HomeUncategorizedआरदाळ येथे बंद घरामध्ये चोरी (तांब्या पितळेची भांडी व हंडी चोरीला)

आरदाळ येथे बंद घरामध्ये चोरी (तांब्या पितळेची भांडी व हंडी चोरीला)

आरदाळ येथे बंद घरामध्ये चोरी (तांब्या पितळेची भांडी व हंडी चोरीला)

आजरा.- प्रतिनिधी.

आरदाळ ता. आजरा येथील शंकर रामचंद्र बाबर. सद्या रा. मुंबई यांच्या आरदाळ येथील बंद घरामधील तांब्याचे २ मोठे हंडे, ५ घागरी, पितळेची परात व इतर साहित्य चोरीला गेले. असल्याची फिर्यादी शंकर रामचंद्र बाबर यांनी पोलिसात दिली आहे. बाबर कुटुंबातील सर्वजण नोकरीनिमित्त मुंबई व ठाणे येथे रहातात. परंतु अधुनमधून ते गावी येऊन जात असतात. २ महिन्यांपूर्वीच ते आरदाळ येथील घरात येऊन गेले होते. त्यानंतर आज दि.२२ ऑगस्ट रोजी स. ११ वाजता शंकर रामचंद्र बाबर हे आपल्या कुटुंबीयांसोबत गावी आल्यावर घरातील साहित्य चोरीला गेल्याचे दिसून आले. धाब्याची फळी उचकटून घराच्या मागील बाजूने चोरट्याने घरात प्रवेश केला व हंड्यामध्ये ठेवलेली धान्य उलटून तांब्या पितळेची भांडी व इतर साहित्य चोरीला गेल्याचे समजले. सदर चोरीच्या घटनेची फिर्याद उत्तूर पोलिस ठाण्यात दिली आहे. असे शंकर बाबर यांनी सांगितले. त्यानुसार पोलिसांनी घटनास्थळी पहाणी केली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.