HomeUncategorizedव्यंकटराव माध्यमिक शिक्षण विभाग जि .प विद्यार्थ्यांच्या आजी- आजोबांचे पाद्यपूजन उत्साहात संपन्न....

व्यंकटराव माध्यमिक शिक्षण विभाग जि .प विद्यार्थ्यांच्या आजी- आजोबांचे पाद्यपूजन उत्साहात संपन्न. 🛑 सुवर्णपदक विजेती रितूचा व्यंकटरावमध्ये सत्कार.

🛑व्यंकटराव माध्यमिक शिक्षण विभाग जि .प विद्यार्थ्यांच्या आजी- आजोबांचे पाद्यपूजन उत्साहात संपन्न. 🛑 सुवर्णपदक विजेती रितूचा व्यंकटरावमध्ये सत्कार.

आजरा..-प्रतिनिधी.

आजरा येथील माध्यमिक शिक्षण विभाग जि .प. कोल्हापूर यांच्या परिपत्रकानुसार प्रशालेतील विद्यार्थ्यांच्या आजी आजोबांचे प्रशालेत स्वागत करून त्यांचे आदरातिथ्य करावे.. तसेच त्यांचे पाल्य नात किंवा नातू यांचे कडून सन्मानपूर्वक पाद्यपूजन करण्याचा उपक्रम आजरा महाल शिक्षण मंडळ आजरा संचलित व्यंकटराव हायस्कूल व जुनिअर कॉलेज आजरा या प्रशालेमध्ये आज नुकताच संपन्न झाला. या उपक्रमाला पालक ,आजी आजोबा यांचे कडून चांगला प्रतिसाद मिळाला.. आजी आजोबांचे त्यांच्या नात नातूं समवेत व्यंकटराव कला झंकारच्या ढोल ताशानी वाजत गाजत व्यासपीठावर आणण्यात आले. व पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत करुन तिथे आयोजित आसनावर बसवून त्यांच्या नात- नातूंकडून पाद्यपूजन करणे आले. मराठी विषय शिक्षिका श्रीम.एन.ए मोरे यांनी स्वरचित कविता सादर सहावी व सातवी इयत्तेतील विद्यार्थ्यांनी आजी आजोबांच्या जीवनावर आधारित एक सुंदर हृदयस्पर्शी नाटिका विद्यार्थ्यांनी सादर केली.. यासाठी श्रीम ए.बी.पुंडपळ, श्रीम आर.एन. पाटील यांचे मार्गदर्शन मिळाले. त्यानंतर आजींनी छान छान उखाणे घेतले.. आजोबांचे व आजींचे मनोगत झाल्यानंतर चहापान करून कार्यक्रमाची सांगता झाली..
या उपक्रमाला आजरा महाल शिक्षण मंडळ आजराचे अध्यक्ष मा श्री जयवंतराव शिंपी सर्व संचालक मंडळ ,प्राचार्य श्री आर जी कुंभार ,पर्यवेक्षिका सौ व्ही.जे शेलार यांचे प्रोत्साहन लाभले.
तसेच सांस्कृतीक विभागातील सर्व शिक्षक- शिक्षिका, विविध शालेय समिती प्रमुख व सहकारी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी वर्गशिक्षक व विद्यार्थी यांनी प्रत्यक्ष सहभाग घेऊन नियोजनपूर्वक यशस्वीरीत्या हा उपक्रम संपन्न केला. विद्यार्थी व पालकांकडून या उपक्रमाचे कौतुक होत आहे.

🛑 सुवर्णपदक विजेती रितूचा व्यंकटरावमध्ये सत्कार.

आजरा येथील व्यंकटराव हायस्कूल, आजरा या प्रशालेची माजी विद्यार्थिनी रितू जितेंद्र शेलार हिने ‘बॅचलर ऑफ आर्किटेक्चर’ या पदवी शिक्षणामध्ये शिवाजी विद्यापीठ गुणवत्ता यादीमध्ये गोल्ड मेडल मिळवून अव्वल स्थान प्राप्त केले
तिच्या या यशाबद्दल आमच्या आजरा महाल शिक्षण मंडळ आजराचे अध्यक्ष जयवंतराव शिंपी सो.यांचे शुभ हस्ते रितूचा व पालक (प्रतिथयश इंजिनियर) जितेंद्र शेलार , आमच्या प्रशालेच्या पर्यवेक्षिका व रितूच्या मातोश्री व्ही.जे. शेलार मॅडम यांचेसमवेत तिचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला यावेळी संस्थेचे सचिव एस.पी. कांबळे, संचालक अभिषेक शिंपी, इंजिनीयर जितेंद्र शेलार, प्राचार्य श्री आर जी कुंभार सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते. श्री पी एस गुरव यांनी प्रस्ताविकात रितुच्या एकूण यशस्वी शैक्षणिक वाटचालीचा आढावा घेतला .. व शेवटी तिच्या शैक्षणिक वाटचालीतील सर्व मार्गदर्शक शिक्षकांचे व पालकांचे मनःपूर्वक खूप-खूप अभिनंदन केले.
जयवंतराव शिंपी यांनी की आपल्या मनोगतातून सांगितले की विद्यार्थ्यांनी विद्यार्थीदशेमध्ये शिक्षक ,आई-वडील व देशाप्रती आपले कर्तव्य याचे सतत स्मरण ठेवून प्रामाणिकपणे लक्षपूर्वक ज्ञानार्जन केल्यास यश निश्चित मिळते.
रितुच्या भावी शैक्षणिक वाटचालीस हृदयापासून शुभेच्छा दिल्या.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.