श्री. गणपती घेऊन येताना पाय घसरून गणेश मूर्ती सांभाळताना पडल्याने जागीच मृत्यू
( बोलकेवाडीतील सुतार कुटुंबावर गणपतीच्या आगमनातच शोककळा)
आजरा.- प्रतिनिधी.
बोलकेवाडी ता. आजरा येथील सचिन शिवाजी सुतार वय ३८ यांचा गणपती घेऊन येत असताना दारात शेवाळा वरून पाय घसरून श्री गणेश मूर्ती सांभाळताना गणपती पडेल म्हणून तोल आवरत पडल्याने जागीच मृत्यू झाला आहे.
गणपती निमित्त नुकताच मुंबईवरून आलेले सचिन हे गणपती घेऊन येताना दारात शेवळावरून येत असताना त्यांचा पाय घसरला व डोक्याला गंभीर दुखापत झाली यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला बोलकेवाडी सुतार कुटुंबावर गणपतीच्या आगमना दिवशी दुःखाचा डोंगर समोर आला आहे त्यांच्या पश्चात आई-, पत्नी व एक मुलगा असा परिवारआहे.
