खुल्या प्रवर्गातील नागरीकांना स्वतंत्र घरकुल योजना करण्यासाठी शासन स्तरावर पाठपुरावा करणार : आमदार प्रकाश आबिटकर – केंद्र शासनाच्या डिजिटल इंडिया या योजनेअंतर्गत राधानगरी विधानसभा मतदारसंघांमध्ये बीएसएनएल कंपनीचे 16 मोबाईल टॉवर मंजूर – आमदार प्रकाश आबिटकर ( खासदार संजयदादा मंडलिक यांच्या प्रयत्नांना यश.)
गारगोटी प्रतिनिधी,
खुल्या प्रवर्गातील नागरीकांना शासनाची कोणतीही घरकुल योजना नसल्यामुळे खुल्या प्रवार्गातील गरीब कुटुंबांना घरे बांधणेसाठी अडचणी येत आहेत यामुळे खुल्या प्रवर्गातील नागरीकांना स्वतंत्र घरकुल योजना करण्यासाठी शासन स्तरावर पाठपुरावा करणार असल्याचे आमदार प्रकाश आबिटकर यांनी सांगितले. ते पंचायत समिती, भुदरगड मार्फत शासकीय योजनांच्या संदर्भात आयोजित आढावा बैठकीमध्ये बोलत होते. यावेळी बोलताना आमदार आबिटकर म्हणाले की, राज्य व केंद्र शासनाच्या सर्व घरकुल योजनांच्या माध्यमातून ज्या बांधवांना अद्याप घरकुल मिळालेले नाहीत अशा सर्व पात्र लाभार्थ्यांना घरे मिळणेसाठी प्रस्ताव तयार करावेत. रामाई आवास योजनेमध्ेर पुर्वी घरदुरूस्तीचा लाभ घेतलेल्या लाभार्थ्यांना वंचित ठेवण्यात येत होते. ही बाब मा.मुख्यमंत्री महोदय व सचिव, सामाजिक न्याय यांचे निदर्शनास आनून दिल्यानंतर अशा प्रकारची कोणतीही अट आकारण्याचे अधिकार जिल्हा परिषदेला नाहीत त्यामुळे अशी कोणतीही अट घालता येणार नाही. यासर्व योजनांच्या माध्यमातून तालुक्यामध्ये 5000 घरे आपल्या सर्वांच्या सहकार्यातून देण्याचा मानस आहे त्यामुळे या घरकुल मोहिमेमध्ये सर्वांनी सहभागी व्हावे असे आवाहन केले. तसेच महसूल विभागाकडून घरकुल बांधण्यासाठी 2 ब्रास वाळू मोफत देण्याचा निर्णय राज्यशासनाने घेतला असून याबाबतची कार्यवाही तहसीलदार व गटविकास अधिकारी यांनी संयुक्तपणे करावे असे सुचना केल्या. शेतातील दैनंदिन कामकाज करत असताना शेतकऱ्याला पाणंनद रस्यांसेचा उपयोग करावा लागतो परंतू सदरील रस्ते हे नादरुस्त असल्यामुळे शेतकऱ्यांना अडचणी निर्माण होत असून पालकमंत्री व मातोश्री पाणंद रस्ते योजनेच्या माध्यमातून पाणंदी अधिक चांगल्या करण्यासाठी सामुदायीक प्रयत्न करणे गरजेचे असून 2 ऑक्टोंबर महात्मा गांधी जयंतीच्या दिवशी या पाणंदीच्या कामांना प्रत्यक्ष सुरवात करण्याच्या सुचना केल्या. तसेच अपंग बांधवांना UDID कार्ड व इतर शासकीय योजनांचा लाभ देण्याबाबत कार्यवाही करण्याच्या सुचना केल्या. यासह अन्न सुरक्षेचे लाभार्थी निवड करावी जेणेकरून कोणतेही लाभार्थी वंचित राहणार नाही याची दक्षता घ्यावी असे आवाहन केले. पंचायत समिती रोजगार हमी शाखेमध्ये कामकाज भोंगळ पध्दतीने सुरू असल्याच्या तक्रारी सरपंच महोदयांनी केल्या. तसेच वैयक्तिक लाभाचे प्रामुख्याने गोठा प्रकरणे प्रस्ताव दाखल करण्यात आले होते ते वर्षानुवर्षे प्रलंबित आहेत ही बाब गंभीर असून याकरीता सदरची यंत्रणा सक्षम करण्याकरीता आवश्यकतेनुसार मनुष्यबळ उपलब्ध् करून घ्यावे तसेच प्रस्ताव प्रलंबित आहेत ते तपासणी करून मार्गी लावावे अशा सुचना केल्या. जलजीवन मिशन कामाबाबत सरपंच महोदय यांनी तक्रारी प्राप्त झाल्या त्या अनुषंगाने गंभीर स्वरुपाच्या तक्रारी प्राप्त झाल्या असून याबाबत पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता व संबंधीत सर्वेक्षण करणारी कंपनी, ठेकेदार व ग्रामपंचायत पदाधिकारी यांची संयुक्तपणे बैठक आयोजित करणार असल्याचे सांगितले. तसेच ज्यागावामध्ये पुर्व परवानगी न घेता गावांतर्गत रस्ते खुदाई केली आहे त्यांच्यावर कारवाई करण्याच्या सुचना गटविकास अधिकारी यांना केल्या.
PM किसान व CM किसा योजनेचे काम अतिशय चांगल्या प्रकारे सुरू आहे त्यामुळे ज्या शेतकऱ्यांच्या अडचणी आहेत त्यांनी तहसील कार्यालयाकडे संपर्क करावा असे आवाहन केले.
गोपीनाथ मुंडे अपघात योजना, राष्ट्रीय कुटुंब लाभ योजना, अन्न सुरक्षा व अंत्योदय योजनांचे लाभार्थी निवड करून ग्रामपंचायतींनी ठराव तहसीलदार यांचेकडे पाठवावेत. गावठाण विस्तार वाढीबाबत वाढीव प्लॉट पुर्वी देण्यात आले आहेत ते 7/12 पत्रकी नोंद नाहीत ते प्रस्ताव मार्गी लावून 7/12 पत्रकी नावे लावून देण्यात येईल असे तसहीलदार यांनी सांगितले.
यावेळी तहसीलदार अश्विनी आडसूळ, गटविकास अधिकारी शेखर जाधव, जिल्हा दिव्यांग कल्याण केंद्रचे जिल्हा समन्वयक अमेय जोशी, म्हसवे सरपंच सर्जेराव देसाई, उपअभियंता धनाजी कुंभार, गारगोटीचे माजी उपसरपंच अरुण शिंदे यांच्यासह तालुक्यातील सरपंच, ग्रामसेवक उपस्थित होते.
केंद्र शासनाच्या डिजिटल इंडिया या योजनेअंतर्गत राधानगरी विधानसभा मतदारसंघांमध्ये बीएसएनएल कंपनीचे 16 मोबाईल टॉवर मंजूर – आमदार प्रकाश आबिटकर ( खासदार संजयदादा मंडलिक यांच्या प्रयत्नांना यश.)

गावोगावी इंटरनेटच्या सुविधा पोहोचविण्यासाठी डिजिटल इंडिया या योजनेअंतर्गत ग्राउंड बेस्ड होस्टिंग ऑफ इक्विपमेंट या प्रयोजनासाठी भारत संचार निगम लिमिटेड (बी.एस.एन.एल) कंपनीचे 16 मोबाईल टॉवर खासदार संजय मंडलिक यांच्या अथक प्रयत्नातून मंजूर झाले असल्याची माहिती आमदार प्रकाश आबिटकर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली. प्रसिध्दीपत्रकात म्हटले आहे की, पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या दूरदृष्टीतून इंटरनेट सुविधांपासून वंचित राहिलेल्या गावांमध्ये 4G सेवा उपलब्ध करून देण्यासाठी केंद्र शासनामार्फत डिजिटल इंडिया ही महत्त्वकांशी योजना राबविण्याची धोरण तयार करण्यात आले आहे. या योजनेअंतर्गत राधानगरी विधानसभा मतदारसंघातील दुर्गम व डोंगराळ भागातील ज्या गावांमध्ये अद्यापही इंटरनेट सेवा पोहोचली नाही अशा ठिकाणी भारत संचार निगम लिमिटेड कंपनीचे मोबाईल टावर प्रस्तावित करावे अशी मागणी आमदार प्रकाश आबिटकर यांनी खासदार संजय मंडलिक यांच्याकडे केली होती. त्या अनुषंगाने 2 ते 3 वेळा बीएसएनएलचे वरिष्ठ अधिकारी यांच्या समवेत बैठका घेण्यात आल्या होत्या. या मोबाईल टॉवर करिता राज्य शासनामार्फत मोफत 200 चौरस मीटर जागा उपलब्ध करून देण्यात आली आहे. याअंतर्गत राधानगरी तालुक्यातील अडोली, चाफोडी तर्फ ऐनघोल, दाजीपूर गावठाणवाडी, कंदलगाव, सावर्दे (वकिघोल), दुबळीवाडी आदी गावांचा समावेश आहे. भुदरगड तालुक्यातील चिक्केवाडी, चिवाळे, मानी, मानोपे, रावणवाडी, शिवडाव तांब्याचीवाडी, तिरवडे-कुडतरवाडी आदी गावांचा समावेश आहे. आजारा तालुक्यातील साळगाव येथे मोबाईल टावर मंजूर झाले असून डिसेंबर 2023 पर्यंत सर्व टॉवर कामांची सुरवात करण्याचे नियोजन कंपनीने केले आहे. यामुळे गेली कित्येक वर्षे मोबाईल व इंटरनेट सुविधांपासून वंचित असलेल्या भागांमध्ये 4G सेवा उपलब्ध होणार आहे.
