🛑आण्णा भाऊ आजरा सूत गिरणी – आजरा नगरपंचायतने राबविले.- निर्माल्य दान अभियान. – / ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या वनडेमध्ये विजय मिळवल्यानंतर 🇨🇮भारताने पाकिस्तानला पहिल्या क्रमांकावरून केलं बाजूला…👇
आजरा.- प्रतिनिधी.
आण्णा भाऊ आजरा सूत गिरणी चे वतीने निर्माल्य दान अभियान राबविण्यात आले.
आजरा नगरपंचायत यांनी यामध्ये सहकार्य केले. वस्त्रोध्योगातील अडचणी तून वाटचाल करीत असताना देखील आजरा व परिसरातील सामाजिक बांधिलकी जपनेचे हेतूने हा समाज उपयोगी उपक्रम राबविण्यात आला.मोरजकर महाराज घाट वडाचा खोंड चित्री पूल परोली पूल तसेच सूत गिरणी परिसरातील ग्रामीण भागातील भाविकांचे सहकार्य व उत्साह या बळावर हे अभियान राबविण्यात आले.मध्येच येणाऱ्या पावसाच्या सरी परंतु उत्साह वाढतच होता.आण्णा भाऊ संस्था समूहाचे प्रमुख अशोक आण्णा, सूत गिरणी अध्यक्षा अन्नपूर्णा चराटी, व्हा चेअरमन डॉ अनिल देशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली जनरल मॅनेजर अमोघ वाघ व स्टोअर परचेस ऑफिसर राजेंद्र धुमाळ यांनी नियोजन केले. गार्डन विभागाचे कर्मचारी यांनी यामध्ये मोठे योगदान दिले.
🛑 ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या वनडेमध्ये विजय मिळवल्यानंतर 🇨🇮भारताने पाकिस्तानला पहिल्या क्रमांकावरून केलं बाजूला…👇
क्रीडा न्यूज.-

वनडे वर्ल्ड कप आता अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेला असतानाच टीम इंडिया जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. आशिया कपमध्ये विजय मिळवल्यानंतर आता भारतीय टीम वनडे क्रिकेटमध्ये पहिल्या क्रमांकावर पोहोचली आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या वनडेमध्ये 5 विकेटने विजय झाल्यानंतर भारतीय टीम आयसीसी वनडे क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर पोहोचली आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या या वनडेमध्ये विजय मिळवून भारताने इतिहास घडवला आहे. वनडेप्रमाणेच टीम इंडिया टेस्ट क्रिकेट आणि टी-20 क्रिकेटमध्ये पहिल्या क्रमांकावर आहे. क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये पहिल्या क्रमांकावर राहण्याचा विक्रम याआधी फक्त एकाच टीमला करता आला होता. दक्षिण आफ्रिकेने 2014 साली हा विक्रम केला होता. भारतीय टीम टेस्ट क्रिकेटमध्ये 264 पॉईंट्स आणि टी-20 क्रिकेटमध्ये 118 पॉईंट्ससह पहिल्या क्रमांकावर आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या वनडेमध्ये विजय मिळवल्यानंतर भारताने पाकिस्तानला पहिल्या क्रमांकावरून बाजूला केलं आहे. या सामन्याआधी भारत आणि पाकिस्तान 115 पॉईंट्ससह बरोबरीत होते, तर ऑस्ट्रेलिया 113 पॉईंट्ससह थोडी मागे होती.
