Homeकोंकण - ठाणेबापूसाहेब सरदेसाई आदर्श हायस्कूल गवसे मध्ये विदयार्थानी घेतला शिक्षक दिनाचा आनंद.

बापूसाहेब सरदेसाई आदर्श हायस्कूल गवसे मध्ये विदयार्थानी घेतला शिक्षक दिनाचा आनंद.

बापूसाहेब सरदेसाई आदर्श हायस्कूल गवसे मध्ये विदयार्थानी घेतला शिक्षक दिनाचा आनंद.

आजरा.- प्रतिनिधी.

आजरा गवसे येथील बापूसाहेब सरदेसाई आदर्श हायस्कूल गवसे मध्ये शिक्षकदिन मोठ्या उत्साहात पार पडला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रशालेचे मुख्याध्यापक चंद्रकांत घुणे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून शैक्षणिक क्षेत्रातील सेवानिवृत्त शिक्षक भगवान पोवार गुरूजी होते. मान्यवरांच्या हस्ते डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन् यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले यावेळी शिक्षक दिनानिमित्त कु.संचिता दिवेकर, कु. अमृता आंबले, कु. सानिका गुंजाळ यांनी मनोगत व्यक्त केले प्रमुख पाहुणे श्री. पोवार सर यांनी शिक्षकांचा पुस्तक, पेन ,फुल व श्रीफळ देऊन सन्मान केला त्याबरोबर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. त्याचबरोबर शाळेचे दिवसभराचे कामकाज विद्यार्थ्यांनी हाताळले त्यांच्या चेहऱ्यावरील एक दिवशीही शिक्षक झाल्याचा आनंद व्दिगुणित करत होता. शाळेत दहा मुली व आठ विद्यार्थी मुख्याध्यापक, शिक्षक ते शिक्षकेत्तर कर्मचारी म्हणून काम करत होते. या कार्यक्रमास रणजित सावंत, संदिप वाटवे , विवियन मस्कारेनस,सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनिल कांबळे यांनी केले तर आभार संतोष कालेकर यांनी मानले

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.