Homeकोंकण - ठाणेगोवा बनावटीची दारू वाहतूक केल्याप्रकरणी राज्य उत्पादन शुल्काच्या पथकाची कारवाई आंध्रप्रदेशातील दोघांना...

गोवा बनावटीची दारू वाहतूक केल्याप्रकरणी राज्य उत्पादन शुल्काच्या पथकाची कारवाई आंध्रप्रदेशातील दोघांना मुद्देमालासह ताब्यात…- ( १० लाखाच्या गाडी व ३ लाखाची दारुसह १३ लाखांचा मुद्देमाल जप्त.)

गोवा बनावटीची दारू वाहतूक केल्याप्रकरणी राज्य उत्पादन शुल्काच्या पथकाची कारवाई आंध्रप्रदेशातील दोघांना मुद्देमालासह ताब्यात…-
( १० लाखाच्या गाडी व ३ लाखाची दारुसह १३ लाखांचा मुद्देमाल जप्त.)

सिंधुदुर्ग/ बांदा:- प्रतिनिधी.

गोवा बनावटीची दारू वाहतूक केल्याप्रकरणी इन्सुली येथील राज्य उत्पादन शुल्काच्या विभागाने आंध्रप्रदेशातील दोघांना अटक केली आहे. त्यांच्याकडून १० लाखाच्या गाडीसह ३ लाखाची दारू असा मिळून १३ लाखाचा मुद्देमाल जप्त केला आहे. कालापला राजेश (वय ४०), अप्पाना ससी किरण (वय २६) दोघे रा.आंध्रप्रदेश अशी त्यांची नावे आहेत.ही कारवाई आज सकाळी इन्सुली तपासणी नाक्यावर करण्यात आली.

शुक्रवार दि.15 सप्टेंबर रोजी मा.श्री.विजय सूर्यवंशी आयुक्त,राज्य उत्पादन शुल्क, महाराष्ट्र राज्य,मा.श्री सुनील चव्हाण संचालक (अं.व.द.)राज्य उत्पादन शुल्क महाराष्ट्र राज्य मुंबई,मा.श्री.विजय चिंचाळकर, विभागीय उपआयुक्त,राज्य उत्पादन शुल्क कोल्हापूर विभाग कोल्हापूर, मा.श्री.वैभव वैद्य प्र.अधीक्षक,राज्य उत्पादन शुल्क सिंधुदुर्ग यांच्या मार्गदर्शनाखाली मिळालेल्या गुप्त बातमी नुसार राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 66 वर,निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क तपासणी नाका इन्सुली कार्यालयाजवळ तालुका सावंतवाडी जिल्हा सिंधुदुर्ग येथे संशयित वाहनांची तपासणी करीत असताना बांदयावरून इन्सुलीच्या दिशेने येणारे सिल्वर रंगाचे शिवोरलेट कॅप्टीवा एक्सट्रीम चारचाकी वाहन क्रमांक AP – 21 AE – 0111सदर वाहनाची तपासणी केली असता सदर वाहनामध्ये गोवा बनावटीची अवैध विदेशी दारू बुजावरती क्लाॅलीटी लिकर्स नमूद असलेल्या 600 सिलबंद प्लॅस्टिकच्या बाटल्या इतका अवैध दारूसाठा मिळुन आला.सदर प्रकरणी दोन्ही आरोपीत कालापला राजेश वय 40 वर्षे राहणार मुलगा – कालापला जनार्दन राव,ए 54 – 6 – 3, प्लॉट नंबर-123, एफ – 2, 2nd क्राॅस 4 th रोड कोम्मीनेनी ऑटो मोबाईल ऑटोनगर विजयवाडा जिल्हा क्रिश्ना आंध्रप्रदेश -520007 व अप्पाना ससी किरण वय 26 वर्षे राहणार मुलगा – पुलैय्या बाबू 10 – 115/2 , चाफावारी स्ट्रिट कांचीका चेर्ला जिल्हा क्रिश्ना आंध्रप्रदेश – 521130 या दोघांना मुद्देमालासह ताब्यात घेण्यात आले आहे.सदर गुन्ह्यांमध्ये 3 लाख रूपये किमतींचे गोवा बनावटीची अवैध दारूसह तसेच 10 लाख किंमतीचे चारचाकी वाहन असा एकूण 13 लाख किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असुन,महाराष्ट्र दारूबंदी कायदा 1949 अंतर्गत विविध कलमानुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

सदर कारवाई मा.श्री.वैभव वैद्य अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क सिंधुदुर्ग यांच्या प्रत्यक्ष मार्गदर्शनाखाली श्री.संजय मोहिते निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क तपासणी नाका इन्सुली, श्री.तानाजी पाटील दुय्यम निरीक्षक, श्री.प्रदीप रास्कर दुय्यम निरीक्षक,श्री.गोपाळ राणे सहाय्यक दुय्यम निरीक्षक,श्री. प्रसाद माळी जवान,व श्री.रणजित शिंदे जवान नि.वाहक चालक यांनी केली.सदर प्रकरणी पुढील तपास दुय्यम निरीक्षक तपासणी नाका इन्सुली प्रदीप रास्कर हे करीत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.