गोकुळ दूध संघाची आजऱ्यात संपर्क सभा संपन्न.
( संकलन वाढीसाठी व गोकुळच्या दुग्ध उत्पादकांच्या समस्येसाठी संपर्क सभा. – अध्यक्ष अरुन डोंगळे )
आजरा.- प्रतिनिधी.

गोकुळच्या विविध योजनेचा लाभ दूध उत्पादकांनी घ्यावा. याबाबतची माहिती दूध उत्पादकांना मिळावी यासाठी आजरा तालुक्यातील दूध उत्पादकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी संपर्क सभा असल्याचे गोकुळचे अध्यक्ष अरुण डोंगळे यांनी सांगितले आजरा येथील अण्णाभाऊ सभागृहात गोकुळ दूध संघाची संपर्क सभा संपन्न झाली. अध्यक्षस्थानी गोकुळचे चेअरमन अरुण डोंगळे होते.

स्वागत व प्रास्ताविक गोकुळ संचालिका अंजनाताई रेडेकर यांनी केले अध्यक्ष श्री डोंगळे म्हणाले दूध उत्पादकाने म्हैस दूध वाढीसाठी प्रयत्न करावे. आजरा तालुका म्हैस दूध उत्पादनात अवल आहे परंतु यापेक्षाही अधिक म्हैस दूध संकलन व्हावे. यासाठी उत्पादकांनी प्रयत्न करावे तसेच आपल्या मनातील प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही आपल्यापर्यंत आलो आहोत आपल्या काही चांगल्या सूचना असतील तर आपण त्या मांडाव्यात नूतन संचालकांच्या व बदलत्या काळानुसार संपर्क सभेला दूध उत्पादकांची चांगली उपस्थिती दिसत आहे. आदर्श संचालकाकडून दूध उत्पादकांनी सहकार्य घेऊन दूध व्यवसाय वाढवावा असे बोलताना म्हणाले यावेळी माजी अध्यक्ष विश्वास पाटील म्हणाले म्हैस दूध उत्पादन वाढले पाहिजेत तालुक्यातील शेतकरी बंधूंनी आपल्या दूध उत्पादनात वाढवण्यासाठी दुग्ध व्यवसाय वाढवावा गोकुळच्या योजनेचा लाभ घेऊन म्हैस खरेदी कराव्यात व म्हशीचे दूध संकलन जास्तीत व्हावे यासाठी आमच्याकडून जे सहकारी पाहिजे आहे त्यासाठी संचालक मंडळ मदत करेल.
गोकुळ उत्पादकांचा चित्रफीत पांयडा उत्पादकांना उत्स्फूर्त प्रतिसाद देणारा.- श्री. पाटील
गोकुळ संपर्क सभेमध्ये संचालिका अंजनाताई रेडेकर यांनी आजरा तालुक्यातील लहान व मोठ्या दुग्ध व्यवसाय करणाऱ्या उत्पादकांची चित्रफित बनवली व ती गोकुळ संचालक व आजरा तालुक्यातील दूध उत्पादकांना दाखवली यामुळे नव्याने व्यवसाय करणाऱ्या उत्पादकांना व्यवसाय करण्यासाठी गती मिळणार आहे. हा पांयडा नव्याने संचालिका श्रीमती रेडेकर यांनी पाडला आहे. त्याचे कौतुक करण्यासारखे असल्याचे बोलताना म्हणाले.
यावेळी उत्पादकांची वैरण विकास, पशुसंवर्धन, या विभागाची माहिती देऊन उत्पादकांच्या समस्या व प्रश्न जाणून घेतले या प्रश्नांमध्ये गाईचा दर दोन रुपयांनी कमी केला तो वाढवावा, गोकुळच्या माध्यमातून म्हशी द्याव्या., मयत जनावरांना नुकसान भरपाई मिळावी., वाटंगी गिलबिले, सिरसिंगी संस्था उत्पादक, पेरनोली संकेत सावंत हरपवडे गोविंद गुरव,मडिलगे हनुमान दूध संस्था के व्ही येसनने सह दूध उत्पादकांनी संपर्क सभेच्या समस्या प्रश्नावलीत सहभाग घेतला.

या संपर्क सभेला संचालक नावेद मुश्रीफ, चेतन नरके, एस आर पाटील, युवराज पाटील अजित नरके अमरसिंह पाटील, बाबासाहेब खाडे, किरण चौगुले, सह आजरा तालुक्यातील जिल्हा बँकेचे संचालक सुधीर देसाई तसेच वसंतराव धुरे, मुकुंदराव देसाई, उदयराज पवार, एम के देसाई, दीपक देसाई, अनिरुद्ध रेडेकर सह आजरा तालुक्यातील विविध दूध संस्थेचे चेअरमन संचालक मंडळ सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते
