HomeUncategorizedशिवप्रेमीसाठी आनंदाची बातमी छत्रपती शिवाजी महाराजांची वाघ नखे 🚩लंडनवरुन 👇 या तारखेला...

शिवप्रेमीसाठी आनंदाची बातमी छत्रपती शिवाजी महाराजांची वाघ नखे 🚩लंडनवरुन 👇 या तारखेला येणार महाराष्ट्रात….पहा तर हि बातमी.

शिवप्रेमीसाठी आनंदाची बातमी छत्रपती शिवाजी महाराजांची वाघ नखे 🚩लंडनवरुन 👇 या तारखेला येणार महाराष्ट्रात….पहा तर हि बातमी.

मुंबई. – प्रतिनिधी.

महाराष्ट्रातील तमाम शिवप्रेमींसाठी एक आनंदाची बातमी आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनखे लंडनवरुन परत आणण्याच्या हालचालींना आता वेग आला आहे. येत्या नोव्हेंबर महिन्याच्या १६ तारखेला महाराजांची वाघनखे मुंबईत आणली जाणार आहे. महाराष्ट्रातील शिवप्रेमींसाठी ही अतिशय अभिमानाची बाब आहे. राज्य सरकार ३ ऑक्टोबर रोजी लंडनमधील व्हिक्टोरिया आणि अल्बर्ट वस्तू संग्रहालयासोबत छत्रपती शिवाजी महाराजांच्या वाघनखे भारतात आणण्याबद्दल करार करणार आहे. या करारानंतर पुढील ३ वर्षांसाठी वाघनखे महाराष्ट्रात आणण्याची प्रक्रिया सुरु होणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांनी याच वाघनखाच्या सहायाने अफजल खानाचा कोथळा बाहेर काढला होता. तिच वाघनखे भारतात आणून येथील जनतेच्या दर्शनासाठी ठेवण्यात येणार आहेत.
दरम्यान, ही वाघनखे महाराष्ट्रात आणल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तथा उपमुख्यमंत्री अजित पवार हे देखील सोबत राहतील. महाराष्ट्रात वाघनखे येताच एक मोठा सोहळा आयोजित केला जाणार असल्याची माहितीही मुनगंटीवार यांनी साम टीव्हीला दिली आहे.

असा असेल वाघनखांचा प्रवास

१६ नोव्हेंबरला शिवरायांच्या वाघनखांचे मुंबईत आगमन.

१७ नोव्हेंबरला सातारा येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालयात वाघनखांची स्थापना.

१७ नोव्हेंबर २०२३ ते २४ ऑगस्ट २०२४ दरम्यान वाघनखे सातारा येथेच प्रदर्शनासाठी ठेवली जातील.

१५ ऑगस्ट २०२४ ते एप्रिल २०२५ पर्यंत वाघनखे नागपूर येथील शासकीय संग्रहालयात ठेवली जातील.

एप्रिल २०२५ ते नोव्हेंबर २०२५ या काळात वाघनखं कोल्हापूर येथील शासकीय संग्रहालयात ठेवली जातील.

नोव्हेंबर २०२५ ते नोव्हेंबर २०२६ दरम्यान वाघनखे मुंबईतील छ्त्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालयात प्रदर्शनासाठी ठेवली जातील.

१६ नोव्हेंबर २०२६ रोजी वाघनखे पुन्हा लंडनला व्हिक्टोरिया आणि गिल्बर्ट वस्तुसंग्रहालयात पाठवली जातील.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.