HomeUncategorizedआजरा सुळेत गळफास घेऊन एकाची आत्महत्या. - / आजरा पोलीस ठाण्याच्या वतीने...

आजरा सुळेत गळफास घेऊन एकाची आत्महत्या. – / आजरा पोलीस ठाण्याच्या वतीने गणेशोत्सव अनुषंगाने.- आजरा तालुक्यातील ०५ इसम हदपार.

🛑आजरा सुळेत गळफास घेऊन एकाची आत्महत्या.

🛑आजरा पोलीस ठाण्याच्या वतीने गणेशोत्सव अनुषंगाने.- आजरा तालुक्यातील ०५ इसम हदपार.

आजरा. – प्रतिनिधी.

आजरा ता. सुळे येथे माळाप्पा मारुती कुरबर (वय २१, मूळ गाव रा. यादगुड ता. हुक्केरी जि. बेळगावी राज्य कर्नाटक) याने गोठ्यात गळफास घेऊन आत्महत्या केली. असून शुक्रवारी सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास सदर प्रकार घडला. याबाबतची वर्दी मलिकार्जुन मारुती कुरबर (वय २३, व्यवसाय शेती रा. यादगुड ता. हुक्केरी जि. बेळगावी ) पोलिसात दिली.
याबाबत अधिक माहिती अशी की, यातील मयत हा वर्दीदार यांचा लहान भाऊ असुन वरील तारखेस वेळी व ठिकाणी मयत याने अज्ञात कारणावरुन प्रकाश धोंडीराम केसरकर रा. सुळे धनगरवाडा ता. आजरा यांचे राहते घराचे पाठिमागील जनावारांचे गोठ्याच्या छतास असणाऱ्या लोंखडी बारला दोरीने बांधून गळफास लावुन घेतला. यात त्यांचा मृत्यू झाला अधिक तपास आजरा पोलीस करीत आहेत.

आजरा पोलीस ठाण्याच्या वतीने गणेशोत्सव अनुषंगाने.- आजरा तालुक्यातील ०५ इसम हदपार.

आजरा येथे सालाबादप्रमाणे सार्वजनिक गणेशोत्सव सन साजरा केला जात आहे. गणेशोत्सव सणाचे अनुशंगाने आजरा तालुक्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी म्हणून सी. आर. पी. सी. कलम १४४ |२| अन्वये प्रतिबंधक कारवाई करण्यात आलेली आहे. आजरा तालुक्यातील १) राहिल अस्लम खेडेकर रा. आमराई गल्ली आजरा ता. आजरा जि. कोल्हापूर. २ आफताब सादिक सिराज रा. आमराई गल्ली आजरा ता. आजरा जि. कोल्हापूर, ३) हुजेफा शकील सिराज रा. आमराई गल्ली आजरा ता. आजरा जि. कोल्हापूर, ४) आरिफ महमद सिराज रा. आमराई गल्ली आजरा ता. आजरा जि. कोल्हापूर, ५५ सादिक रहिमबक्ष सिराज रा. आमराई गल्ली आजरा ता. आजरा जि. कोल्हापूर, यांना गणेशोत्सव कालावधीत दि. १९/०९/२०२३ रोजी ते दि. २८/०९/२०२३ रोजी पर्यंत आजरा तालुका कार्यक्षेत्रात प्रवेश करण्यास प्रतिबंध करणेत आलेचे आदेश श्री. राजीव नवले मा. उपविभागीय पोलीस अधिकारी गडहिंग्लज विभाग गडहिंग्लज यांनी पारित केले आहेत. त्याचे अंमलबजावणी करण्यात आली आहे. गणेश उत्सव सण शांततेत कोणताही कायदा व सुव्यस्थेचा प्रश्न निर्माण न होता पारंपारीक पद्धतीने साजरा करावा असे आव्हान सर्व सार्वजनिक गणेश मंडळाना श्री. सुनिल हारुगडे सहायक पोलीस निरीक्षक आजरा पोलीस ठाणे यांचेवतीने करण्यात येत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.