सर्व संचालक व सभासद उपस्थित होते. संचालक मंडळाकडून सभासदांच्या प्रश्नांना योग्य उत्तर न मिळाल्या सभेच्या सुरुवाती पासूनच संचालक मंडळ व सभासद यांच्या मध्ये वादाला सुरवात झाली. सभासदांच्या कर्जातून कपात होणाऱ्या शेअर भांडवलाची जमा पावती कधीही सभासदांना मिळालेली नाही.
हा प्रश्न संजय सांबरेकर यांनी सभेमध्ये मांडला त्याचे उत्तर म्हणून संस्थेचे सेक्रेटरी यांनी ही आपली चूक असल्याचे कबुल केले. सभासदांनी वारवार जमा पावत्या मागूनही त्या त्यांना मिळालेल्या नाहीत यास सर्वस्वी संचालक मंडळ जबाबदार असल्याने सभासदांनी संचालकांना जाब विचारला त्याच प्रमाणे संस्था स्थापनेपासून आज तागायत सभासदांना लाभांश स्वरुपात एक रुपया ही मिळालेला नाही. संस्था कायम २० वर्ष तोट्यात आहे. या वरुण सभासद व संचालक यामध्ये खडाजंगी झाली
.

त्याच प्रमाणे संस्थेचे कार्य क्षेत्र मर्यादित चितळे असताना संचालक मंडळाने तालुक्यातील अनेक गावामधून पै पाहुणे यांना संस्थेमध्ये सभासदत्व दिले याचा जाब संस्थापक चंद्रकांत सांबरेकर यांनी संचालकांना विचारला व कार्य क्षेत्रा बाहेरील सभासद कमी करण्यासाठी उपस्थित सभासदांनी हात वर करून बहुमताने ठराव करनेस संचालक मंडळाला भाग पाडले. या विषयावरून सभासद संचालक मंडळ न्यांच्यात एकमेकांच्या अंगावर धावून जाणे, चेअरमन सचिव व संचालक मंडळ सभेतून पळून जाणे असे प्रकार झाले.
संस्थेच्या ठेवीदारांना व कर्जदारांना पासबूक देण्याविषयी चा ठराव ग्रामपंचायत सदस्य मारुती गुरव यांनी उपस्थित केला. इथून पुढील काळात सेक्रेटरी यांनी पासबूक देण्याचे कबूल केले पुढील आर्थिक वर्षात सभासदांना लाभांश देण्याचा ठराव सहमत करण्यात आला संस्थेची ही वार्षिक सर्वसाधारण सभा बादळी स्वरुपात पार पडली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.