जालन्यात मराठा आंदोलकावर अमानुषपणे अत्याचार केलेच्या निषेधार्थ.- आजऱ्यात बुधवार ५ रोजी लाक्षणिक उपोषण.
आजरा. – प्रतिनिधी.

जालन्यातील मराठा आंदोलकावर झालेल्या लाठीचार्जच्या निषेधार्थ मराठा महासंघ आजरा तालुका यांच्या वतीने लाक्षणिक उपोषण करणार असले बाबतचे निवेदन आज राहत तहसीलदार व आजरा पोलीस निरीक्षक यांना देण्यात आले आहे. दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.
जालना जिल्हयातील अंतरवाली सराटी या गांवी दि २९ ऑगस्ट २०२३ पासून मराठा समाजाला आरक्षण मिळणेसाठी सनदशिर मार्गाने उपोषण सुरु असताना.
शुक्रवार दि. १ सप्टेंबर २०२३ रोजी पोलीसांनी आंदोलन स्थळी बसलेल्या मराठा समाजातील अबालवृध्द, महिला, मुले यांच्यावर लाठीमार अनुधूर व हवेत गोळीबार करून आंदोलकावर अमानुषपणे अत्याचार केला आहे. या गोष्टींचा आम्ही जाहिर निषेध करतो.
आंतरवाली सराटी येथे मराठा आरक्षणासाठी बसलेल्या सर्वांना पाठींबा म्हणून आम्ही बुधवार दि. ०६ सप्टेंबर २०२३ रोजी आजरा तालुका मराठा महासंघाचे पदाधिकारी सकाळी २ ते सायंकाळी ५ पर्यंत लाक्षणिक उपोषणाला बसणार आहोत. सदर लाक्षणिक उपोषणाची गंभीर दखल घेऊन मराठा समाजाला तातडीने आरक्षण देण्याविषयी निर्णय घ्यावा असे दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. या निवेदनावर जिल्हाअध्यक्ष मारुती मोरे सह पदाधिकारी यांच्या सह्या आहेत.
