गवारेड्याने मोटरसायकलला धडक देऊन गंभीर जखमी झालेल्या वृद्धाचा मृत्यू.
आजरा.- प्रतिनिधी.
आजरा येथील बुधवारी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास गडहिंग्लज- आजरा मार्गावर हॉटेल बिग बॉसच्या समोर मुंगूसवाडी कडून हाजगोळीच्या दिशेने जाणाऱ्या गवारेड्याने आजऱ्याच्या दिशेने जाणाऱ्या मोटरसायकलला जोराची धडक दिली. या धडकेमध्ये मोटरसायकल वरील उस्मान कानडीकर (वय वर्षे ६५) हे गंभीर जखमी झाले होते दरम्यान आज त्यांचा उपचारादरम्यान खाजगी रुग्णालयातील मृत्यू झाला. तर रहमान लमतुरे (वय वर्ष ४५ दोघेही रा. आजरा) गंभीर जखमी झालेले आहेत. दोघांनाही उपचारासाठी गडहिंग्लज येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. आहे. यापैकी कानडीकर यांचे निधन झाले.
