HomeUncategorizedस्पर्धा परीक्षा, सरळसेवा फी कमी करावी.- ऑनलाईन परीक्षेची डिजिटल कार्बन कॉपी द्यावी....

स्पर्धा परीक्षा, सरळसेवा फी कमी करावी.- ऑनलाईन परीक्षेची डिजिटल कार्बन कॉपी द्यावी. – आजरा मनसे. वि.सेनेचे निवेदन. ( तलाठी भरतीसाठी संपूर्ण महाराष्ट्रातून ११ लाख विद्यार्थ्यांनी अर्ज.- एका अर्जास १०००, शुल्क शासन कंपनीने ११० कोटी इतका प्रचंड महसूल विद्यार्थ्याकडून केला जमा.)

स्पर्धा परीक्षा, सरळसेवा फी कमी करावी.- ऑनलाईन परीक्षेची डिजिटल कार्बन कॉपी द्यावी. – आजरा मनसे. वि.सेनेचे निवेदन. ( तलाठी भरतीसाठी संपूर्ण महाराष्ट्रातून ११ लाख विद्यार्थ्यांनी अर्ज.- एका अर्जास १०००, शुल्क शासन कंपनीने ११० कोटी इतका प्रचंड महसूल विद्यार्थ्याकडून केला जमा.)

आजरा. – प्रतिनिधी.

शासनाच्या स्पर्धा परीक्षा, सरळसेवा फी कमी करावी ऑनलाईन परीक्षेची डिजिटल कार्बन कॉपी द्यावी अशा वेगवेगळ्या मागण्या सोबत आजरा मनसे विसेना जिल्हा उपाध्यक्ष अश्विन राणे यांच्या नेतृत्वाखाली तहसीलदार आजरा यांना निवेदन देण्यात आले दिलेल्या निवेदनात म्हंटले आहे की दरवर्षी महाराष्ट्र राज्यात विविध पदासाठी जागा निघत असतात व सरकारी कामकाज हे सुरळीत होण्यासाठी सरकारी क्षेत्रात विविध विभागांमध्ये पदभरती केली जाते. अलीकडेच महाराष्ट्र शासनाने महसुल व वन विभागाच्या तलाठी पदभरती साठी एकूण ४६६४ जागेची जाहिरात दिली. परंतु त्याच पदाच्या परीक्षा शुल्काचा आकडा देखील पापण्या उंचावणारा होता शासनाच्या माहिती नुसार तलाठी भरतीसाठी संपूर्ण महाराष्ट्रातून ११ लाख विद्यार्थ्यांनी अर्ज केले होते. एका अर्जास १००० इतके मोठे शुल्क आकारून शासन कंपनीने ११० कोटी इतका प्रचंड महसूल विध्यात्यांकडून गोळा केला. त्यामुळे महाराष्ट्र शासन परीक्षेच्या नावाखाली सामान्य विद्यार्थ्यांकडून महसूल गोळा करत आहे की काय? असा प्रश्न आम्हाला पडलेला आहे.
त्याचबरोबर ज्या खाजगी कंपन्या या परीक्षा घेतात त्या विद्यार्थ्यांना सुरुवातीला पुरावा म्हणून प्रश्नपत्रिकेसोबत कार्बन कॉपी देत होत्या, पण आता त्या दिल्या जात नाहीत. परीक्षा या ऑनलाईन पद्धतीने होतात त्यामुळे या परीक्षामध्ये घोटाळे केले जातात. महाराष्ट्रात असे अनेक प्रकार नेहमी समोर येत आहेत. त्यामुळे परीक्षा जरी ऑनलाईन झाल्या तरी विद्यार्थ्यांनी आपण दिलेल्या उत्तराची कार्बन कॉपी पुन्हा तपासणीसाठी मिळायला हवी. या निवेदनाद्वारे महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना आपल्या समोर पुढील मागण्या ठेवत आहे.
१) परीक्षा अर्ज फी ५०% टक्केपर्यंत कमी करावी.
२) परीक्षा पारदर्शी होण्यासाठी परीक्षा केंद्रावर बायोमेट्रिक आणि सीसीटीव्ही कॅमेरे बंधनकारक व्हायला हवेत
३) खाजगी कंपनी कडून ऑनलाइन स्पर्धा परीक्षा घेतल्या जातात. ऑनलाइन परीक्षा झाल्यावर लगेच उमेदवारास डिजिटल उत्तरतालिका (कार्बन कॉपी) त्यांच्या ईमेल वर पाठवण्यात यावी जेणेकरून परीक्षा पारदर्शी होईल व संभाव्य घोटाळे टाळले जातील.
४) परीक्षा केंद्राच्या बाहेर Metal detector मशीन लावण्यात यावी,
५) परीक्षा केंद्राबाहेर जामर बसवण्यात यावे.
६) लोकसंख्येच्या प्रमाणात प्रतिनिधित्व स्वरूपात पदभरती काढण्यात यावी.
७) राजस्थान मध्ये परीक्षा फॉर्मसाठी कूपन दिली जातात तशी कूपन आपल्या कडे पण देण्यात यावी
वरील सर्व विद्यार्थ्याच्या हिताचे मुद्दे लक्षात घेता आपण यावर लवकरात लवकर कारवाई कराल अशी आशा आहे. त्याचबरोबर मनमानी कारभार करून विद्यार्थ्यांनी कुचेष्टा केल्यास महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेतर्फे येणाऱ्या काळात निदर्शने केली जातील असे दिलेल्या निवेदनात म्हटले आहे या निवेदनावर
अश्विन राणे मनिवसे जि. उपाध्यक्ष
वैभव जाधव, वैष्णव दळवी मनविसे ता. अध्यक्ष तसेच शुभम पाटील मनविसे वि.अध्यक्ष, सौरभ गोंडे, प्रेम वडर , स्वनिल कुंभार, शुभम शिवने.
सह वि.सेना मनसे मनसैनिकांच्या सह्या आहेत. ( या निवेदनाच्या प्रती मुख्यमंत्री व जिल्हाधिकारी यांना देण्यात आल्या आहेत. )

शासनाचा अंदाधुंदी कारभार.

[ शासनाच्या वेगवेगळ्या विभागातील रिक्त जागेच्या भरती काढल्या जातात उमेदवार ऑनलाईन फॉर्म भरतात व परीक्षेपूर्वी काही उमेदवारांना एक तास अगोदर मेसेज येतो व हॉल तिकीट दिले जात. एक तासांमध्ये सदर उमेदवाराने परीक्षा स्थळापर्यंत पोहोचायचे कसे पोहोचण्याचा अंतर असतं अंदाजे २०० किलोमीटर आणि याबाबत विचारणा करायची कोणाला त्या उमेदवारांचे १००० तर गेले व परिक्षेला पण बसू शकला नाही. याला जबाबदार कोण. ]

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.