इंचलकरंजी येथील रोटरी क्लबची साथ – संयुक्त हिंदवी स्वराज्य ग्रुप उत्तुरचा मदतीचा हात.-देत. ( ४० वर्षानंतर संपली काठीची साथ. – अपंगांना दिले कृत्रिम हात व पाय.)
आजरा.- प्रतिनिधी.

इंचलकरंजी येथील रोटरी क्लबची साथीने व संयुक्त हिंदवी स्वराज्य ग्रुप उत्तुरच्या मदतीचा हात देत ४० वर्षानंतर संपली काठीची साथ
६ ऑगस्ट रोजी इचलकरंजी येथे आयोजित केलेल्या रोटरी क्लब आयोजित कृत्रिम हात व पाय या शिबिरासाठी संयुक्त हिंदवी स्वराज्य ग्रुपने उतूर व परिसरातील काही गरजू अपंग व्यक्तींना या शिबिरामध्ये सहभागी करून त्यांना मदतीचा हात दिला. तर काहींना पाय दिला.या उपक्रमामध्ये बामणे गावातील व्यक्तीस तब्बल ४० वर्षानंतर कृत्रिम पाय बसवून काठीचा आधार संपला यावेळी त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद पाहून सारेजण द्विगुणित झाले व त्यांनी संयुक्त हिंदवी स्वराज्य ग्रुपच्या सदस्यांच्या पाठीवर हात ठेवून ग्रुपच्या पुढील उपक्रमासाठी शुभेच्छा व शुभआशीर्वाद दिला .त्यावेळी त्यांनी ” माणसात देव दिसला’ ही उपमा दिली.हा उपक्रम त्यांच्या पुढील आयुष्यासाठी एक आनंदी भेटच देऊन गेला असे उद्गार बाकीच्या गरजू व्यक्तींनी व्यक्त केले.या उपक्रमासाठी जि.प.सदस्य श्री.उमेश आपटे व डॉ.सचिन धुरे ग्रुपचे सर्व सदस्य यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
या शिबिरात १) ईश्वर पाटील (गुरव) बामणे २) आक्काताई संतंगी उतूर ३) सुभाष धोंडीबा शिपुरकर, ४) दिनकर बंडू पवार ५) रमेश चौगुले
या नागरिकांचे काहींचे हात व पाय बसवण्यात आले.
