आजरा – व्यंकटराव प्रशालेत ‘शिक्षक दिन’उत्साहात साजरा.
आजरा :- प्रतिनिधी.

येथील व्यंकटराव हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज आजरा येथे भारताचे पहिले उपराष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन,थोर शिक्षणतज्ज्ञ डॉ.जे.पी.नाईक यांची जयंती व शिक्षक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या सुरुवातीस डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन व डॉ.जे.पी.नाईक यांच्या प्रतिमेचे प्रशालेच्या पर्यवेक्षिका सौ.व्ही.जे.शेलार मॅडम याच्या शुभहस्ते पुष्पहार अर्पण करून पूजन करण्यात आले.याप्रसंगी सहा. शिक्षिका एन. ए. मोरे सहा. शिक्षक एम.एम.देसाई, के.ए.दावणे, पी.एम. वडर, पी.एस. गुरव. ए. के. गुरव सर्व शिक्षक -शिक्षिका कर्मचारी,विध्यार्थी उपस्थित होते.
प्रशालेतील इ.१० क च्या विध्यार्थ्यांनी प्रशाळेतील सर्व शिक्षकांना फूल देऊन ‘गुरू वंदन’ केले. इ.१० तु. क ची विद्यार्थिनी कु.श्रावणी कांबळे हिने ‘गुरू थोरवी’ ही कविता सादर केली. कु.प्रसाद जाधव, कु.संपदा दळवी, कु.सुभाष ढोनुक्षे यांनी शिक्षक दिनावर आधारित भाषणे केली.
तसेच विध्यार्थी चित्रकार कु.उमेश केरकर या विद्यार्थ्याने डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचे रंगीत खडूने प्रशालेच्या दर्शनी भिंतीवर चित्र रेखाटले.या बालकलाकाराचे विद्यार्थी व शिक्षकातून कौतुक झाले.
मार्गदर्शक शिक्षक कृष्णा दावणे यांचाही प्रशालेतच्या पर्यवेक्षिका सौ व्ही.जे.शेलार यांनी पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.
सदर उपक्रमास प्रशालेचे प्राचार्य आर.जी.कुंभार सर यांचे प्रोत्साहन लाभले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इ.१० वी तु. क ची विद्यार्थिनी कु.प्राची शेटगे हिने केले
