संवेदना फाऊंडेशन आजरा आयोजित.- रक्तदान शिबिराला उदंड प्रतिसाद.( या शिबिरामध्ये १३७ रक्तदात्यांचे रक्तदान तर मडिलगेतील ४२ रक्तदात्यांनी केले रक्तदान.)
आजरा.- प्रतिनिधी.
संवेदना फाऊंडेशन आजरा मार्फत आयोजित केलेल्या रक्तदान शिबिराला उदंड असा प्रतिसाद लाभला. या शिबिराचे उद्घाटन फौजी सचिन पाटील यांच्या हस्ते करण्यात आले आजरा पंचक्रोशीतील आरोग्य सेवेत महत्वाचे योगदान दिल्याबद्दल संवेदना फाऊंडेशन आणि आजरा तालुक्यातील सर्व रक्तदात्यांचे संवेदना फाऊंडेशन आजरा तर्फे अध्यक्ष आण्णाप्पा पाटील यांच्याकडून अभिनंदन करण्यात आले. या शिबिरात रक्तदान तब्बल १३७ रक्तदात्यांनी रक्तदान केले संवेदना फाउंडेशन मार्फत राबविल्या गेलेल्या रक्तसेवे साठी एक पोचपावतीच आहे. रक्तदात्यांनी व संवेदना फाउंडेशन सदस्य यांनी दाखविलेल्या विश्वासाचा मान ठेवून पुढील एक वर्षात देखील आपण गरजू रुग्णांना फाउंडेशनच्या माध्यमातून मोफत रुग्ण सेवा देण्यासाठी कटिबद्ध आहोत.
आपल्या परिसरातील कोणत्याही गरजू रुग्णाला जर रक्ताच्या पिशवीची ( ब्लड युनिट ) आवश्यकता असेल तर निःसंकोचपणे आपल्या फाउंडेशनच तालुक्यातील प्रत्येक गावातील संवेदना फाउंडेशन सदस्य किंवा अध्यक्ष श्री पाटील यांना संपर्क करावा नक्कीच अगदी सुलभ पद्धतीने सदर रुग्णाला आवश्यक असतील तेवढ्या रक्त पिशव्या उपलब्ध करून देऊ .
भविष्यात देखील असाच उदंड प्रतिसाद आपल्या सर्वांच्या सहकार्याने कायम लाभेल अशा भावना संवेदना फाउंडेशन कडून व्यक्त करण्यात आल्या. यावेळी संवेदना फाउंडेशन चे सर्व सदस्य रक्त जाते मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी मडिलगे येथील ४२ रक्तदातादी सर्वात अधिक रक्तदान केले. उद्घाटक फौजी सचिन पाटील यांनी यांनी मनोगत व्यक्त केले डॉ. निंबाळकर यांनी आभार मानले.
