जालन्यात मराठा क्रांती मोर्च्याच्या आंदोलकांवर लाठीचार्ज निषेधार्थ .- निषेध – आजऱ्यात मराठा महासंघाचे तहसीलदारांना निवेदन .
आजरा. – प्रतिनिधी.
जालना जिल्ह्यात मराठा आरक्षणाच्या आंदोलनात झालेल्या लाठीचार्ज च्या निषेधार्थ आजरा तालुका मराठा महासंघाच्या वतीने आजरा तहसीलदार व पोलीस निरीक्षक यांना निवेदन देण्यात आले आहे. दिलेल्या निवेदनात म्हटले आहे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी या गावात दि २९ ऑगस्ट पासून लोकशाहीच्या मार्गाने सुरु असलेल्या उपोषण करणा-या मराठा आंदोलकांवर पोलिसांनी अमानुषपणे जोरदार लाठीमार केला व यात ब-याच महिलांसह अनेक आंदोलक जखमी झाले आहेत. तसेच लाठीमार करून पोलिस थांबले नाहीत, तर त्यांना रोखण्यासाठी त्यांनी हवेत गोळीबार केला.

तरी या लाठीमाराच्या निषेधार्थ आम्ही जाहीर निषेध करत आहोत. झालेल्या गंभीर घटनेची आपण सखोल चौकशी करुन दोषी असणा-या प्रशासनावर योग्य ती कायदेशीर कारवाई करावी
सुरु असणारे आंदोलन सनदशीर मार्गाने सुरू आहे. त्या आंदोलकांना लवकरात लवकर शासनाने निर्णय देवून आंदोलन चिघळू नये यामध्ये राजकारण न आणता सदरचा प्रश्न तातडीने सोडवावा असे दिलेल्या निवेदनात म्हटले आहे या निवेदनावर जिल्हाध्यक्ष मारुती मोरे, बंडोपंत चव्हाण, शिवाजी गुडुळकर, मानसिंग देसाई, सी. डी. सरदेसाई, गणपतराव डोंगरे, मराठा महासंघ व मराठा समाजातील नागरिकांच्या महिलांच्या सह्या आहेत सदर निवेदनाच्या प्रती मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री गृहमंत्री, उपमुख्यमंत्री अर्थमंत्री यांना देण्यात आल्या आहेत.

