विद्यार्थ्यांना आधुनिक काळात टिकण्यासाठी स्पर्धा परिक्षेची गरज – डॉ. अमोल पाटील
कडगाव – एकाग्रता, कष्ट व निष्ठा या तीन गुंणाच् या बळावर तुम्ही कोणत्याही क्षेत्रातील हिमालय सर करू शकाल, असे प्रतिपादन अभिनव ॲकॅडमीचे संचालक डॉ. अमोल पाटील यांनी केले. श्री आनंदराव आबिटकर कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, कडगाव येथे आयोजित CET, JEE, NEET स्पर्धा परिक्षा मार्गदर्शन कार्यशाळेत बोलत होते. अध्यक्षस्थानी जि.प. सदस्या मा. सौ. रोहिणीताई अर्जुन अबिटकर या होत्या.
आपण शिक्षणाने स्वावलंबी बनू शकतो आणि स्वावलंबी होण्यासाठी स्पर्धा परीक्षा हाच एकमेव पर्याय आहे. आपल्या मनाची एकाग्रता स्थिर करून स्पर्धा परीक्षा देवून यशस्वी होण्याचे ध्येय मनात बाळगावे असे प्रतिपादन जि. प. सदस्या रोहिणीताई आबिटकर यांनी केले.
या कार्यक्रमास मुख्याध्यापक श्री. आर. व्हाय. देसाई सर, मुख्याध्यापक श्री. एस. आर. पाटील, सौ. चुडेकर मॅडम, कॉलेजचे प्राचार्य श्री गुरुप्रसाद शेणवी , सर्व प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी तसेच कडगाव हायस्कूल कडगाव, कुमार भवन कडगाव, रांगणा पब्लिक स्कूल कडगाव, आबिटकर महाविद्यालय या सर्व शाळांचे विद्यार्थी व पालक मोठया संख्येने उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रा विठ्ठल भूतल, प्रा वैष्णव देसाई व प्रा किरण खवरे यांनी केले. प्रास्ताविक प्राध्यापिका मृदूला काटकर यांनी केले. आभार प्राध्यापिका वर्षांराणी साळोखे यांनी मानले.
