HomeUncategorizedगडहिंग्लज भाजप कार्यकर्ते नाराज.-जुन्या व निष्ठावंत कार्यकर्त्यांना विश्वासात न घेता कारभार.( प्रदेश...

गडहिंग्लज भाजप कार्यकर्ते नाराज.-जुन्या व निष्ठावंत कार्यकर्त्यांना विश्वासात न घेता कारभार.( प्रदेश अध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांच्या दौऱ्याच्या पूर्वतयारीसाठी बोलावलेल्या बैठकीकडे निमंत्रण असुनही नाराजानी फिरवली पाठ )

गडहिंग्लज भाजप कार्यकर्ते नाराज.-
जुन्या व निष्ठावंत कार्यकर्त्यांना विश्वासात न घेता कारभार.
( प्रदेश अध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांच्या दौऱ्याच्या पूर्वतयारीसाठी बोलावलेल्या बैठकीकडे निमंत्रण असुनही नाराजानी पाठ )

गडहिंग्लज.- प्रतिनिधी.

आजरा तालुका भाजप यांच्या पाठोपाठ गडहिंग्लज तालुका व शहरच्या भाजप कार्यकारिणी पदाधिकारी निवडीत् अनेक वर्षापासून पक्षाची धुरा सांभाळणाऱ्या जुन्या व निष्ठावंत कार्यकर्त्यांना डावलून त्यांना विश्वासात न घेता प्रादेशिक असमतोल ठेवून जाहीर केल्या असून त्या लोकशाही पध्दतीने केलेल्या निवडी नसून मर्जीतील लोकांच्या केलेल्या नियुक्त्या आहेत.
या नियुक्त्या रद्द करुन सहमतीने फेर कार्यकारीणी जाहीर करावी. अशी मागणी भाजपच्या नाराज व निष्ठावंत कार्यकर्त्यांनी आणि पक्षाच्या माजी पदाधिकारी यानी भाजपचे नेते व गडहिंग्लज सहकारी साखर कारखान्याचे व्हा. चेअरमन प्रकाशराव चव्हाण यांच्याकडे केली आहे. चिंचेवाडी येथील चव्हाण फार्म हाऊसवर कार्यकर्त्यांची बैठक पार पडली. भाजपचे माजी कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांनी हॉटेल सुर्या येथे प्रदेश अध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांच्या दौऱ्याच्या पूर्वतयारीसाठी बोलावलेल्या बैठकीकडे निमंत्रण असुनही ह्या नाराजानी पाठ फिरवली. व भेटण्यास नकार दिला होता. आजरा तालुका भाजपा पाठोपाठ गडहिंग्लज भाजपात नाराजी नाट्य सुरु झाल्याने गडहिंग्लज उपविभागातील भाजपातील अंतर्गत राजकारण चव्हाट्यावर आले आहे. भाजपचे महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ते व राज्यसभा खासदार धनंजय महाडिक् सोमवारी दुपारी चार वाजता गडहिंग्लज शासकिय विश्रामगृहावर नाराज कार्यकर्त्यांना भेटीसाठी बोलावले आहे. मात्र गडहिंग्लज उपविभागातील भाजपातील नाराजी नाट्य संपुष्टात येणार का अशी विचारणा होत आहे. प्रकाश चव्हाण यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीला भाजपचे माजी जि प सदस्य अॅड. हेमंत कोलेकर, माजी जिल्हा उपाध्यक्ष मारुती राक्षे, माजी तालुका अध्यक्ष मार्तंड जरळी, माजी उपनगराध्यक्ष व गडहिंग्लज शहर अध्यक्ष रमेश रिंगणे, माजी तालुका उपाध्यक्ष माजी नगरसेवक इंजिनिअर चंद्रकांत सावंत, काही कार्यकर्ते उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.