HomeUncategorizedकोल्हापूर जिल्हा स्वराज्य सेवा संस्था आयोजित - गिरणी कामगार व वारसाचा मेळावा...

कोल्हापूर जिल्हा स्वराज्य सेवा संस्था आयोजित – गिरणी कामगार व वारसाचा मेळावा संपन्न. – -/ ईद ए मिलादच्या निमित्ताने वकृत्व स्पर्धा – उर्दू विद्यामंदिर आजराचे यश.

🛑 कोल्हापूर जिल्हा स्वराज्य सेवा संस्था आयोजित – गिरणी कामगार व वारसाचा मेळावा संपन्न. -/ ईद ए मिलादच्या निमित्ताने वकृत्व स्पर्धा – उर्दू विद्यामंदिर आजराचे यश.

आजरा.- प्रतिनिधी.

आजरा येथे गिरणी कामगार तरुण सेवा संस्था मुंबईचे कोल्हापूर जिल्हा प्रतिनिधी व सहकारी यांच्या सहकार्याने कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व गिरणी कामगार व त्यांचे म्हाडा लिंकवर मिल वेकर्स “इलिजिबीलीटी” फार्म अपडेट करणेचे शासकीय काम व गिरणी कामगारांच्या इतर समस्या सोडवण्यासाठी रविवार दि. २४ रोजी गंगामाई वाचन मंदिर आजरा येथील सभागृहात मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी कोल्हापूर जि. अध्यक्ष अर्जुन भादवणकर व उपाध्यक्ष भीमराव साळगावकर यांनी म्हाडा लिंकवर मिल वेकर्स दिली “इलिजिबीलीटी” फार्म अपडेट करणेबाबत गिरणी कामगारांना माहिती दिली.
कोणत्याही गिरणी कामगाराला विनाशुल्क सदस्य फॉर्म भरण्यासाठी कामगार वारसदार यांनी आपले आधार कार्ड आधार कार्ड ला लिंक असलेला मोबाईल नंबर सोबत घेऊन तसेच म्हाडाची पावती व गिरणी कामगार असल्याचा पुरावा सदर फॉर्म मध्ये भरायचा असल्याने संबंधित फॉर्म ऑनलाइन भरण्यासाठी लागणारे कागदाची माहिती दिली. प्रामुख्याने मिल वर्कर पात्रता सिद्ध करण्याचे काम शासनाने नव्याने लागू केल्याने महत्त्वाचे अपडेट गिरणी कामगारांनी करून घ्यावे असे आवाहन यावेळी या संघटनेच्या वतीने मेळाव्यात करण्यात आले. यावेळी संजय मांगले, शिवाजी पाटील, दयानंद दळवी, अभिजीत पाटील, आनंदा देवकर, उत्तम अर्दाळकर, मारुती पाटील, शिवाजी जाधव, संजय पाटील, सुरेश कांबळे, दिगंबर पारखे, तसेच अंबाजी गुरव, अजय पाटील, आत्माराम भादवणकर, अशोक शिंदे, प्रतीक पाटील यांचे मोलाचे सहकार्य लाभले. यावेळी आजरा तालुक्यातील गिरणी कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

🛑 ईद ए मिलादच्या निमित्ताने वकृत्व स्पर्धा – उर्दू विद्यामंदिर आजराचे यश.

फीकर-ए अत्फाल टीचर्स ग्रुप गडहिंग्लज व शाळा व्यवस्थापन समिती उर्दू विद्यामंदिर नेसरी यांच्या वतीने ईद ए मिलादच्या निमित्ताने शालेय विद्यार्थ्यांसाठी दोन गटामध्ये कीरात, नातख्वानी, वकृत्व स्पर्धा व प्रश्नमंजूषा या स्पर्धाआयोजित करण्यात आले होते. यामध्ये आमच्या उर्दू विद्यामंदिर आजरा च्या विद्यार्थ्यानी नेत्रदीपक यश संपादन केले. लहान गटाच्या वकृत्व स्पर्धेमध्ये कु.जारा तोहीद माणगावकर हीने प्रथम क्रमांक पटकाविला, कीरात मध्ये कु.सबिहा सलीम किल्लेदार हीने प्रथम क्रमांक मिळविला.नातख्वानीमध्ये कु.अलीशा शफी तकीलदार हीने तृत्तीय क्रमांक मिळविला तर प्रश्नमंजूषामध्ये कु.उसेद रिजवान माणगांवकर,कु.उमामा मन्सुर बुखारी व कु. सिदरा ताहीर माणगांवकर यांच्या गृपने द्वितीय क्रमांक मिळविला. यशस्वी विद्यार्थ्याना आकर्षक ट्रॉफी प्रमाणपत्र देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरवण्यात आले. सदर विद्यार्थ्याना शिक्षक समिउल्ला नाईकवाडी, मिनाज नदाफ, युनूस नाईक यांचे मार्गदर्शन लाभले तर मुख्याध्यापक युनूस लाडजी ,कौसरबानो लाडजी, मासाहेबी मोमीन, मोहम्मद तगारे, आसमा मुल्ला व वसिम पटेल यांचे प्रोत्साहन लाभले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.