सर्फनाला प्रकल्पाच्या प्रकल्पग्रस्तांना भूमिसंपादन, पुनर्वसन व पुनर्वसाहत करण्यासाठी भरपाईपोटी 42 कोटी 90 लाख रुपये मंजूर – आमदार प्रकाश आबिटकर
आजरा प्रतिनिधी,
आजरा तालुक्याच्या हरीतक्रांतीला वरदायी ठरणाऱ्या सर्फनाला प्रकल्पामधील प्रकल्पग्रस्तांना भूमिसंपादन, पुनर्वसन व पुनर्वसाहत करण्यासाठी भरपाईपोटी 42 कोटी 90 लाखरुपयांचा निधी मंजूर झाला असल्याची माहिती आमदार प्रकाश आबिटकर यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे दिली आहे. प्रसिध्दीपत्रकात म्हटले आहे की, गेल्या 15 ते 20 वर्षापासून सर्फनाला प्रकल्पाचे काम निधी व पुनर्वसनाअभावी रखडलेले होता. याकरीता प्रकल्प ग्रस्तांचे प्रश्न सोडविण्याकरीता शासन स्तरावर वेळोवेळी बैठका व पाठपुरावा करून प्रकल्प ग्रस्तांचा विविध प्रलंबित प्रश्न मार्गी लावले आहेत. सर्फनाला मध्यम प्रकल्पाकरीता भूमिसंपादन व पुनर्वसन व पुनर्वसाहत करताना उचित भरपाई मिळण्याचा आणि पारदर्शकतेचा हक्क अधिनियम 2013 अल्पसे एस.आर.क्र.2/2022 मौजे पारपोली, ता.आजरा येथील क्षेत्र 29202.95 चौ.मी.उपविभागीय अधिकारी आजरा-भुदरगड यांचेकडे भूसंपादन करणेकामी प्रस्ताव चालू आहे. या प्रस्तावाकरीता भरपाई रक्कम मिळणे गरजेचे होते त्याकरीता करण्यात आलेल्या पाठपुराव्यास यश आले असून सदर प्रस्तावाची निवाडयाची अंदाजीत रक्कम 42 कोटी 90 लाख रुपये मंजूर करण्यात आले असल्याचे आमदार प्रकाश आबिटकर यांनी सांगितले आहे.
यामुळे सर्फनाला प्रकल्प सुरू करण्यासाठी प्रमुख अडचण असणाऱ्या भुसंपादनाचा प्रश्न सुटणार असून सर्फनाला प्रकल्पाचे काम लवकरात लवकर सुरू करण्यास मदत होणार असल्याचे
अशोक चराटी याची वस्त्रोद्योग महासंघाच्या संचालक मंडळामध्ये तज्ञ संचालक (स्विकृत संचालक)” म्हणून नियुक्ती निवड
अण्णा भाऊ आजरा तालुका शेतकरी सहकारी सूत गिरणी मर्या., आजरा, जिल्हा कोल्हापूर या महासंघाच्या सभासद सहकारी सूत गिरणीमध्ये तसेच आजरा अर्बन को- ऑपरेटिव्ह बँक लि. या बँकेमध्ये मागील २५-३० वर्षांपासून संचालक म्हणून अत्यंत कुशलरीत्या कार्य करीत आहात. या आपल्या उत्कृष्ट कामगिरीची त्याच बरोबर महासंघाच्या कामकाजात सातत्याने घेत असलेल्या सहभागाची नोंद घेवून, महाराष्ट्र राज्य सहकारी वस्त्रोद्योग महासंघ मर्या… मुंबई या महासंघाच्या संचालक मंडळ व वार्षिक सर्वसाधारण सभेतील मंजूर ठरावानूसार, आपणांस महासंघाच्या संचालक मंडळामध्ये तज्ञ संचालक (स्विकृत संचालक)” म्हणून वस्त्रोद्योग महामंडळाचे अध्यक्ष अशोक स्वामी यांच्या हस्ते अण्णाभाऊ संस्था समूहाचे प्रमुख अशोक चराटी यांना नियुक्तीस मंजुरी दिलेली आहे. महासंघाच्या संचालक मंडळामध्ये सदर नियुक्ती बद्दल महासंघाच्या वतीने नियुक्तीपत्र देण्यात आले आहे.

आपणांस ज्या-ज्या वेळी संचालक मंडळ सभा होतील त्या-त्या वेळी उपस्थित राहणेबाबत कळविण्यात येईल. कृपया आपण महासंघाच्या सभांच्या कामजात सहभाग घ्यावा, ही विनंती.
महासंघाच्या संचालक मंडळामध्ये तज्ञ संचालक (स्विकृत संचालक)” म्हणून नियुक्ती निवड

