Homeकोंकण - ठाणेधनगरमोळा कला क्रीडा व संस्कृतिक मंडळ आयोजित.- मंगळागौर व सिम्मा फुगडी तालुकास्तरीय...

धनगरमोळा कला क्रीडा व संस्कृतिक मंडळ आयोजित.- मंगळागौर व सिम्मा फुगडी तालुकास्तरीय स्पर्धेचे आयोजन.

धनगरमोळा कला क्रीडा व संस्कृतिक मंडळ आयोजित.- मंगळागौर व सिम्मा फुगडी तालुकास्तरीय स्पर्धेचे आयोजन.

आजरा.- प्रतिनिधी.

धनगरमोळा कला क्रीडा व संस्कृतिक मंडळ ता. आजरा आयोजित
२६ रोजी तालुक्यातील सर्व महीलांसाठी तालुकास्तरीय ‘मंगळागौर व सिम्मा फुगडी’ कार्यक्रमाचे सांघीक स्वरूपात व वैयक्तीक स्वरूपात आयोजन केलेले आहे. सांधीक संघास प्रथम ५००१ द्वितीय ३००१ तृतीय २००१ अशी बक्षीसे व वैयक्तीक स्वरूपास प्रथम ९०१ द्वितीय ७०१ तृतीय ५०१ अशी बक्षीसे ठेवलेली असून
या स्पर्धेत जे वैयक्तीक व सांघीक खरूपात जे संघ भाग घेतील त्या सर्वाना मोफत प्रवेश” प्रक्रिया ठेवलेली आहे. शालेय विदयार्थ्याना सर्वांना विनामुल्य प्रवेश असेल, सहभागी विदयार्थ्याला सहभागी म्हणून भेट वस्तू दिली जाणार आहे.
मंडळाचे चालू वर्षी १ वर्षे पूर्ण होत असल्याने मंडळाने सामाजिक, सांस्कृतिक अंगाने कार्यक्रम ठेवून या ग्रामीण भागात या सर्व घटकांना न्याय देण्याचा प्रामाणिक प्रयत्न केलेला आहे. दुर्गम, डोंगराळ भागातील मागासलेपणा संपवूळ्या प्राप्राशनिक प्रामाणिक प्रयत्न या माध्यमा केलेला आहे. तरी या स्पर्धेचा तालुक्यातील महिला मंडळाने सहभाग घ्यावा असे आवाहन मंडळाचे अध्यक्ष उपाध्यक्ष सचिव व सर्व सदस्यांनी केले आहे.

🔴🔴🔴🔴🔴🔴🔴🔴
आदर्श कला ,क्रीडा व सांस्कृतिक मंडळ धनगरमोळा सालाबादप्रमाणे वर्षी सन 2023 रोजी 31 वा सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करीत आहोत त्या निमित्ताने विविध सांस्कृतिक स्पर्धांचे आयोजन व सामाजिक उपक्रम राबवण्याचे ठरविले आहे.
दिनांक 24/09/2023 रोजी दुपारी 12 ते 5 या वेळेत शालेय व कॉलेजियन विद्यार्थ्यानसाठी तालुका स्तरीय चित्रकला, हस्ताक्षर स्पर्धा आयोजित केली आहे
(लहान गट 1 ते 4 थी. मध्यम गट 5 ते 7 वी.मोठा गट 8वी ते 12वी ) अश्या तीन गटात आयोजित केलेली असून प्रत्येक गटात 1001 ,701,501 अशी प्रत्येक स्पर्धेत स्पर्धकांना बक्षीसे ठेवलेली आहेत.
दिनांक 24 व 25/09/2023 रोजी जिल्हा स्तरीय भजनी
स्पर्धा चे दिवभर आयोजन केलेले असून प्रथम विजयी मंडळास 5001, द्वितीय विजयी मंडळास 3001 ,तृतीय विजयी मंडळास 2001
ह्या प्रमाणे बक्षीसे ठेवलेली असुन उत्कृष्ट गायक,वादक आणि हार्मोनियम वादक यांस प्रत्येकी 501 अशी बक्षीसे ठेवलेली आहेत.
दिनांक 26/09/2023 रोजी तालुक्यांतील सर्व महिलांसाठी तालुका स्तरीय मंगळागौर व झिम्मा फुगडी स्पर्धा सांघिक स्वरूपात व वैयक्तिक स्वरूपात दुपारी 12 ते रात्री 8 दरम्यान आयोजन केलेले आहे . सांघिक प्रथम संघास 5001, द्वितीय संघास 3001 तृतीय संघास 2001 अशी बक्षीसे ठेवलेली आहेत.
वयक्तिक स्वरूपात प्रथम क्रमांक द्वितीय क्रमांक 701 ,तृतीय क्रमांक 501 अशी बक्षीसे ठेवलेली आहेत .
सर्व स्पर्धान मध्ये मोफत प्रवेश राहील
तरी ज्या भजनी मंडळाना, मंगळागौर व झिम्मा फुगडी महिला संघांना ,महिलांना व शालेय विद्यार्थ्यांना सहभाग घ्यायचा असेल त्यांनी मंडळाचे
अध्यक्ष- प्रकाश मोरूस्कर 9130358020 ,उपाध्यक्ष- नामदेव जाधव 7795723165 कोषाध्यक्ष – संतोष शेटगे 7875261139, सचिव- तुषार खरुडे 8308520397 वरील भ्रमणध्वनीवर संपर्क करावा. असे आवाहन करण्यात आले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.