देवर्डे शाळेत आजी आजोबा दिवस साजरा. –
रवळनाथ पतसंस्थेला १७ लाखांवर नफा : अध्यक्षा सौ. फडके
( ३९ वी वार्षिक सभा खेळीमेळीत.)
आजरा.- प्रतिनिधी.

देवर्डे येथील विद्या मंदिर व श्री रवळनाथ हायस्कूल देवर्डेत आजी आजोबा दिवस उत्साहात साजरा करण्यात आला ढोल ताशांच्या गजरात आजी आजोबांना शाळेत आणले सरो जिनी कुंभार रेश्मा बोलके देवेंद्र शिखरे या शिक्षकांनी आजी आजोबांचे फुल देऊन स्वागत केले यानंतर विद्यार्थ्यांनी आपल्या आजी-आजोबांचे पाद्यपूजन केले त्यानंतर आजी आजोबांनी आपले अनुभव कथन केले यामध्ये संभाजी कांबळे यांनी वाढदिवसाचे गीत सादर केले दौलती तानवडे यांनी अभंगाच्या माध्यमातून माहिती सांगितली व या उपक्रमाचे कौतुक केले तसेच माजी सैनिक अनंत सुतार यांनी सैन्य दलातील माहिती सांगितली तसेच आजी आजोबांनी गप्पा मारल्या व या उपक्रमाचे कौतुक केले सरोजिनी कुंभार देवेंद्र शिखरे या शिक्षकांनी मार्गदर्शन केले याप्रसंगी मुख्याध्यापक नामदेव माईन कर सुभाष सावंत महादेव तेजम सुनील पाटील चंद्रकांत घुरे राजेंद्र पाटील महेश नावलगी या शिक्षकासह विद्यार्थी आजी आजोबा शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. सूत्रसंचालन श्रीकांत पाटील यांनी केले.
रवळनाथ पतसंस्थेला १७ लाखांवर नफा : अध्यक्षा सौ. फडके
( ३९ वी वार्षिक सभा खेळीमेळीत.)

आजरा येथील श्री रवळनाथ गामीण बिगर शेती सह. पतसंस्थेची ३९ वी वार्षिक सभा खेळीमेळीत पार पडली. प्रमुख उपस्थितीत संस्थेचे संस्थापक जयवंतराव शिंपी होते. तर अध्यक्षस्थानी संस्थेच्या अध्यक्षा सौ. सुरेखा फडके होत्या. यावेळी अध्यक्षस्थानावरून बोलताना सी. फडके यांनी संस्थेकडे ११ कोटींवर ठेवी असून चालू आर्थिक वर्षात संस्थेला १७ लाखांवर नफा झाल्याचे स्पष्ट केले.
जि. प. सदस्य जयवंतराव शिंपी, अध्यक्षा सौ. सुरेखा फडके, उपाध्यक्ष किरण कांबळे यासह मान्यवरांच्या हस्ते दिपप्रज्वलन करून कार्यकमाला सुरुवात झाली. प्रारंभी स्वागत संस्थेचे मैनेंजर विश्वास हरेर यांनी स्वागत केले. श्रध्दांजलीचा ठराव संचालक सुधीर नार्वेकर यांनी मांडला. अध्यक्षस्थानावरून बोलताना अध्यक्षा सौ. फडके यांनी संस्थेकडे अहवाल सालात ११ कोटी ४६ लाखांवर ठेवी असून आर्थिक वर्षात १ कोटी रूपयांची वाढ झाली आहे. ९ कोटी ३३ लाखांवर कर्जे वाटप केली असून संस्थेला चालू आर्थिक वर्षात १७ लाख ४३ हजारांचा नफा झाला असून गतवर्षीपेक्षा नफा २ लाख ३४ हजार रूपयांनी वाढला आहे. आजच्या इंटरनेटच्या जगात बँकींग क्षेत्रात नवनवीन बदल होत आहेत. या सगळया बदलत्या आव्हानांशी संघर्ष करत आपली पतसंस्था आपल्या सर्वांचे सहकार्य आणि पाटीव्यावरच उत्तरोत्तर प्रगती करीत असल्याचे स्पष्ट केले.
त्यानंतर एमपीएससी कृषीसेवा परीक्षेतून कृषी उपसंचालकपदी निवड झालेबद्दल मिलींद चंद्रमणी, संख्याशास्त्र विषयावर पीएचएडी मिळविल्याबद्दल राजश्री मलामवाडे, शिष्यवृत्ती परीक्षेतील यशाबद्दल रोहीत गिलबिले, दहावी, बारावीतील गुणवंत विदयार्थी शुभम जाधव, रोहीत जाधव या सभासदांच्या पाल्यांचा रोख रक्कम, सन्मानचिन्ह व पुण्प देवून मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. त्यानंतर सभेपुढील विषय व अहवाल वाचन संस्थेचे मॅनेंजर विश्वास हरेर यांनी केले. यावेळी सभासदांनी विचारलेल्या प्रश्नांना संचालक मंडळाकडून समर्पक उत्तरे देण्यात आली. सभासद गोविंद गुरव यांनी संस्थेच्या प्रगतीमध्ये कर्मचारी वर्गाचे असलेल्या सहकार्याबद्दल अभिनंदनाचा ठराव मांडला.
यावेळी संस्थेचे संस्थापक जयवंतराव शिंपी यांनी मार्गदर्शनपर मनोगत व्यक्त केले. संचालक अभिषेक शिंपी यांनीही मनोगत व्यक्त केले. सभेला सर्व संचालक, आजरा महाल शिक्षण मंडळाचे उपाध्यक्ष आण्णा पाटील, एम. पी. कांवळे, सुनील देसाई, के. जी. पटेकर, अभिजीत हुक्केरी. विकम पटेकर, विलास पाटील, विश्वास जाधव, मारुतीराव देशमुख यासह सभासद उ पस्थित होते.
