जनतेच्या अडचणी समजून घेण्यासाठी जनसंवाद यात्रा .- आमदार सतेज पाटील
( काँग्रेसच्या जनसंवाद यात्रेला आजऱ्यात उस्फुर्त प्रतिसाद. )
आजरा.- प्रतिनिधी.
काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेच्या अनुषंगाने ही पाई जनसंवाद यात्रा हि नागरिकांच्या अडचणी जाणून घेण्यासाठी असल्याचे आजरा येथे दि. ३ रोजी जनसंवाद यात्रेचे सभेत रूपांतर होऊन सभेला संबोधित करताना काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष व आमदार सतेज उर्फ बंटी पाटील बोलत होते. स्वागत व प्रस्ताविक नगरसेवक अभिषेक शिंपी यांनी केले जिल्हाध्यक्ष श्री म्हणाले मागील नऊ वर्षांमध्ये मोदी सरकारने जीवनावश्यक वस्तूं सह महागाई करून निवडणुकीच्या एक वर्ष अगोदर दोनशे रुपयांनी सिलेंडर दर कमी करून जनतेची काळजी असल्याचे दाखवत आहेत. ज्या महिला भगिनींनी मागील पंचवार्षिक निवडणुकीत डोळे झाकून मतदान केले त्या महिला नागरिकांनी आता विचार करून मतदान करावे लागेल भाजप सरकारच्या भूलथापांना बळी पडू नये येणाऱ्या चार पाच महिन्यात पेट्रोल डिझेल देखील साठ रुपये वर येईल कारन जनतेचा रोश वाढल्याने महागाई कमी येईल पण बारा लाख कोटींची कर्ज उद्योजकांची कर्ज माफ केली पण गरीबाचे अश्रू पुसण्याचे काम केले नाही सत्तेसाठी दुसऱ्याचे पक्ष फोडण्याचे काम केले भाजपला भविष्यात सत्येत येणार नाही याचा आत्मविश्वास असल्याने यांचे कृत्य चालू आहे. येणारे काळात आपल्या अडचणी समजून घेऊन त्या सोडवण्याचे काम काँग्रेस करेल यासाठी भविष्यात चांगल्या पद्धतीने काम करून विकास करूया अशी सभेला संबोधित करताना माजी मंत्री जिल्हाध्यक्ष श्री.पाटील म्हणाले. या पदयात्रा व सभेला संग्रामसिंह नलवडे, शशिकांत चुयेकर, अंजनाताई रेडेकर, बाजीराव खाडे, किरण कांबळे, जयवंतराव शिंपी, संजय सावंत, बशीर खेडेकर, सतेज टीम पदाधिकारी काँग्रेस पदाधिकारी, आजरा तालुक्यातील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

या जनसंवाद यात्रेमध्ये काँग्रेस पदाधिकारी यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. गावा – गावात जनसंवाद यात्रा प्रेमाचा संदेश घेऊन येणाऱ्या जनसंवाद पायी यात्रेचे महिला भगिनी व नागरिकांनी स्वागत केले.

देशात सुरू असलेले राजकारण या धर्तीवर असून चंदगड मधून यात्रेला सुरुवात होऊन आजरा हांदेवाडी येथे आगमन होऊन कोळींद्रे, किणे, शिरसिंगी, वाटंगी, हणबरवाडी अशी पाई यात्रेने आजरा येथे छत्रपती शिवाजी महाराज यांना पुष्पहार अर्पण करून धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चौक सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेला आजरा तालुक्यातील नागरिकांनी उस्फुर्त प्रतिसाद देऊन सभा शांततेत संपन्न झाली. सपोनि. सुनील हरगुडे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस बंदोबस्त व वाहतूक नियंत्रण चांगल्या पद्धतीने हाताळण्यात आले होते.
