ऐतिहासिक व्हीक्टोरिया पुलाचे जतन व संवर्धन करणेबाबत.- सार्वजनिक बाधकाम विभागाला शिवसेनेचे निवेदन.
आजरा. – प्रतिनिधी.

आजरा येथील ऐतिहासिक व्हीक्टोरिया पुलाचे जतन व संवर्धन करणेबाबत सार्वजनिक बाधकाम विभागाला शिवसेनेने निवेदन दिले आहे. दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. आजरा शहरालगत असणारा व्हिक्टोरिया पुल हा गेली १३३ वर्षे प्रवासी नागरिकांच्या अविरत सेवेत आहे. या ब्रिटीशकालीन पुलाचे उत्कृष्ट बांधकाम व वास्तुशास्त्राचा उत्तम नमुमा असलेने अनेक पुरांचा सामना केला या पुलावरून अवजड वाहतुक तसेच आंबोली गोवा पर्यटक जास्त प्रमाणात असुन देखील कधीही वाहतुकीस खंड पडू दिला नाही. सद्या संकेश्वर बांधा महामार्गाचे काम जलदगतीने चालू आहे. व्हिक्टोरिया पुलाला नविन समांतर पुल बांधण्याचे काम देखील चालु आहे. नविन समांतर पुल झाल्यानंतर जुना पुल वाहतुकीस बंद होणार आहे. पण १३३ वर्षांचा हा जुना पुल म्हणजे पुरातन ऐतिहासिक ठेवा आहे. तो आपण जपला पाहीजे या पुलाने अनेक पिठ्या सुरक्षित साभळल्या आहेत. त्यामुळे यांचे जतन व संवर्धन करावे या पुलाच्या बाजुने विद्युत रोषणाई करून या पुलावर पेबिंग ब्लॉक बसवुन विरंगुळा केंद्र चालु करावे म्हणजे नविन पिढीला हा ऐतिहासिक पुल आठवणीत ठेवता येईल वरील मागणीचा सहानुभूतीपूर्वक विचार व्हावा ही विनंती. अशा आशयाचे निवेदन देण्यात आले आहे. या निवेदनावर उपजिल्हा संघटक संभाजी पाटील, आजरा ता. प्रमुख युवराज पोवार, राजेंद्र सावंत, युवा सेना उप.जि.अधिकारी महेश पाटील, ता.अधिकारी राजकुमार भोगन, शहर अधिकारी रोहन गिरी, सह पदाधिकारी व शिवसैनिक यांच्या सह्या आहेत.
