HomeUncategorizedवनक्षेत्र हद्दीत चिखलात जखमी अवस्थेत असलेल्या सांबरावर उपचार करुन. - जंगलात सोडले...

वनक्षेत्र हद्दीत चिखलात जखमी अवस्थेत असलेल्या सांबरावर उपचार करुन. – जंगलात सोडले सुरक्षित

चंदगड वनक्षेत्र हद्दीत चिखलात जखमी अवस्थेत असलेल्या सांबरावर उपचार करुन. – जंगलात सोडले सुरक्षित

चंदगड.- प्रतिनिधी.

वनपरिमंडळ चंदगड कडील नियतक्षेत्र उमगाव कडील मौजे नागवे जंगल कक्ष क्रमांक २६ मध्ये सांबर वन्यप्राणी जखमी अवस्थेत चिखलात रुतून बसलेले फिरतीचे वेळी वनरक्षक, वनसेवक यांना आढळून आले.
सदर घटनेची माहिती वनरक्षक उमगाव यांनी वनपाल चंदगड यांना दिली. तात्काळ वनपरीमंडळ चंदगडकडील सर्व वनरक्षक, वनसेवक यांना घटनास्थळी पाठवून देऊन चिखलात जखमी अवस्थेत बसलेले सांबर वन्यप्राणी याला चिखलातून बाहेर काढून पशुवैद्यकीय अधिकारी चंदगड यांना घटनास्थळी बोलावून त्याच्यावर प्राथमिक उपचार करून त्याला जंगलात सुरक्षित ठिकाणी सोडले. सदरची कारवाई नंदकुमार भोसले वनक्षेत्रपाल चंदगड, कृष्णा डेळेकर वनपाल चंदगड यांचे मार्गदर्शनाखाली तानाजी कळवीकट्टीकर वनरक्षक उमगाव, मेहबूब सनदी वनरक्षक झांबरे, खंडू कातकडे वनरक्षक सुळे, गुंडू देवळी वनसेवक उमगाव, बुधाजी कांबळे वनसेवक झांबरे, विलास इलगे वाहन चालक व ग्रामस्थ आदींनी केली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.