HomeUncategorizedमहाराष्ट्रातून/देशातून - भाजप हद्दपार झाले पाहिजेत.- शरद कोळी. (🛑 शिंदेंचे ४० बोकड...

महाराष्ट्रातून/देशातून – भाजप हद्दपार झाले पाहिजेत.- शरद कोळी. (🛑 शिंदेंचे ४० बोकड व १३ वळू मिळून वाघाची शिकार करू शकत नाहीत.) ( 🛑महाराष्ट्रात / देशात पुन्हा भाजप सत्तेत आल्यास लोकशाही संपून हुकुमशाही उदयास येईल.)

महाराष्ट्रातून/ देशातून भाजप हद्दपार झाले पाहिजेत.- शरद कोळी. (🛑 शिंदेंचे ४० बोकड व १३ वळू मिळून वाघाची शिकार करू शकत नाहीत.) ( 🛑महाराष्ट्रात / देशात पुन्हा भाजप सत्तेत आल्यास लोकशाही संपून हुकुमशाही उदयास येईल.)

आजरा.- प्रतिनिधी.

भाजपकडून शेण खाऊन शिंदे गटाने निष्ठा घालवली आहे. मातोश्रीच्या पाठीत खंजीत खुपसून ५० खोक्यासाठी शिंदे गट लाज विसरला
महाराष्ट्रात देवेंद्र फडणीस यांनी शिंदे गट व अजित पवारांना हाताशी धरून महाराष्ट्राच्या राजकारणाचे व लोकशाहीचे वाटोळे लावले असे वक्तव्य युवा सेनेचे शरद कोळी यांनी आजरा येथे “होऊ द्या चर्चा” या विषयावर असलेली निष्ठायात्रा या निष्ठा यात्रेच्या सभेला संबोधित करताना बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी आमदार संजयबाबा घाटगे होते. स्वागत व प्रास्ताविक उपजिल्हाप्रमुख प्रकाश पाटील यांनी केले
श्री. कोळी पुढे म्हणाले सद्याचे सरकार कायद्याची पायमल्ली करत आहे. सामान्य नागरिकासह पत्रकार यांच्यावर देखील हल्ले होत आहेत. कायदा गुंडाळून ठेवल्यामुळे कायद्याची भीती राहिली नाही महाराष्ट्रात शिंदे फडणवीस पवार सरकार काळात महाराष्ट्राचा एकही माणूस सुखी नाही. सर्व उद्योग जर तुम्ही गुजरातला नेऊन ठेवला आहात तर येणारी निवडणूक तुम्ही गुजरात मध्ये जाऊन लढवावी असा उपरात्मक सल्ला देत महाराष्ट्रात एका माणसाला देखील रोजगार नोकरी देऊ शकला नाही. शेतकऱ्याच्या उत्पन्नाला हमीभावाला नाही. लाईट आहे. तर पाणी नाही. पाणी आहे तर लाईट नाही. विजेचे दर देशात महाराष्ट्रात सर्वात अधिक आहेत. डिझेल पेट्रोल गॅस सह जीवनावश्यक वस्तूंचे दर गगनाला पोहोचले याची चौकशी नाही. याकडे पंतप्रधानांचे लक्ष नाही. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या जीवावर पंतप्रधान झालेले नरेंद्र मोदी हे विसरले आहेत.
नारायण राणे यांच्यावर बोलताना म्हणाले राणे यांना शिवसेनेवर भुंकण्यासाठी ठेवले आहे. त्यांनी व दोन मुलांनी भुंकले तरच पोटाला मिळते म्हणजे आजही तुम्ही मातोश्रीच्या जीवावर जगत आहात. हे विसरू नये आपल्या लायकीप्रमाणे राहावे कोंबडी चोराला मुख्यमंत्री केलं पण तुम्हाला उद्धव ठाकरे यांच्यावर बोलून पोट भरत असेल तर तुमच्या पोटावर मारणार नाही. जरूर बोला पण भान ठेवा व मर्यादित रहावे शिंदेंचे ४० बोकड व १३ वळू मिळून वाघाची शिकार करू शकत नाहीत. ज्या शिवसेनेने वाढवले तीच शिवसेना तुम्हाला गाडल्याशिवाय राहणार नाही. विनाकारण शिवसेनेवर टीका करणाऱ्यांना यांनी आमच्या सहनशीलतेचा अंत पाहू नये अति केल्यास तुडवल्याशिवाय सोडणार नाही महाराष्ट्रातील जनतेने ही लढाई फक्त पक्षप्रमुख ठाकरे यांची नाही संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेची लढाई आहे कायद्याचा गैरवापर करून दळभद्री भाजप सत्तेचा गैरवापर करत आहे भविष्यकाळात आपले घर देखील ताब्यात घेतील यामुळे वेळेत सावध होऊन 2024 ला त्यांची जागा त्यांना दाखवली पाहिजेत महाराष्ट्रातील गोरगरीब जनतेला राहायला घर नाही. पण चंद्रयान कोणासाठी योजना फक्त कागदावर ठेवून फक्त प्रसिद्धी चालू आहे लोकांची घरीच बांधून दिली जात नाहीत. तर आमच्या काही महिला भगिनी अर्थात चित्रा वाघ ह्या आपले झाकून ठेवून दुसऱ्याचे वाकून बघायचे काम करत आहेत या भगिनींनी आपली पात्रता ओळखून बोलावे. परंतु गद्दार आमदार व खासदार यांचीही शेवटचीच निवडणूक असेल हे विसरू नये शिंदे गट व भाजप महाराष्ट्रातून हद्दपार झालेच पाहिजेत असा निर्धार करावा असे शेवटी बोलताना श्री कोळी म्हणाले. या निष्ठा यात्रा सभेला शिवसेनेचे सह संपर्कप्रमुख विजय देवने, जिल्हाप्रमुख सुनील शिंत्रे, उपप्रमुख संभाजी पाटील, गडहिंग्लज ता. प्रमुख दिलीप माने, आजरा ता.प्रमुख युवराज पोवार, राजेंद्र सावंत, शहर प्रमुख ओमकार माध्याळकर, युवा सेनेचे महेश पाटील, कृष्णा पाटील सह सर्व शिवसेना – युवा सेनेचे पदाधिकारी शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. श्री पोवार यांनी आभार मानले

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.