आजरा साखर कारखान्यावर डॉ. पाटील यांचे सेबी व शेअर मार्केट डिमेंट अकौंट माहितीसत्र संपन्न.
आजरा. – प्रतिनिधी.
आजरा शेतकरी सहकारी साखर कारखान्यावर दि.१९/८/२०२३ इ. रोजी सेवकाची पतसंस्था, आजरा साखर कामगार संघ तसेच गणेश कला किडा संस्थेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेचे आयोजन करणेत आले होते. याचे औचित्य साधुन सभेच्या सुरुवातीस कारखान्याच्या वतीने भारतीय प्रतिभुती व विनिमय बोर्ड (सेबी) आणि सेंट्रल डिपॉजिटरी सर्विसेस लिमिटेड ( सी.डी.एस.एल ) यांच्यावतीने आर्थिक जनजागृतीचे कार्यक्रमाचे आयोजन करणेत आले होते सेबी व शेअर मार्केट डिमेंट अकौंट इत्यादीची माहिती डॉ. अजित पाटील. (सी.डी.एस.एल व्याख्याते ) पन्हाळा यांनी कारखान्याचे सर्व अधिकारी व कर्मचारी याना दिली याप्रसंगी डॉ पाटील यांनी कोल्हापूर जिल्हयातील अतिमागास समजले जाणा-या आजरा तालुक्यात अत्यंत अडचणीत असुन तसेच कारखाना जवळपास उसक्षेत्र जादा दिसत नसतानां देखील हा कारखाना व्यवस्थित चालवला आहे याबाबत ब-याच कारखान्यात चर्चा आहे असे सांगीतले तसेच कारखाना योग्य नियोजनाने चालविले बददल व्यवस्थापणाचे कौतुक केले सेबीची माहिती देणेसाठी आपण ब-याच कारखान्यावर जात असुन त्यामुळे जिल्हयातील सगळ्याच कारखान्याशी आपला संपर्क आहे पण आज येथे येवून मला खरी माहीती घेता आली कारखाना 10 कि.मी च्या अंतरात मला उस दिसला नाही पण कारखान्याचे गाळपाचे आकडे समाधानकारक आहेत राज्यात काही कारखान्यामध्ये कर्मचा-यांचे पगार चार चार महिने होत नाहीत अशी परिस्थिती आहे पण आजरा कारखाना व्यवस्थापणाने योग्य नियोजन ठेवले असलेचे जिल्हयातील कारखान्यामध्ये चर्चा आहे. असे वक्तव्य केले यावेळी सेबी म्हणजे काय, सेबीची स्थापना कधी व का झाली त्यांनी भारतीय अर्थ व्यवस्थेतील सेबीची कार्यपध्दती इत्यादी माहिती उपस्थिताना दिली
त्यानंतर कारखाना सेवकाच्या पत संस्थेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये कारखाना सेवकांची पत संस्था व कामगार संघटना यांचे मार्फत कारखाना सेवेतून निवृत्त झालेल्या कामगारांचा सत्कार व कारखाना सेवकांची पत संस्था याचेमार्फत कामारखाना कर्मचारी यांच्या पाल्यांना स्कॉलरशिप देवून सत्कार केला. त्यानंतर सन २०२२-२३ मध्ये पतसंस्थेने स्वभांडवलावर व्यवहार करून संस्थेने कायम व हंगामी कर्मचारी याना त्यांच्या शेअर भाग भांडवलाची जमा असणा-या रक्कमेच्या प्रमाणात कर्ज उपलब्ध करून देणेची योजना केली आणि संस्थेस या आर्थिक वर्षात ४६१७९४३.५० लाख नफा झाला असुन सभासदांना ११.५० टक्के लाभांश देणार असलेचे पत संस्था व्यवस्थापना मार्फत जाहीर केले तसेच कामगार संघटनेचे जनरल सेकेटरी यानी संघटनेचा झालेला वार्षिक खर्चाबाबत माहिती दिली व संघटनेचे अध्यक्ष प्रकाश सरदेसाई यांनी कामगारांच्या प्रश्नावर चर्चा केली व गणेश कला किडा व सांस्कृती मंडळ आजरा साखर गवसे यांचे जनरल सेक्रेटरी यांनी मागील वर्षाच्या झालेल्या खर्चाचे विवेचन करून येणा-या गणेश चतुर्थी समारंभाचे नियोजनाबाबत चर्चा केली अशा प्रकारे तीन्ही संस्थांची सभा खिळीमिळीत पार पडली.
सदर कार्यक्रमास कारखान्याचे प्र. कार्यकारी संचालक व्ही के ज्योती जनरल मॅनेंजर (टेक्नी) वसंत गुजर, प्रोडक्शन मॅनेंजन (उत्पा.) सभाजी सावंत व खातेप्रमुख तसेच पत संस्थेचे संचालक, कामगार संघटनेचे सदस्य व श्री गणेश मंडळाचे सदस्य व कारखाना कर्मचारी उपस्थिती होते.
