HomeUncategorizedगर्जना संघटना" आयोजित सत्याग्रह आंदोलनाला प्रतिसाद.- गटविकास अधिकारी यांच्या दालनात चाललेल्या जनता...

गर्जना संघटना” आयोजित सत्याग्रह आंदोलनाला प्रतिसाद.- गटविकास अधिकारी यांच्या दालनात चाललेल्या जनता दरबारात सार्वजनिक हिताचे अनेक महत्व पूर्ण निर्णय…

गर्जना संघटना” आयोजित सत्याग्रह आंदोलनाला प्रतिसाद.- गटविकास अधिकारी यांच्या दालनात चाललेल्या जनता दरबारात सार्वजनिक हिताचे अनेक महत्व पूर्ण निर्णय…

आजरा.- प्रतिनिधी.

आजरा येथील गर्जना संघटना आयोजित सत्याग्रह आंदोलन दि.२० सप्टेंबर २०२३ रोजी गर्जना प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रकाश बेलवाडे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले. पंचायत समिती कडील तालुक्यातील नागरिकांचे प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी सदरचे आंदोलन होते. जोपर्यंत नागरिकांच्या प्रश्नांचे समाधानकारक निरसन होत नाही. तोपर्यंत पंचायत समिती मधून हलणार नाही. असं इशारा पंचायत समिती गटविकास अधिकारी यांना देण्यात आला. त्यासाठी आंदोलनकर्त्यांनी घरातून बिछानाच्या सोयीसह हजेरी लावली. पंचायत समिती स्तरावरील , ग्रामपंचायत स्तरावरील तसेच ग्रामसेवक स्तरावरील अनेक महिन्यांपासून प्रलंबित असणाऱ्या प्रश्नांवरील सुनावणी पोलीस बंदोबस्तात सलग १० तास चालू राहिली.
या मध्ये जवळपास १५ ते २० गावातील नागरिक,सरपंच, महिला बचत गट व शेतकरी उपस्थित होते. गटविकास अधिकारी यांच्या दालनात चाललेल्या जनता दरबारात सार्वजनिक हिताचे अनेक महत्व पूर्ण निर्णय घेतले यामध्ये.

१) या पुढे प्रत्येक ग्रामपंचायत कार्यालयाचा प्रवेशव्दारा वर ग्रामसेवक यांची कार्यालयीन वेळ प्रसिद्ध केली जाणार. २) डाटा ऑपरेटर यांच्या मार्फत दिले जाणारे कोणत्या प्रकारचे दाखले, त्या समोर शासकीय शुक्ल हे देखील कार्याला बाहेर प्रसिध्द करण्यात येईल.

त्याच बरोबर प्रत्येक गावातून आलेल्या सामान्य नागरिक,शेतकरी, सरपंच महिला बचत गट यांच्या अनेक वैयक्तिक प्रलंबित प्रश्नांचा निपटारा करण्यात आला. तसेच काही गावातील नागरिकांचे प्रश्न सोडवीण्यासाठी अवश्यक ठिकाणी अधिकाऱ्यांच्या समवेत दफ्तर तपासणी, स्थळ पाहाणी यासाठी पंचायत समिती कडून गाव नुसार तारीख देण्यात आली आहे. त्यासंदर्भातील लेखी आश्वासन गटविकास अधिकारी यांचा कडून देण्यात आले. सदरचे आंदोलन शासकीय कार्यालयिन वेळ संपल्या नंतर देखील चालू राहिले रात्री ८ वा. गटविकास अधिकारी यांच्या कडून लेखी आश्वासन मिळाल्या नंतर सदरचे आंदोलन थांबवले.
यापुढे तालुक्यातील लोकांच्या समस्या तात्काळ सोडविण्यात याव्यात त्या साठी अशा प्रकारचे आंदोलन पुन्हा घ्यावे लागू नये अन्यथा प्रशासनाला अडचणी होतील असे प्रकाश बेलवाडे यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना ठणकावून सांगितले.
यावेळी संतोष बेलवाडे, गणेश शिवणे, रवींद्र तेंबुगडे, संभाजी सरदेसाई, शंकर कदम, विक्रम गोईलकर रवींद्र लोखंडे, महेश कांबळे, महादेव खाडे, विठ्ठल कदम, दिगंबर कदम, दिगंबर मिसाळ, महादेव रामाने, सचिन पावले, जोतिबा नांदवडेकर, विनायक चिटणीस, विराज बिल्ले, सुनील खराडे, बाबुराव कांबळे, अर्दाळ च्या सरपंच व ग्रामपंचायत सदस्य, सतीश कदम, बाळू मिसाळ, तानाजी शिवणे, महिला बचत गटाच्या सदस्या यांचे सह शेकडो नागरिकांनी आंदोलनात भाग घेतला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.