HomeUncategorizedशेतकरी आत्महत्या मुक्तीचा शिंदेंचा संकल्प इतर योजनेप्रमाणे कागदावरच :- मराठवाड्यात 8 महिन्यांत...

शेतकरी आत्महत्या मुक्तीचा शिंदेंचा संकल्प इतर योजनेप्रमाणे कागदावरच :- मराठवाड्यात 8 महिन्यांत 685 शेतकरी आत्महत्या.

शेतकरी आत्महत्या मुक्तीचा शिंदेंचा संकल्प इतर योजनेप्रमाणे कागदावरच :- मराठवाड्यात 8 महिन्यांत 685 शेतकरी आत्महत्या.

मुंबई.- प्रतिनिधी.

राज्य शेतकरी आत्महत्यामुक्त करण्यास निघालेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यकाळातच मराठवाड्यात आठ महिन्यांत ६८५ शेतकऱ्यांनी जीवनयात्रा संपवली आहे. शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर शेतकरी आत्महत्या मुक्तीचा संकल्प जाहीर केला होता.

आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या कुटुंबाला मदत निधी दिला जातो. त्यासाठी ४७५ शेतकरी कुटुंबे पात्र ठरली आहेत, तर ९७ कुटुंबे अपात्र ठरली आहेत. ११३ प्रकरणांची चौकशी सुरू असल्याचे विभागीय आयुक्त कार्यालयाकडून सांगण्यात आले आहे.

आत्महत्याग्रस्तांची जिल्हानिहाय आकडेवारी.-
बीड १८६, धाराशिव ११३, नांदेड ११०
छ. संभाजीनगर ९५, परभणी ५८
लातूर ५१, जालना ५०, हिंगोली २२

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.